Wednesday, August 26, 2026
Google search engine
HomeUncategorizedकिमान आधारभूत किंमत खरेदी योजनेकरिता शेतकरी नोंदणी 31 मार्च 2026 पर्यंत सुरु

किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेकरिता शेतकरी नोंदणी 31 मार्च 2026 पर्यंत सुरु

पुणे, दि. 13 (जिमाका, वृत्तसेवा) : जुन्नर येथील प्रादेशिक कार्यालयाअधिनस्त जुन्नर तालुक्यांत पारगाव तर्फे मढ, खेळ तालुक्यात डेहणे व आंबेगाव तालुक्यात तळेघर येथे धान व भरडधान्याची किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेचा लाभ देण्याकरिता खरेदी केंद्रे सुरु करण्यात आली आहे, या योजनेचा अधिकाधिक लाभ घेण्याकरिता शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर जाऊन 31 मार्च 2026 पर्यंत नोंदणी करावी असे आवाहन प्रादेशिक व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ, जुन्नर यांनी केले आहे.

 

किमान आधारभूत किंमत खरेदी योजना राबविण्यासाठी आदिवासी क्षेत्रात महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित, नाशिक यांची मुख्य अभिकर्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या योजनेत एफएक्यु दर्जाचे धान व भरडधान्याची खरेदी केली जात असून शेतकऱ्यांना हमीभावाचा लाभ देणे हा उद्देश आहे. हंगाम 2025-2026 साठी धान “अ”चा दर 2 हजार 389 रुपये व साधारण धानाचा दर 2 हजार 369 रुपये निश्चित करण्यात आला आहे. खरेदीचे चुकारे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातील.

 

नोंदणीसाठी सातबारा व आठ-अ उतारा (चालू हंगामातील पीक नोंद), बँक पासबुक, आधारकार्ड, अॅग्रीस्टॅकवरील फार्मर आयडी आणि बँक केवायसी आवश्यक आहेत, असेही श्री. बनसोडे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments