Tuesday, August 25, 2026
Google search engine
HomeUncategorizedपरिवर्तन स्टार्ट अप ग्रँट्स च्या ९ व्या पर्वा अंतर्गत एचडीएफसी बँके तर्फे...

परिवर्तन स्टार्ट अप ग्रँट्स च्या ९ व्या पर्वा अंतर्गत एचडीएफसी बँके तर्फे समाजावर परिणाम करणार्‍या स्टार्ट अप्स करता दिले जाणार २० कोटी रुपयांचे अनुदान

प्राधान्याने परिणाम करणार्‍या क्षेत्रातील १० उपक्रमांना करणार सहाय्य

 

· आघाडीच्या संस्थांतील इन्क्युबेटर्स ना सुध्दा सहकार्य करण्यासाठी भागीदारी

 

 

 

एचडीएफसी बँक या भारतातील आघाडीच्या खाजगी क्षेत्रातील बँके तर्फे आज त्याच्या आर्थिक वर्ष २६ च्या परिवर्तन स्टार्ट अप्स ग्रँट्स कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली, हा उपक्रम समाजावर सकारात्मक परिणाम करणार्‍या नाविन्यांना सहकार्य करत असतो. गेल्या काही वर्षांपासूनच्या उपक्रमांकडून अनुभव प्राप्त केल्यानंतर आता हा उपक्रम आता १० प्राधान्यक्रम असलेल्या क्षेत्रांना सहकार्य करणार असून यांत पर्यावरणातील नाविन्य, कृषी आणि शाश्वत जीवनव्यापन, उत्पादन आणि एमएसएमईतील नाविन्य, वित्तीय समावेशन, लैंगिक वैविध्य आणि समावेशकन तसेच नवीन अशा एआय आणि डीप टेक्नॉलॉजी इत्यादींचा समावेश आहे.

 

 

 

आर्थिक वर्ष २६ मध्ये एचडीएफसी बँक परिवर्तन तर्फे २० कोटी रुपयांचे नॉन डायल्युटिव्ह ग्रँट्स देण्यात येणार असून यामुळे साधारणपणे पायलट्स, वैधता आणि अर्ली स्टेज स्केल अप ला मदत होऊ शकेल.

 

 

 

आर्थिक वर्ष २६ च्या या पर्वा मध्ये आणखी एक विशेष घटना असून १० वर्षे पूर्ण होत असतांना ही भागीदारी आता विविध क्षेत्रातील प्रतिथयश संस्थांच्या इन्क्युबेटर्स बरोबरही करण्यात येणार आहे.

 

 

 

परिवर्तन स्टार्ट अप ग्रँट्स प्रोग्राम हा उपक्रम इन्क्युबेटरवर आधारीत, पोर्टफोलिओ वर आधारीत मॉडेल नुसार काम करत असून या अंतर्गत भागीदार इन्क्युबेटर्स प्रोग्रामचे डिझाईन, स्टार्टटप ची पोहोच, मुल्यांकन, मार्गदर्शन, देखरेख आणि परिणामाचे रिपोर्टिंग वर लक्ष केंद्रित करतो.

 

 

 

आर्थिक वर्ष २६ वरील प्रमुख लक्ष देण्यात येणारी केंद्रे

 

आधीच्या पर्वातील अनुभवाच्या आधारे आर्थिक वर्ष २६ मध्ये हा कार्यक्रम खालील उपक्रमांवर लक्ष केंद्रित करणार आहे-

 

· क्षेत्रानुरुप अगदी सखोल दृष्टिकोन ठेऊन आयआयटी मद्रास कडून डीप टेक, आयआयएससी बंगलोर-एफएसआयडी आणि एसआयएनई मुंबई, आयआयएम बंगलोर सह एनएसआरसीईएल आणि आयआयएम लखनऊ कडून आर्थिक सर्वसमावेशन, टी वर्क्स सह मॅन्युफॅक्चरींग ॲक्सलरेटर, बिट्स पिलानी सह पर्यावरणातील नाविन्य आणि विलाग्रो इन्नोव्हेशन फाऊन्डेशन कडून कचरा व्यवस्थापन

 

· स्टार्ट अपच्या अर्थ पुरवठ्या व्यतिरिक्त, स्थानिक इकोसिस्टमचा विकास करणारे उपक्रम हे पंजाब राज्यात इंडियन स्कूल ऑफ बिझनेस च्या सहकार्याने (आयएसबी) सह स्टार्ट अप पंजाब च्या आय व्हेंचर बरोबरच्या भागीदारीतून सुरु करण्यात येणार आहे.

 

· संपूर्ण भारतासाठी इन्क्युबेटर कपॅसिटी बिल्डिंग प्रोग्रामची सुरुवात ही इंडियन स्टेप आणि बिझनेस इन्क्युबेटर असोसिएशन (आयएसबीए) च्या सहकार्याने करण्यात येणार असून याचे आयोजन डिपार्टमेंट ऑफ सायन्स ॲन्ड टेक्नॉलॉजी (डीएसटी), डीपीआयआयटी -स्टार्ट अप इंडिया, एमईआयटीवाय स्टार्ट अप हब, बीआयआरएसी आणि विविध राज्यांच्या स्टार्ट अप प्रमोशन एजन्सीज च्या सहकार्याने करण्यात येणार आहे.

 

 

 

या घोषणे विषयी बोलतांना एचडीएफसी बँकेचे डेप्युटी मॅनेजिंग डायरेक्टर श्री. कैझाद भरुचा यांनी सांगितले “ परिवर्तन स्टार्ट अप अनुदानांनी क्षेत्रात एक नवीन स्तर निर्माण केला असून हा उपक्रम पर्यावरण आणि सामाजिक आव्हानांना ओळखून त्यावर काम करणार्‍या संस्थां बरोबर काम करतो. आर्थिक वर्ष २०२६ मध्ये, आम्ही या क्षेत्राशी आमचे संबंध अधिक दृढ करत आहोत, परिसंस्था मजबूत करत आहोत आणि संस्थात्मक क्षमता वाढवत आहोत, जेणेकरून स्टार्टअप्सना शाश्वत आणि संरचनात्मक पाठिंबा मिळू शकेल.”

 

एचडीएफसी बँकेच्या ट्रेझरी चे ग्रुप हेड श्री. अरुप रक्षित यांनी सांगितले “ या कार्यक्रमाच्या माध्यमातून असे दिसून येते नाविन्यपूर्ण सामाजिक कार्यक्रमांना अधिक चांगले संस्थात्मक मार्गदर्शन, नेटवर्क आणि संरचनात्मक सहकार्य मिळाल्यावर सकारात्मक परिणाम दिसून येतो. आर्थिक वर्ष २६ च्या या पर्वात हाच दृष्टिकोन पुढे येतो, भारतातील पर्यावरणावर कार्य करणार्‍या, वित्तीय सर्वसमावेशन, डीप टेक्नॉलॉजी आणि जीवनव्यापनावर लक्ष ठेवणार्‍या संस्थां बरोबरच्या भागीदारी मुळे आम्ही सातत्याने विभागातील आमचा सहभाग असाच वाढवत ठेऊ.”

 

 

 

२०१७ मध्ये सुरुवात झाल्या पासून परिवर्तन स्टार्ट अप ग्रँट्स उपक्रमाने ५०० हून अधिक स्टार्ट अप्सना सहकार्य केले असून यांत आर्थिक वर्ष २५ मध्ये ८७ स्टार्ट अप्स चा समावेश आहे, ही भागीदारी संपूर्ण भारतातील १३० हून अधिक इन्क्युबेटर्स च्या सहकार्याने करण्यात आली. एकंदरीत या उपक्रमाच्या माध्यमातून ८५ कोटी रुपयांहून अधिक चे अनुदान देण्यात आले असून त्यांतील जवळजवळ ४० टक्के अनुदान हे टिअर २ आणि टिअर ३ शहरांतील कंपन्यांना देण्यात आले आहे. पोर्टफोलिओ स्तरावर सहकार्य केलेल्या स्टार्ट अप्स ने ९०० कोटी रुपयांहून अधिक चे सहाय्य हे बाहेरील फंडांकडूनही मिळवले असून यांतील अंदाजे ४० टक्के महिलांनी सह संस्थापिका म्हणून काम केले आहे. आर्थिक वर्ष २५ मध्ये या मॉडेल अंतर्गत २० कोटी रुपयांचे भांडवल हे २० इन्क्युबेशन सेंटर्सच्या माध्यमातून उभारले आहे.

 

 

 

आर्थिक वर्ष २६ च्या या पर्वाचे अर्ज हे पार्टनर इन्क्युबेटर्स कडून तपासले जातील आणि ते स्वतंत्रपणे कालावधी आणि अर्जाची अधिक माहिती देतील

.

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments