Tuesday, August 25, 2026
Google search engine
HomeUncategorizedराष्ट्रीय शालेय बँड स्पर्धेत महाराष्ट्राचा दैदीप्यमान विजय*

राष्ट्रीय शालेय बँड स्पर्धेत महाराष्ट्राचा दैदीप्यमान विजय*

 

 

पुणे, दि. 25 (जिमाका वृत्तसेवा)

भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालय व संरक्षण मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय शालेय बँड स्पर्धा २०२५-२६ च्या अंतिम फेरीत महाराष्ट्राने दैदीप्यमान यश संपादन केले आहे. संजीवनी सैनिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज, कोपरगाव (जि. अहिल्यानगर) येथील मुलांच्या ब्रास बँड संघाने प्रथम क्रमांक पटकावून राज्याचे नाव राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल केले आहे.

ही अंतिम फेरी दि. २४ जानेवारी २०२६ रोजी नॅशनल बाल भवन, कोटला मार्ग, नवी दिल्ली येथे उत्साहात पार पडली. या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत देशातील १० राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील १६ उत्कृष्ट शालेय बँड संघांनी सहभाग घेतला होता. संगीत सादरीकरण, शिस्त, समन्वय आणि देशभक्तीपर मांडणी या निकषांवर परीक्षकांनी विजेते संघ घोषित केले.

महाराष्ट्रातील संजीवनी सैनिक स्कूलच्या मुलांच्या ब्रास बँड संघाने उत्कृष्ट सादरीकरण करत प्रथम क्रमांक पटकावला. या संघाला संगीत शिक्षक श्री. महेश गुरव तसेच ड्रिल इन्स्ट्रक्टर व कॅम्पस ॲडमिन श्री. विजय भास्कर यांचे मार्गदर्शन लाभले.

तसेच डॉन बॉस्को हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, टागोर नगर, विक्रोळी (पूर्व), मुंबई) येथील मुलींच्या ब्रास बँड संघाने तृतीय क्रमांक मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले. या संघाला श्री. मोहन राव, श्रीम. सुनिता राव व श्रीम. तनुजा राव यांचे मार्गदर्शन लाभले.

याप्रसंगी भारत सरकारचे रक्षा राज्यमंत्री यांच्या हस्ते विजेत्या संघांचा गौरव करण्यात आला. या यशाबद्दल राज्यभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, विद्यार्थ्यांचा कठोर सराव, शिक्षकांचे मार्गदर्शन व पालकांचे सहकार्य यामुळेच हे यश शक्य झाल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे. ही कामगिरी महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांच्या कला, शिस्त व सांस्कृतिक गुणवत्तेचे राष्ट्रीय पातळीवरील प्रभावी उदाहरण ठरली आहे.

 

या उपक्रमास मा. प्रधान सचिव व मा. आयुक्त, शालेय शिक्षण विभाग तसेच मा. श्री. राहूल रेखावार, संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आणि सहसंचालक डॉ. कमलादेवी आवटे यांचे मार्गदर्शन लाभले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments