Wednesday, August 26, 2026
Google search engine
HomeUncategorizedपुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने अनुज्ञप्ती व वाहनासंबंधीकामकाजाच्या पूर्वनियोजीत वेळेत बदल

पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने अनुज्ञप्ती व वाहनासंबंधीकामकाजाच्या पूर्वनियोजीत वेळेत बदल

पुणे, दि. 13: महानगरपालिका क्षेत्रात १५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीकरिता निवडणूक क्षेत्रातील मतदारांना मतदान करण्यासठी सुट्टी जाहीर असून याबाबत महाराष्ट्र शासनाची अधिसूचना क्रमांक सार्वस-११२५/प्र.क्र.२२९/जपुक (२९), ६ जानेवारी २०२६ जारी करण्यात आलेले आहे.

 

ज्या अर्जदारांनी सारथी व वाहन या प्रणालीवर अनुक्रमे अनुज्ञप्ती व वाहनासंबंधी कामकाजासंबंधीचे (आयडीटीआर, आळंदी रोड व दिवे कार्यालय येथे) १५ जानेवारी २०२६ रोजीची पूर्वनियोजीत वेळ घेतलेली आहे, अशा अर्जदारांनी २२ जानेवारी २०२६ यापर्यंत कोणत्याही दिवशी कार्यालयीन वेळेत उपस्थित राहून आपले अर्ज सादर करावे, अशा अर्जदारांची दिनांक १५ जानेवारी २०२६ रोजीची पुर्वनियोजित वेळ ग्राह्य धरली जाणार आहे, अशी माहिती सहायक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments