पुणे, दि. १३: महानगरपालिका क्षेत्रात १५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीकरिता निवडणूक क्षेत्रातील मतदारांना मतदान करण्यासठी सुट्टी जाहीर असून याबाबत महाराष्ट्र शासनाची अधिसूचना क्रमांक सार्वस-११२५/प्र.क्र.२२९/जपुक (२९), ६ जानेवारी २०२६ जारी करण्यात आलेले आहे.
ज्या वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण तपासणीचे कामकाज १५ जानेवारी २०२६ ऐवजी १६ जानेवारी २०२६ रोजी होणार आहे. तसेच शिकाऊ अनुज्ञप्ती चाचणी व पक्की अनुज्ञप्ती चालक चाचणीकरीता १५ जानेवारी २०२६ रोजी पुर्वनियोजित वेळत घेतलेल्या घेतलेल्या उमेदवारांची शिकाऊ अनुज्ञप्ती चाचणी व पक्की अनुज्ञप्ती चालक चाचणी ही १९ ते २३ जानेवारी २०२६ या कालावधीत घेण्यात येणार आहे,अशी माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
000


