*
पुणे, दि. ४ : शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील यादी भाग क्र. २३९ ते २४४ मधील राजीव गांधी नगर, जुना तोफखाना व कामगार पुतळा भागातील मतदारांचे मेट्रो प्रकल्पामुळे स्थलांतर झाल्याने त्यांचे मतदान यादीतून नावे वगळण्यात आली आहेत. नावे वगळलेल्या २६६ मतदारांनी ज्या ठिकाणी स्थलांतर झाले आहे त्या ठिकाणी मतदानाबाबत नमुना अर्ज क्र. ६ भरुन नाव नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी दादासाहेव गिते यांनी केले आहे.


