Tuesday, August 25, 2026
Google search engine
HomeUncategorizedब्रिजस्टोन इंडिया’ची संगीत-आधारित ग्राहक मोहिमेसाठी लोकप्रिय पंजाबी स्टार परमिश वर्मासोबत भागीदारी

ब्रिजस्टोन इंडिया’ची संगीत-आधारित ग्राहक मोहिमेसाठी लोकप्रिय पंजाबी स्टार परमिश वर्मासोबत भागीदारी

पुणे, 27 जानेवारी: ब्रिजस्टोन इंडियाने महत्त्वाच्या प्रादेशिक बाजारांमध्ये ग्राहक संपर्क मजबूत करण्यासाठी आपल्या मोहिमेचा एक भाग म्हणून प्रसिद्ध पंजाबी गायक, अभिनेता आणि युवा आयकॉन परमिश वर्मासोबत नवीन तडाखेबंद/ गतिशील भागीदारीची घोषणा केली आहे.

 

भारताच्या उत्तरेकडे एक जोशपूर्ण सांस्कृतिक आवाज असलेला परमिश वर्मा याचा चाहता वर्ग मोठा असून तो प्रामाणिकपणाच नाही तर ऑटोमोबाईल्सची खरी आवड देखील शेअर करतो. एक सुप्रसिद्ध कार-चाहता, सुरक्षित गतिशीलता आणि जबाबदार पद्धतीने वाहन चालवण्यातील त्याची वैयक्तिक आवड या भागीदारीला ब्रिजस्टोनची कामगिरी, विश्वासार्हता आणि सुरक्षिततेच्या मूलभूत मूल्यांचा नैसर्गिक विस्तार बनवते.

 

वाढती वाहन मालक संख्या आणि तरुण, महत्त्वाकांक्षी ग्राहकांच्या आधाराद्वारे समर्थित, ब्रिजस्टोन इंडियासाठी उत्तर भारत हा एक महत्त्वपूर्ण वाढीचा प्रदेश आहे. संगीत तसेच लोकप्रिय संस्कृती या प्रदेशातील ब्रॅंड पसंतीला आकार देण्यात एक शक्तिशाली भूमिका बजावतात. ज्यामुळे या भागीदारीकरिता परमिश वर्मा या नावाला आपसूकच नैसर्गिक तसेच प्रभावशाली पसंती मिळते.

 

या भागीदारीचा एक भाग म्हणून, परमिश वर्मा ब्रिजस्टोन इंडियासोबत एक कलाकार म्हणून सहयोग करेल, निवडक कॅम्पेनसाठी संगीत-आधारित कथाकथन, गुंतवून ठेवणारे निवेदन आणि सोशल मीडिया-आधारित कंटेंटसाठी योगदान देईल.

 

या भागीदारीबाबत बोलताना, सेल्स-मार्केटिंग- ब्रिजस्टोन इंडियाचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राजीव शर्मा म्हणाले, “उत्तर भारत ही आमच्यासाठी धोरणात्मकदृष्ट्या महत्वाडिची बाजारपेठ आहे. परमिश वर्माची विश्वासार्हता आणि प्रेक्षकांशी असलेले सखोल नात्यामुळे तो ब्रिजस्टोनचे प्रतिनिधित्व करण्यासाठी एक आदर्श भागीदार बनतो. हे सहकार्य आम्हाला ताजे, प्रेरणादायी आणि संबंधित अनुभव मिळवू इच्छिणाऱ्या तरुण ग्राहकांशी अर्थवाही अंगाने जोडण्यास मदत करते.”

 

आपला उत्साह व्यक्त करताना परमिश वर्मा म्हणाले, “ब्रिजस्टोन हा एक असा ब्रँड आहे, ज्यावर लोक सुरक्षितता आणि कामगिरीसाठी विश्वास ठेवतात. गुणवत्तेला महत्त्व देणाऱ्या तसेच ग्राहकांना प्रथम स्थान देणाऱ्या संघटनेशी संबंधित असल्याचा मला अभिमान आहे. या भागीदारीच्या माध्यमातून प्रेक्षकांशी नवीन तसेच अर्थवाही मार्गाने संपर्क साधण्यास मी उत्सुक आहे.”

 

या सहकार्याने, ब्रिजस्टोन इंडियाने देशभरातील ग्राहकांसाठी एक विश्वासार्ह मोबिलिटी पर्याय पुरवठादार म्हणून आपले स्थान बळकट करत असून आपली प्रादेशिक गुंतवणुकीची रणनीती बळकट केली आहे.

 

या सहकार्यात ब्रिजस्टोन E8 वचनबद्धतेचे’भावना’ मूल्य समाविष्ट आहे,*जे उत्साहाला प्रेरणा देण्याचे तसेच गतिशील जगात आनंद पसरवण्यासाठी कंपनीच्या विश्वासाचा आरसा आहे.

 

ब्रिजस्टोन इंडियाविषयी:

ब्रिजस्टोन इंडिया प्रा. ब्रिजस्टोन कॉर्पोरेशनची समूह कंपनी लिमिटेडने 1996 मध्ये आपले कामकाज सुरू केले. मार्च 1998 मध्ये मध्य प्रदेशातील खेडा येथे त्याच्या उत्पादन सुविधेच्या स्थापनेसह, ब्रिजस्टोनने भारतीय रस्त्यांवर भारतीय निर्मित ब्रिजस्टोन टायर चालवण्याचे उद्दिष्ट साध्य केले. 2013 मध्ये चाकण, पुणे येथे आणखी एक सुविधा उभारून त्यांनी आपल्या सुविधांचा विस्तार केला. इंदूर प्रकल्पाने 2023 मध्ये त्याचे 100 मिलियन टायर तयार केले. सुमारे 25 वर्षांहून अधिक कालावधीच्या अल्पावधीतच ब्रिजस्टोन इंडिया प्रा. लिमिटेड ही ओईएम आणि रिप्लेसमेंट या दोन्ही बाजारपेठेतील आघाडीच्या टायर कंपन्यांपैकी एक बनली आहे.

 

ब्रिजस्टोन कॉर्पोरेशनबद्दल:

सुरक्षित आणि शाश्वत गतिशीलतेसाठी उपाय उपलब्ध करण्याच्या त्याच्या कौशल्यावर ब्रिजस्टोन टायर आणि रबर बांधणीमध्ये जागतिक स्तरावर अग्रेसर आहे. टोकियो येथे मुख्यालय असलेली ही कंपनी जागतिक स्तरावर अंदाजे 1,30,000 लोकांना रोजगार देते आणि जगभरातील 150 हून अधिक देशांमध्ये आणि प्रदेशांमध्ये व्यवसाय करते. ब्रिजस्टोन प्रीमियम टायर्सचा वैविध्यपूर्ण उत्पादन पोर्टफोलिओ आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाद्वारे समर्थित प्रगत उपाय उपलब्ध करून देते. ज्यामुळे जगभरातील लोकांची हालचाल, जीवन जगणे, काम करणे आणि खेळण्याची पद्धत सुधारते.

 

ब्रिजस्टोन समूहाने “ब्रिजस्टोन E8 कमिटमेंट” ही आपली कॉर्पोरेट बांधिलकी स्थापित केली, जेणेकरून त्याला त्याचे उद्दिष्ट साध्य करण्यात मदत होईलः “2050 पर्यंत, ब्रिजस्टोन एक शाश्वत समाधान कंपनी म्हणून सामाजिक मूल्य आणि ग्राहक मूल्य प्रदान करत राहील”. ही बांधिलकी भावी पिढ्यांचा विश्वास संपादन करताना व्यवस्थापनाला चालना देण्यासाठी समूहाचा अक्ष म्हणून काम करेल. ‘ब्रिजस्टोन E8 कमिटमेंट’ मध्ये ‘ई’ अक्षराने (ऊर्जा, पर्यावरणशास्त्र, कार्यक्षमता, विस्तार, अर्थव्यवस्था, भावना, सुलभता आणि सक्षमीकरण) सुरू होणारी आठ अद्वितीय ब्रिजस्टोन मूल्ये आहेत, जी समूह, कर्मचारी, समाज, भागीदार आणि ग्राहकांसह एकत्रितपणे ब्रिजस्टोन उद्दिष्टे आणि प्रक्रियांद्वारे निर्माण करण्यासाठी वचनबद्ध असेल, जेणेकरून शाश्वत समाज

घडविण्यात मदत होईल.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments