Tuesday, August 25, 2026
Google search engine
HomeUncategorizedमॅरियट बोनव्‍हाय सदस्‍यांना क्रिकेटचा अद्वितीय आनंद देत आयसीसी मेन्‍स टी२० वर्ल्‍ड कप...

मॅरियट बोनव्‍हाय सदस्‍यांना क्रिकेटचा अद्वितीय आनंद देत आयसीसी मेन्‍स टी२० वर्ल्‍ड कप २०२६ चा रोमहर्षक अनुभव देणार

पुणे, २२ जानेवारी २०२६ – मॅरियट बोनव्‍हाय हा मॅरियट इंटरनॅशनलचा पुरस्‍कार-प्राप्‍त ट्रॅव्‍हल प्‍लॅटफॉर्म यंदा फेब्रुवारीमध्‍ये सदस्‍यांना क्रिकेटचा आनंद देणार आहे, ज्‍यासह त्‍यांना आगामी आयसीसी मेन्‍स टी२० वर्ल्‍ड कप २०२६चा रोमहर्षक अनुभव मिळेल. मॅरियट बोनव्‍हायच्‍या इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल (आयसीसी) सोबत जागतिक सहयोगाचा भाग म्हणून सदस्‍य विशेषत: भारतात व श्रीलंकेमध्‍ये आयोजित करण्‍यात आलेल्‍या इव्‍हेण्‍टसाठी डिझाइन करण्‍यात आलेल्‍या ५०० हून अधिक सर्वोत्तम मॅरियट बोनव्‍हाय मोमेण्‍ट्सचा आनंद घेऊ शकतात.

 

दोन भाग्‍यवान सदस्‍यांना मॅरियट बोनव्‍हाय गोल्‍डन तिकिटासह अद्वितीय अनुभव मिळेल, जेथे दोन व्‍यक्‍तींना स्‍टाइलमध्‍ये आयसीसी मेन्‍स टी२० वर्ल्‍ड कप २०२६ फायनल्‍स पाहण्‍याची सुवर्णसंधी मिळेल. एक गोल्‍डन तिकिट मॅरियट बोनव्‍हाय पॉइण्‍ट्ससह सर्वाधिक बोली लावणाऱ्या सदस्‍याला देण्‍यात येईल, तर दुसरे गोल्‍डन तिकिट जागतिक मॅरियट बोनव्‍हाय स्‍वीपस्‍टेकच्‍या विजेत्‍याला मिळेल. सदस्‍य नसलेले मोफतपणे सदस्‍य बनण्‍यासाठी साइन अप करू शकतात आणि येथे (here) मॅरियट बोनव्‍हाय गोल्‍डन तिकिट जिंकण्‍याची संधी मिळवू शकतात.

 

सदस्‍य त्‍यांच्‍या मॅरियट बोनव्‍हाय पॉइण्‍ट्सचा वापर करत ५०० हून अधिक मॅरियट बोनव्‍हाय मोमेण्‍ट्ससाठी बोली लावू शकतात किंवा पॉइण्‍ट्स रिडिम करू शकतात. यामध्‍ये मॅचडे मॅरियट बोनव्‍हाय हॉस्पिटॅलिटी एक्‍स्‍पीरिअन्‍सेस, सामन्‍यापूर्वी बियॉण्‍ड द बाउंड्री एक्‍स्‍पीरिअन्‍सेस किंवा मॅरियट बोनव्‍हाय अॅन्‍थेम किड्स एक्‍स्‍पीरिअन्‍सेस यांचा समावेश आहे, जेथे ते त्‍यांच्‍या मुलांसोबत संस्‍मरणीय आठवणी निर्माण करू शकतात, राष्‍ट्रगीतादरम्‍यान खेळाडूंसोबत मैदानावर जाऊ शकतात. आजपासून, मॅरियट बोनव्‍हाय मोमेण्‍ट्स जगभरातील सदस्‍यांना ऑनलाइन येथे उपलब्‍ध असतील. प्‍लॅटफॉर्मवर नियमितपणे नवीन अनुभव लाँच करण्‍यात येतील, यामध्‍ये भारत व पाकिस्‍तान यांच्‍यामधील बहुप्रतिक्षित सामन्‍याकरिता सामान्‍य प्रवेश तिकिटांचा समावेश असलेल्‍या १-पॉइण्‍ट ड्रॉप्‍सचा समावेश आहे. दहा १-पॉइण्‍ट ड्रॉप्‍स मिळवण्‍याची संधी आहे, जे २ फेब्रुवारी २०२६ राजी सिंगल मॅरियट बोनव्‍हॉय पॉइण्‍टसाठी रिडिम करता येऊ शकतात.

 

”मॅरियट बोनव्‍हाय व्‍यक्‍तींना आवडणाऱ्या गोष्‍टींच्‍या, प्रेरित करणाऱ्या ठिकाणांच्‍या जवळ नेते, तसेच महत्त्वपूर्ण क्षणांचा आनंद देते. आयसीसीसोबत आमच्‍या जागतिक सहयोगाच्‍या माध्‍यमातून आम्‍ही अत्‍यंत संस्‍मरणीय पद्धतीने आयसीसी मेन्‍स टी२० वर्ल्‍ड कप २०२६ चा रोमहर्षक अनुभव देण्‍यास सज्‍ज आहोत. पुढील रांगेमधील सीट्स व पडद्यामागील घडामोडींपासून प्रीमियम आदरातिथ्‍य, पालक व मुलांमधील उत्‍साहवर्धक अनुभव आणि आमच्‍या मॅरियट बोनव्‍हाय हॉटेल्‍सच्‍या पोर्टफोलिओमधील स्‍टेपर्यंत आम्‍ही संस्‍मरणीय आठवणी निर्माण करत आहोत, ज्‍या या वर्ल्‍ड कपच्‍या अंतिम सामन्‍यानंतर देखील कायम राहतील,” असे मॅरियट इंटरनॅशनलचे चीन वगळता आशिया पॅसिफिकमधील चीफ कमर्शियल ऑफिसर जॉन टूमी म्‍हणाले.

 

”क्रिकेटचा उत्‍साह संपूर्ण जगभरात दिसून येतो. आयसीसीसोबत हा सहयोग ईएमईएमधील आमच्‍या मॅरियट बोनव्‍हाय सदस्‍यांना आयसीसी मेन्‍स टी२० वर्ल्‍ड कप २०२६ साठी भारतात व श्रीलंकेमध्‍ये प्रवास करण्‍याचा सुलभ मार्ग देतो. यामध्‍ये विशेषरित्‍या डिझाइन केलेले प्रवासाचे नियोजन आणि प्रत्‍यक्ष स्‍टेडियममध्‍ये आदरातिथ्‍य व उत्‍साहवर्धक अनुभवांची भर करण्‍यात आली आहे, ज्‍यामुळे सदस्‍यांना क्रिकेटमधील प्रत्‍येक क्षणाचा आनंद घेता येईल. आम्‍ही आमच्‍या सदस्‍यांसाठी सामन्‍याच्‍या दिवसांना संस्‍मरणीय क्षणांमध्‍ये बदलण्‍यास उत्‍सुक आहोत, यामुळे या प्रवासात नवीन क्रिकेट चाहते निर्माण होण्‍यास मदत होईल,” असे मॅरियट इंटरनॅशनलचे युरोप, मध्‍य पूर्व व आफ्रिकेमधील चीफ कमर्शियल ऑफिसर अँड्र्यू वॉटसन म्‍हणाले. उपलब्‍ध मॅरियट बोनव्‍हाय मोमेण्‍ट्सची संपूर्ण माहिती परिशिष्‍टामध्‍ये देण्‍यात आली

आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments