Tuesday, August 25, 2026
Google search engine
HomeUncategorizedग्राहक पेठ आणि पारले कंपनीच्या वतीने चित्रकला स्पर्धा उत्साहात

ग्राहक पेठ आणि पारले कंपनीच्या वतीने चित्रकला स्पर्धा उत्साहात

शालेय विद्यार्थ्यांच्या स्पर्धेत विविध शाळांचा उल्लेखनीय सहभाग ; बड्स इंटरनॅशनल स्कूल प्रथम, न्यू इंग्लिश मिडियम स्कूल द्वितीय

 

पुणे : ग्राहक पेठ आणि पारले कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चित्रकला स्पर्धेत बडस इंटरनॅशनल स्कूलने प्रथम क्रमांक पटकावला, तर न्यू इंग्लिश मिडियम स्कूल, शनिवार पेठने द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला.

 

स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा सदाशिव पेठेतील भावे प्राथमिक शाळेच्या सभागृहात पार पडला. यावेळी पारले चे झोनल सेल्स मॅनेजर उमेश कामत, रीजनल सेल्स मॅनेजर अनुपम सरकार, कार्तिक शहा, ग्राहक पेठ च्या उपाध्यक्षा संध्या भिडे, कार्यकारी अध्यक्ष सूर्यकांत पाठक यावेळी उपस्थित होते.

 

सूर्यकांत पाठक म्हणाले, पारले कंपनी आणि ग्राहक पेठ यांच्या वतीने चित्रकला स्पर्धेचे आयोजन मागील बारा वर्षांपासून दरवर्षी केले जाते. यंदा १३२०० विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते. शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या शालेय स्पर्धेत इयत्ता निहाय अ, ब आणि क गटात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

 

अ गटात एस. पी. एम. इंग्लिश मिडियम स्कूलची शुभदा जाधव हिने प्रथम क्रमांक पटकावला. न्यू इंग्लिश मिडियम स्कूल, शनिवार पेठ येथील प्रज्वल शेलार आणि माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालयातील अवनी जाधव यांनी द्वितीय क्रमांक तर तेजस देशपांडे, न्यू इंग्लिश मीडियम स्कूल आणि अनुश्री पाचंगे यांनी तृतीय क्रमांक पटकावला. अमृता विद्यालयाची तनिष्का चौधरी, एच. एन. सी. पी. हायस्कूल ची समीक्षा गायकवाड, श्री स्वामी समर्थ माध्यमिक विद्यालय, इंद्रायणी नगर पार्थ आलम या विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली.

 

ब गटात बड्स इंटरनॅशनल स्कूल, चिखली येथील तेजल पाटील हिने प्रथम क्रमांक मिळवला. अमृता विद्यालयच्या श्रेया चिरमाडे आणि संत जिजाबाई कन्या विद्यालय, देहू येथील गौरी टोपे हिने द्वितीय क्रमांक पटकावला. डी. ई. एस. सेकंडरी स्कूल पुणे (सकाळ) शुभ्रा भुतडा हिला तृतीय क्रमांक मिळाला. अहिल्यादेवी हायस्कूल फॉर गर्ल्स, शनिवार पेठची भूमिका सातपुते आणि पोदार इंटरनॅशनल स्कूल चिंचवड ची सेजल पाटील यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

 

क गटात बड्स इंटरनॅशनल स्कूल, चिखली येथील सनिधी वाडकर आणि न्यू इंग्लिश मिडियम स्कूल, शनिवार पेठ येथील पूर्वा कानेकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक एस. पी. एम. इंग्लिश मिडियम स्कूलची भूमि रामोळे आणि बड्स इंटरनॅशनल स्कूलची दृष्टी मोहिते हिने द्वितीय पटकावला. न्यू पुणे पब्लिक स्कूलच्या सानवी रानवडे हिला तृतीय क्रमांक मिळाला. अभिषेक विद्यालय ची. वैदेही सुतार, पोदार इंटरनॅशनल स्कूल ची अनुष्का किंगे आणि डी. आय. सी. एस. इंग्लिश मिडियम स्कूल आर्या परदेशी या विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली. उमेश कामत, अनुपम सरकार, शिवराम हाके यांनी मनोगत व्यक्त केले. निखिल आचार्य यांनी आभार मानले.

 

———————————————————–

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments