शासकीय दूध योजनेतील सेवा निवृत्त विद्युत प्रभारक *कै. लक्ष्मणसिंह बुधेसिंह राजपूत* (हेंदरूण ता.जि. धुळे) हल्ली मुक्काम वलवाडी, धुळे यांचे आज दि. १४ जानेवारी २०२६ रोजी पहाटे २ वाजता दीर्घ आजाराने निधन झाले आहे. ते ८० वर्षांचे होते.
ते २००३ साली धुळ्यातील शासकीय दूध योजनेतून विद्युत प्रभारक या पदावरून सेवानिवृत्त झाले होते. शासकीय दूध शितकरणातील ते तज्ञ होते. तत्कालीन शासकीय दूध योजनांमधील राज्यातील सर्व शितकरण यंत्रणांच्या दुरुस्तीसाठी त्यांना पाचारण केले जात. त्यांनी शहादा, धुळे, नंदुरबार, वणी (दिंडोरी) , वाशी, खालापूर, संगमनेर, अहिल्यानगर येथील शासकीय दूध योजनांमध्ये विविध पदांवर काम केले होते.
डी. वाय. पाटील विद्यापीठ, नवी मुंबई येथील प्रा. डॉ. जसवंतसिंह राजपूत, व नंदुरबार चे जिल्हा माहिती अधिकारी रणजितसिंह राजपूत यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले,मुली, जावाई नातवंडे असा परिवार आहे.
००००००००००


