Wednesday, August 26, 2026
Google search engine
HomeUncategorizedटाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्सने हॅरियर आणि सफारीची बहुप्रतीक्षित पेट्रोल आवृत्ती लॉन्च केली,...

टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्सने हॅरियर आणि सफारीची बहुप्रतीक्षित पेट्रोल आवृत्ती लॉन्च केली, ज्यांची एक्स-शोरूम किंमत 12.89 लाख रु. पासून सुरू होत आहे

संपूर्णपणे नवीन 1.5L हायपेरियन टर्बो-GDi पेट्रोल इंजिनवर चालणाऱ्या हॅरियर आणि सफारी या त्यांच्या सेगमेन्टमधील सर्वाधिक इंधन-कार्यक्षम SUV आहेत. हॅरियरला ‘12 तासांत पेट्रोल मॅन्युअल SUV द्वारे साध्य करण्यात आलेल्या महत्तम इंधन-कार्यक्षमते’बद्दल इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये स्थान मिळाले आहे

हायपरएफिशन्ट परफॉर्मन्स, हायपरटेक इनोव्हेशन आणि हायपरप्रीमियम डिझाईन यांच्या आकर्षक संयोजनाने प्रीमियम SUV सेगमेन्टची नव्याने व्याख्या केली आहे. हॅरियर पेट्रोलची सुरुवात 12.89 लाख रु. (एक्स-शोरूम, नवी दिल्ली) पासून होत असून सफारी पेट्रोलची किंमत 13.29 लाख रु. (एक्स-शोरूम, नवी दिल्ली) पासून होत आहे

मुंबई, 7 जानेवारी 2025: टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्स लिमिटेड (TMPV) या भारतातील आघाडीच्या SUV उत्पादक कंपनीने आज 1.5L हायपेरियन टर्बो-GDi पेट्रोल इंजिनवर चालणाऱ्या हॅरियर आणि सफारी या त्यांच्या बहुप्रतीक्षित गाड्यांच्या किंमती जाहीर केल्या आहेत. या किंमती त्यांच्या सेगमेन्टमध्ये स्पर्धात्मक आहेत. हॅरियर पेट्रोलची सुरुवात 12.89 लाख रु. (एक्स-शोरूम, नवी दिल्ली) पासून होत असून सफारी पेट्रोल 13.29 लाख रु. (एक्स-शोरूम, नवी दिल्ली) पासून उपलब्ध आहे.

उच्च सेगमेन्टमधील लक्झरी फीचर्सने सुसज्ज असलेल्या या दोन्ही SUV प्रीमियम SUV ची नव्याने व्याख्या करतात. यात सॅमसंग निओQLED वर चालणारा 36.9 सेंमी सिनेमॅटिक इन्फोटेन्मेंट डिस्प्ले, आकर्षक डॉल्बी अॅटमॉस ऑडिओ, बिल्ट-इन ड्युअल डॅश कॅम आणि DVR सह व्हिजन-X E- IRVM, ऑटो रिव्हर्स डिप सह VisionSynk मेमरी ORVM आणि क्लिअरव्ह्यू ड्युअल कॅमेरा वॉशर यांसारखी अत्याधुनिक इनोव्हेशन समाविष्ट आहेत.

या सेगमेन्टमध्ये सर्वोत्तम इंधन-कार्यक्षमता प्रदान करण्याव्यतिरिक्त, यातील संपूर्ण नवीन 1.5L हायपेरियन टर्बो-GDi इंजिनमध्ये बुद्धिमान टेक्नॉलॉजी ठासून भरली आहे, ज्यामुळे हॅरियर आणि सफारी प्रीमियम SUV सेगमेन्टची नव्याने व्याख्या करतात. लेटेस्ट इंजिन टेक्नॉलॉजी आणि AI व ML वर चालणारे इंजिन अतुलनीय आणि निर्दोष परफॉर्मन्स देते आणि शहरातील तसेच महामार्गांवरील प्रवासादरम्यान शक्ती आणि कार्यक्षमता यांचा उत्तम समतोल साधते. या गाड्या उत्कृष्ट राईड आणि हँडलिंग प्रदान करतात, सेगमेन्टमधील सर्वोत्तम NVH स्तरासह प्रीमियम केबिन शांतता सुनिश्चित करतात आणि त्यातील पॉवरट्रेन अशाप्रकारे ट्यून करण्यात आली आहे की, गाडी शहरातील वाहतुकीत स्मूद चालते आणि उच्च वेगात देखील उत्तम स्थिरता कायम ठेवते. एकंदरित, या गुणांमुळे प्रत्येक प्रवास सुखद होतो. हे गुण हॅरियर आणि सफारीला या सेगमेन्टमधील सर्वोत्तम पर्याय म्हणून स्थापित करतात.

हॅरियर आणि सफारीने TMPV ची सुरक्षिततेची परंपरा जपत आता हायपेरियन पेट्रोल इंजिन असलेल्या सर्व व्हेरियन्ट्स साठी परफेक्ट 5-स्टार भारत NCAP रेटिंग मिळवले आहे. त्यामुळे हॅरियर आणि सफारीचा संपूर्ण पोर्टफोलियो 5-स्टार प्रमाणित झाला आहे.

हॅरियर आणि सफारी 1.5L हायपेरियन टर्बो-GDi पेट्रोल साठी प्रारंभिक किंमती खाली दिल्याप्रमाणे आहेत (एक्स-शोरूम, नवी दिल्ली):

हॅरियर

MT

AT

#DARK MT

#DARK AT

स्मार्ट

12,89,000

प्युअर X

15,99,990

17,53,190

16,63,390

17,91,090

अॅडव्हेंचर X

16,86,490

18,47,290

17,38,490

18,89,990

अॅडव्हेंचर X+

17,13,590

18,74,390

17,65,590

19,26,390

फियरलेस X

19,99,990

21,78,890

20,65,390

22,30,890

फियरलेस X+

22,11,990

23,53,890

22,63,990

24,05,890

फियरलेस अल्ट्रा

22,71,990

24,13,890

फियरलेस अल्ट्रा रेड #DARK

23,26,990

24,68,890

 

 

Safari

MT

AT

#DARK MT

#DARK AT

स्मार्ट

13,29,000

प्युअर X

16,49,190

17,91,090

17,01,190

18,52,590

अॅडव्हेंचर X+

17,75,090

19,35,990

18,27,190

19,88,090

अॅकम्प्लिश्ड X

20,84,290

22,49,890

21,36,290

23,01,890

अॅकम्प्लिश्ड X+

22,73,490

24,15,390

23,06,590

24,48,490

अॅकम्प्लिश्ड X+ 6S

22,82,990

24,24,890

23,16,090

24,57,990

अॅकम्प्लिश्ड अल्ट्रा

23,33,490

24,75,390

अॅकम्प्लिश्ड अल्ट्रा 6S

23,42,990

24,84,890

अॅकम्प्लिश्ड अल्ट्रा रेड #DARK

23,68,490

25,10,390

अॅकम्प्लिश्ड अल्ट्रा रेड #DARK 6S

23,77,990

25,19,890

 

हॅरियर आणि सफारीच्या पोर्टफोलियोमध्ये संपूर्ण नवीन पॉवरट्रेनची भर घालण्याबाबत बोलताना टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडचे चीफ कमर्शियल ऑफिसर श्री. विवेक श्रीवास्तव म्हणाले, “2.5 लाखापेक्षा जास्त हॅरियर आणि सफारी आत्ता मार्केटमध्ये आहेत. या दोन्ही SUVs नी आधीच टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्सची डिझाईन, परफॉर्मन्स आणि सुरक्षिततेच्या परंपरेचे प्रतीक म्हणून स्थान मिळवले आहे. संपूर्ण नवीन 1.5L हायपेरियन टर्बो-GDi पेट्रोल इंजिन या वाहनांची गुणवत्ता आणखी वाढवते. हॅरियर पहिल्यापासून आपला डायनॅमिक स्टान्स आणि उठून दिसणाऱ्या रूपामुळे एक आयकॉनिक SUV म्हणून ओळखली जाते. आता हायपेरियनची अतुलनीय पॉवर आणि प्रीमियम ड्रायव्हिंग अनुभव यामुळे हॅरियर आणखी प्रभावी झाली आहे. दुसरीकडे, सफारीने लोकांची आवडती आणि प्रतिष्ठित हाय SUV म्हणून या उद्योगात आपले बस्तान बसवले आहे. सफारीची ही मजबूत परंपरा आता हायपेरियनच्या शांत, आवाज न करणाऱ्या आणि टेक्नॉलॉजीने समृद्ध परफॉर्मन्समुळे अधिक मजबूत झाली आहे.

हा हायपरएफिशन्ट पॉवरट्रेन या सेगमेन्टमधील सर्वोत्तम इंधन-कार्यक्षमता, अतुलनीय परफॉर्मन्स, प्रीमियम रिफाईनमेंट आणि स्मूदनेस प्रदान करतो. जो SUV च्या बोल्ड डिझाईन आणि प्रगत इनोव्हेशन बरोबरच सेगमेन्ट मधील सर्वोत्तम इन-केबिन तंत्रज्ञानाला पूरक आहे. हॅरियर आणि सफारी पेट्रोल एकत्रितपणे, लक्झरी इतकेचे बुद्धिमत्तेला महत्व देणाऱ्या आधुनिक भारतीय ग्राहकासाठी तयार करण्यात आल्या आहेत.”

हॅरियर आणि सफारी पेट्रोलविषयी

हायपरएफिशन्ट

या नवीन SUVs चा आत्मा आहे, 1.5 L हायपेरियन टर्बो-GDi पेट्रोल इंजिन, जो 170 PS आणि 280 Nm इतका जबरदस्त टॉर्क देतो. जबरदस्त परफॉर्मन्स आणि या सेगमेन्टमधील सर्वोत्तम इंधन-कार्यक्षमता यांची सुंदर सांगड घालून हे इंजिन एक नवीन मापदंड स्थापित करते. या आकारमानाच्या SUV साठी ही विशेष सिद्धी आहे. पॉवरमध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड केलेली नसून शहरातील सफाईदार ड्रायव्हिंग आणि महामार्गावरील आत्मविश्वासपूर्ण गती- या दोन्हीसाठी या गाड्यांना संतुलित करण्यात आले आहे. शिवाय, हे वाहन सुधारित NVH देण्यासाठी कॉन्फिगर करण्यात आले आहे, ज्यामुळे अत्यंत शांत केबिन मिळते, जे दैनंदिन प्रवासात प्रीमियम अनुभवासाठी आदर्श आहे. ही रिफाईनमेंट प्रगत AI आणि ML आधारित ऑप्टिमायझेशनद्वारा समर्थित आहे, ज्यामुळे इंजिन मॅनेजमेंट सिस्टम सतत रियल-टाइम ड्रायव्हिंग स्थितीशी समायोजित होत राहते, जेणेकरून पॉवर डिलिव्हरी निर्बाध होते आणि अधिक चांगली कार्यक्षमता मिळते. याचा परिणाम म्हणून एक अशी SUV आपल्यासमोर येते, जी या सेगमेन्टमधील सर्वोत्तम कार्यक्षमता, केबिनची शांतता आणि परफॉर्मन्स प्रदान करते आणि प्रत्येक राईड निर्बाध आणि अत्याधुनिक होते.

हायपरटेक

आतमध्ये, इनोव्हेशनला अग्रस्थान देण्यात आले आहे. हॅरियर आणि सफारी पेट्रोलमध्ये सॅमसंग निओQLED टेक्नॉलॉजीने चालणारा सेगमेन्ट-फर्स्ट 36.9 सेंमी (14.5”) सिनेमॅटिक इन्फोटेन्मेंट स्क्रीन आहे, त्याच्या जोडीला डॉल्बी अॅटमॉस आणि 10-स्पीकरची JBL म्युझिक सिस्टम आहे, जी अत्यंत वेधक थिएटरमॅक्स अनुभव देते. बिल्ट-इन ड्युअल डॅश कॅम आणि DVR सह व्हिजन-X E- IRVM (सेगमेन्ट-फर्स्ट), क्लिअरव्ह्यू ड्युअल कॅमेरा वॉशर (सेगमेन्ट-फर्स्ट), क्लायमेट सिंकसह इंटेली-स्टार्ट आणि ऑटो रिव्हर्स डिप सह VisionSynk मेमरी ORVM यांसारखी सेगमेन्ट-फर्स्ट फीचर्स सुविधा आणि ड्रायव्हिंगमधील सहजता वाढवतात. आधुनिक इन-कार टेक्नॉलॉजीच्या बुद्धिमान सूटद्वारे कनेक्टिव्हिटी आणि नियंत्रण यांची सांगड घालण्यात आली आहे, ज्यामुळे ड्रायव्हर कनेक्टेड राहतो, आणि त्याला आरामदायकता आणि आत्मविश्वास मिळतो.

हायपरप्रीमियम

TMPV चे जागतिक डिझाईन तत्वज्ञान आणि लँड रोव्हर परंपरेतून प्रेरित असलेल्या हॅरियर आणि सफारी या गाड्या शक्ती, स्टाइल आणि आधुनिकतेचे प्रतीक आहेत. त्यांचे बोल्ड डिझाईन प्रतिष्ठा वाढवणारे आहे. या दोन्ही SUVs चा वेगळेपणा दाखवणारा घटक म्हणजे त्यांची रस्त्यावरील ठसठशीत उपस्थिती आणि रस्त्यावरील दमदार स्टान्स. हॅरियर आणि सफारीच्या अत्यंत यशस्वी अशा रेड#डार्क आवृत्तीमुळे तसेच हॅरियरच्या नवीन प्रीमियम नायट्रो क्रिमसन रंगाच्या विकल्पामुळे हा प्रभाव आणखीनच वाढला आहे. R19 अलॉय आणि खास LED DRLs सारखी फीचर्स त्यांचा लुक अधिक ठसठशीत बनवतात. आत, कार्नेलियन रेड आणि ब्लॅक केबिनसह सफारी रेड#डार्क एक प्रीमियम व्हाईब देते तर, हॅरियरमध्ये नवीन प्रकारचे ऑईस्टर व्हाइट आणि टायटन ब्राऊन इंटिरियर आहे, जे गाडीची प्रीमियम गुणवत्ता वाढवते. ही इंटीरियर्स बॉस मोड, हवेशीर आणि दमदार फ्रंट सीट, प्रकाशयोजना आणि पॅनोरॅमिक सनरूफ यांसारख्या फीचर्समुळे उत्कृष्ट लक्झरी देतात. प्रत्येक घटकातून एक बोल्ड, आधुनिक डिझाईन प्रतिबिंबित होते, जे आरामदायकता आणि दर्जा वाढवते

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments