Wednesday, August 26, 2026
Google search engine
HomeUncategorizedशरीरात हृदयाला जसे स्थान तसे रुग्णालयात कॅथलॅबला स्थान नामवंत हृदयरोग तज्ज्ञ डॉ....

शरीरात हृदयाला जसे स्थान तसे रुग्णालयात कॅथलॅबला स्थान नामवंत हृदयरोग तज्ज्ञ डॉ. शिरिष साठे यांचे विचार ‘श्री सरस्वती कराड हॉस्पिटल’ मध्ये अत्याधुनिक कार्डियाक कॅथ लॅबचे उद्घाटन

पुणे, दि. १३ जानेवारी : “शरीरामध्ये जसे ह्यदयाला स्थान असते तसे कुठल्याही सुसज्ज रुग्णालयात कॅथलॅबचे स्थान असते. गेल्या ३५ वर्षात पुण्याची वाढती लोकसंख्या पाहता येथे आरोग्याच्या सुविधा त्या प्रमाणात वाढल्या नाहीत. आज शहरात ७० कॅथलॅब जरी असल्या तरी त्या लोकसंख्येच्या तुलनेत कमीच आहेत.” असे विचार नामवंत ह्दयरोग तज्ज्ञ डॉ. शिरिष साठे यांनी व्यक्त केले.

माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूहाच्या केयर, क्यूअर, हील या तत्वांवर उभारण्यात आलेल्या ‘श्री सरस्वती कराड हॉस्पिटल’(एसएसकेएच) च्या ५व्या मजल्यावरील कार्डिक विभागात अत्याधुनिक ‘कार्डियाक कॅथ लॅब’चे उद्घाटन डॉ. शिरिष साठे व माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

या प्रसंगी सौ. उषा विश्वनाथ कराड, संस्थेच्या सह व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. सुचित्रा कराड-नागरे, विश्वस्त डॉ. वीरेंद्र घैसास, डॉ. उमेश नागरे, संस्थेच्या विश्वस्त व महासचिव प्रा. स्वाती कराड-चाटे, प्रसिद्ध युरोलॉजिस्ट डॉ. संजय कुलकर्णी, डॉ. ज्योत्स्ना

कुलकर्णी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. भातलवंडे, हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. तुषार खाचणे व डॉ. अमोल सहस्त्रबुद्धे यांची प्रमुख उपस्थिती होती.

या नवीन कार्डियाक कॅथलॅबमुळे अ‍ॅजिओग्राफी, अ‍ॅजिओप्लास्टीसह विविध प्रगत हृदयविकार उपचार दिले जातील. येथे अद्यावत तंत्रज्ञान, सुरक्षित प्रक्रिया आणि अनुभवी तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णांना जलद व अचूक उपचार शक्य होईल.

डॉ. शिरिष साठे म्हणाले,” पुणे शहरात ३५ वर्षापुर्वी केवळ ३ कॅथलॅब सेवा उपलब्ध होत्या. पण काळाच्या गरजेनुसार अत्याधुनिक सुसज्ज अशा कॅथलॅबची सुविधा वाढणे गरजेचे आहे. विशेषता कोथरुड परिसरात सुसज्ज कॅथलॅब उपलब्ध झाल्यामुळे आजू बाजूच्या परिसरातील रुग्णांना नक्कीच चांगला फायदा मिळेल.”

प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,” त्याग, समर्पण आणि बलिदानाचे हे प्रतिक म्हणजे श्री सरस्वती कराड रुग्णालयाची निर्मिती. येथे सेवा भाव अत्यंत महत्वाचा असून या रुग्णालयाच्या माध्यमातून जनतेला उत्तम आरोग्य सेवा देण्यासाठी कटीबद्ध आहे. अध्यात्म आणि विज्ञान या दोन शब्दांनी माझ्या जीवनाला नवी दिशा दिली. त्यातून संस्थेची निर्मिती झाली आणि त्यानंतर जगातील सर्वात मोठ्या डोमची निर्मिती, बद्रिनाथ येथील माणा गावात सरस्वती मंदिराची स्थापना, रामेश्वर रुई येथे मानवता तीर्थ भवनाची निर्मिती हे सर्व काही विश्वशांती निर्मितीसाठी माझ्या कडून करुण घेण्यात आले.”

डॉ. सुचित्रा कराड नागरे म्हणाल्या,”नागरिकांना उत्तम कार्डियाक सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी आम्ही सुसज्ज झालो आहोत. ह्दय उपचार सेवेच्या या नव्या पर्वामुळे रुग्णालयात व परिसरात नागरिकांसाठी विश्वासार्ह आणि सर्वसमावेशक ह्दयविकार उपचार केंद्र म्हणून अधिक सक्षम झाले आहे. याचा लाभ गरजू रुग्णांनी घेण्याचे आवाहन त्यांनी केले.”

रुग्णानां जेव्हा गरज पडेल तेव्हा हे हॉस्पिटल नक्कीच त्यांच्या गरजा पूर्ण करेल असा विश्वास डॉ. कुलकर्णी यांनी व्यक्त केला.

यावेळी रुग्णालयातील प्रशासकीय अधिकारी, ह्दयरोग विभागातील तज्ज्ञ डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी व कोथरुड परिसरातील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थि

त होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments