Tuesday, August 25, 2026
Google search engine
HomeUncategorizedपुण्यात 2025 मध्ये ₹7,100 कोटींपेक्षा अधिक मुद्रांक शुल्क संकलन, मागील चार वर्षांतील...

पुण्यात 2025 मध्ये ₹7,100 कोटींपेक्षा अधिक मुद्रांक शुल्क संकलन, मागील चार वर्षांतील उच्चांक: नाइट फ्रँक इंडिया · 2025 मध्ये पुण्यात 1,85,500 हून अधिक मालमत्ता नोंदणी

पुणे, 23 जानेवारी 2024: नाइट फ्रँक इंडिया यांच्या ताज्या मूल्यांकनानुसार, 2025 मध्ये पुण्याच्या रिअल इस्टेट बाजारात एकूण 1,85,657 मालमत्ता नोंदणी झाल्या. यात वर्ष-दर-वर्ष (YoY) 2.3% इतकी सौम्य घट नोंदवली गेली. मात्र, मुद्रांक शुल्क संकलन ₹7,119 कोटी इतके राहिले असून, त्यात वर्ष-दर-वर्ष 0.3% इतकी किरकोळ वाढ दिसून आली. नोंदणी संख्येत घट असूनही, महसूल संकलनाने मागील चार वर्षांतील सर्वोच्च पातळी गाठली आहे. यामागे उच्च किमतीच्या मालमत्तांसाठी वाढलेली मागणी हे प्रमुख कारण ठरले.

 

 

 

मासिक पातळीवर पाहता, डिसेंबर 2025 मध्ये मालमत्ता नोंदणी वर्ष-दर-वर्ष 30% घटून 12,079 युनिट्सवर आली, तर त्याच कालावधीत मुद्रांक शुल्क संकलनात 28% घट नोंदवण्यात आली. डिसेंबर 2024 मधील उच्च आधारामुळे ही वर्ष-दर-वर्ष घट तीव्र वाटत असली, तरी डिसेंबर 2025 मधील नोंदणी संख्या मागील सहा महिन्यांच्या सरासरी 13,406 युनिट्सपेक्षा सुमारे 10% कमी होती. यावरून मागील वर्षीच्या उच्चांकानंतर बाजारात सामान्यीकरण होत असल्याचे दिसून येते, मात्र मूळ मागणीत कोणतीही घसरण झालेली नाही.

 

 

 

मालमत्ता नोंदणी, मालमत्तेचे मूल्य आणि मुद्रांक शुल्क संकलन

 

कालावधी (जानेवारी-डिसेंबर)

 

नोंदणी (युनिट)

 

महसूल (₹ कोटीं)

 

2022

 

139,032

 

4,843

 

2023

 

152,323

 

5,352

 

2024

 

190,025

 

7,098

 

2025

 

185,657

 

7,119

 

वर्ष-दर-वर्ष बदल

 

-2.3%

 

0.3%

 

स्रोत: नाइट फ्रँक रिसर्च

 

 

 

मालमत्ता नोंदणी आणि मुद्रांक शुल्क संकलन

 

कालावधी

 

नोंदणी (युनिट)

 

मुद्रांक शुल्क संकलन (₹ कोटीं)

 

डिसेंबर-24

 

17,348

 

620

 

डिसेंबर-25

 

12,079

 

444

 

वर्ष-दर-वर्ष बदल

 

-30%

 

-28%

 

 

 

 

 

मालमत्तेची नोंदणी, मालमत्तेचे मूल्य आणि मुद्रांक शुल्क संकलन

 

वर्ष

 

महिना

 

एकूण नोंदणी

 

मुद्रांक शुल्क संकलन

 

(₹ कोटीं)

 

2024

 

डिसेंबर

 

17,348

 

620

 

2025

 

जानेवारी

 

17,449

 

638

 

2025

 

फेब्रुवारी

 

19,025

 

713

 

2025

 

मार्च

 

25,495

 

960

 

2025

 

एप्रिल

 

14,421

 

547

 

2025

 

मे

 

12,037

 

426

 

2025

 

जून

 

16,792

 

643

 

2025

 

जुलै

 

14,622

 

648

 

2025

 

ऑगस्ट

 

13,253

 

485

 

2025

 

सप्टेंबर

 

13,557

 

523

 

2025

 

ऑक्टोबर

 

12,693

 

527

 

2025

 

नोव्हेंबर

 

14,234

 

565

 

2025

 

डिसेंबर

 

12,079

 

444

 

स्रोत: नाईट फ्रँक रिसर्च, महाराष्ट्र सरकार – नोंदणी आणि मुद्रांक विभाग (IGR)

 

 

 

 

डिसेंबर 2025 मध्ये सर्व विभागांमध्ये मागणी स्थिर राहिली

 

 

 

डिसेंबर 2024 आणि डिसेंबर 2025 दरम्यान तिकिट आकारांचे वितरण मोठ्या प्रमाणात अपरिवर्तित राहिले. ₹1 कोटीपर्यंत किमतीच्या घरांचा वाटा 85% इतका कायम राहिला असून, यामुळे मध्यम व किफायतशीर श्रेणीतील स्थिर मागणी प्रतिबिंबित होते. ₹1 कोटींपेक्षा जास्त किमतीच्या घरांचा वाटा 15% इतकाच राहिला आहे.

 

 

 

आवासीय मालमत्ता व्यवहारांतील तिकिट आकारानुसार वाटा

 

तिकिटाचा आकार

 

डिसेंबर 2024 मधील वाटा

 

डिसेंबर 2025 मधील वाटा

 

₹25 लाखांपर्यंत

 

29%

 

27%

 

₹25 – 50 लाख

 

29%

 

29%

 

₹50 लाख – 1 कोटी

 

27%

 

29%

 

₹1 कोटी – 2.5 कोटी

 

13%

 

13%

 

₹2.5 कोटी – 5 कोटी

 

2%

 

2%

 

₹5 कोटींपेक्षा अधिक

 

<=1%

 

<=1%

 

स्रोत: नाईट फ्रँक रिसर्च, महाराष्ट्र सरकार – नोंदणी आणि मुद्रांक विभाग (IGR)

 

 

 

शिशिर बैजल, चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर, नाइट फ्रँक इंडिया यांनी सांगितले, “2025 मध्ये पुण्याचा निवासी रिअल इस्टेट बाजार संरचनात्मकदृष्ट्या स्थिर राहिला. या वर्षात एकूण ₹7,119 कोटींचे मुद्रांक शुल्क संकलन झाले असून, ही मागील चार वर्षांतील सर्वाधिक नोंद आहे. एकूण नोंदणीमध्ये वर्ष-दर-वर्ष सौम्य घट दिसून आली असली, तरी उच्च तिकिट आकाराच्या व्यवहारांनी महसूल वाढीस पाठबळ दिले, ज्यातून अंतिम-वापरकर्त्यांच्या मागणीची खोली स्पष्ट होते. वर्षाच्या अखेरीस दिसून आलेली मंदावलेली गती ही मागील वर्षीच्या उच्चांकानंतर झालेल्या सामान्यीकरणाचे द्योतक अधिक आहे, ती कोणत्याही संरचनात्मक मंदीचे संकेत देत नाही. विविध किंमत श्रेणी, अपार्टमेंट आकार आणि मायक्रो-मार्केट्समध्ये व्यवहार सक्रिय राहिल्यामुळे पुण्याचा गृहनिर्माण बाजार संतुलित स्थितीत कायम आहे. तथापि, या गतीची टिकाऊपणा तपासण्यासाठी आगामी काळातील प्रवाहांचे बारकाईने निरीक्षण करणे आवश्यक ठरेल.”

 

 

 

मोठ्या आकाराच्या अपार्टमेंटसाठीची उच्च मागणी कायम

 

 

 

वर्षभर घरांच्या आकाराबाबतची एकूण पसंती स्थिर राहिली. 500 चौ. फूटांखालील युनिट्सचा वाटा 25% वरून किंचित घटून 24% झाला, तर 500 ते 800 चौ. फूट श्रेणी 46% वर स्थिर राहिली. 800 चौ. फूटांपेक्षा मोठ्या घरांचा वाटा 1 टक्क्याने वाढून 30% झाला.

 

 

 

निवासी मालमत्तेच्या व्यवहारांसाठी क्षेत्रफळाचा वाटा

 

चौरस फूट मध्ये क्षेत्रफळ

 

डिसेंबर 2024 मधील वाटा

 

डिसेंबर 2025 मधील वाटा

 

500 पेक्षा कमी

 

25%

 

24%

 

500-800

 

46%

 

46%

 

800-1000

 

13%

 

15%

 

1000- 2000

 

13%

 

12%

 

2000 पेक्षा जास्त

 

3%

 

3%

 

स्रोत: नाईट फ्रँक रिसर्च, महाराष्ट्र सरकार – नोंदणी आणि मुद्रांक विभाग (IGR)

 

 

 

 

 

 

 

 

 

डिसेंबर 2025 मध्ये सेंट्रल पुण्याचा निवासी व्यवहारांमध्ये 67% वाटा होता

 

 

 

डिसेंबर 2025 मध्ये हवेली तालुका, पुणे महानगरपालिका (PMC) आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC) यांचा समावेश असलेल्या सेंट्रल पुण्याने निवासी व्यवहारांमध्ये आपले अग्रस्थान कायम राखले, आणि एकूण बाजारपेठेत 67% वाटा नोंदवला. मावळ, मुळशी आणि वेल्हे यांचा समावेश असलेल्या पश्चिम पुण्याचा वाटा 15% असून तो दुसऱ्या क्रमांकावर राहिला. तर उत्तर, दक्षिण आणि पूर्व पुणे या भागांनी मिळून उर्वरित 18% व्यवहारांमध्ये योगदान दिले.

 

 

 

आवासीय मालमत्ता व्यवहारांसाठी सूक्ष्म बाजारांनुसार वाटा

 

सूक्ष्म बाजार

 

डिसेंबर 2

024 मधील वाटा

 

डिसेंबर 2025 मधील वाटा

 

उत्तर

 

10%

 

8%

 

दक्षिण

 

7%

 

6%

 

पूर्व

 

4%

 

4%

 

पश्चिम

 

15%

 

15%

 

मध्यवर्ती

 

64%

 

67%

 

स्रोत: नाईट फ्रँक रिसर्च, महाराष्ट्र सरकार – नोंदणी आणि मुद्रांक विभाग (IGR)

 

 

 

सूक्ष्म बाजारपेठा

 

झोन

 

तालुका

 

उत्तर

 

जुन्नर , आंबेगाव , खेड

 

दक्षिण

 

भोर , पुरंधर, बारामती, इंदापूर

 

पूर्व

 

शिरूर , दौंड

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments