Tuesday, August 25, 2026
Google search engine
HomeUncategorizedपुण्यात तीन दिवसीय फेव्हीक्रिल आर्ट चॅप्टर प्रदर्शनाचे आयोजन

पुण्यात तीन दिवसीय फेव्हीक्रिल आर्ट चॅप्टर प्रदर्शनाचे आयोजन

पुणे,29 जानेवारी 2026 : भारतातील लोकप्रिय आर्ट ॲन्ड क्राफ्ट ब्रँड असलेल्या फेव्हीक्रिल तर्फे तीन दिवसीय फेव्हीक्रिल आर्ट चॅप्टर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन 30 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2026 दरम्यान राजा रवी वर्मा आर्ट गॅलरी येथे सकाळी 11 ते सायंकाळी 5 पर्यंत सुरू राहणार आहे. हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असणार आहे. या प्रदर्शनात शिक्षण व सहकार्याला प्रेरणा देणाऱ्या स्थानिक कलाकारांकडून सादर होणारी कला प्रदर्शने,संवादात्मक कार्यशाळा,अनुभवाधारित सत्रे तसेच लाईव्ह डेमोंस्ट्रेशन्स यांचा अनुभव घेता येणार आहे.तसेच विद्यार्थी व कला रसिकांसाठी कार्यशाळा व सत्रे असणार आहेत.

 

या प्रदर्शनाचे खास आकर्षण अनिल नायर फॅशन डिझाईन स्टुडिओ या संकल्पनेमागील फॅशन डिझायनर आणि फेव्हीक्रिल कलाकार अनिल नायर हे आहेत.त्यांनी लहानपणापासूनच पिडिलाईट फेव्हीक्रिल ऑल-सरफेस पेंटस्‌‍चा वापर करून कापडांवर उत्कृष्ट कलाकृती सादर केल्या आहेत.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments