गुरूग्राम, भारत – जानेवारी 29, २०२६: सॅमसंग या भारतातील आघाडीच्या ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स ब्रँडने आज आपल्या ‘मेड फॉर इंडिया’ प्लस कॅम्पेनची घोषणा केली, जी ग्राहकांना प्रत्येक वेळी सॅमसंग टेलिव्हिजन खरेदीवर फायदे देते. ग्राहकांच्या मनोरंजनपूर्ण कंटेंट पाहण्याच्या पद्धती आणि खरेदीबाबत अपेक्षांवर आधारित ही वैविध्यपूर्ण ऑफरिंग भारतातील ग्राहकांना मूल्य व स्मार्ट मालकीहक्क अनुभव देण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे. प्लस कॅम्पेनमध्ये प्रगत डिस्प्ले तंत्रज्ञानांसह कन्टेन्ट उपलब्धता, सर्विसबाबत हमी, स्थिर फायनान्सिंग व दीर्घकालीन सॉफ्टवेअर सपोर्ट यांचा समावेश आहे, ज्यासह भारतातील ग्राहकांसाठी भविष्याकरिता सुसज्ज सोल्यूशन्स निर्माण करण्यासाठी सॅमसंगची कटिबद्धता अधिक दृढ झाली आहे.
प्लस कॅम्पेन सॅमसंगच्या नेतृत्वावर आधारित आहे, जेथे सॅमसंग सलग १९ वर्षांसाठी जगातील पहिल्या क्रमांकाचा टीव्ही ब्रँड आहे. या कॅम्पेनमध्ये सॅमसंगच्या क्रिस्टल यूएचडी, निओ क्यूएलईडी आणि ओएलईडी टेलिव्हिजन श्रेणींचा समावेश आहे. ग्राहकांना सॅमसंग टीव्ही प्लस मिळतो, जो मनोरंजन, चित्रपट, बातम्या व प्रादेशिक कन्टेन्टमध्ये १५० हून अधिक मोफत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चॅनेल्स देतो, ज्याकरिता कोणतेही सबस्क्रिप्शन्स किंवा डाऊनलोड्सची गरज नाही.
टेलिव्हिजन्स मोठ्या स्क्रिनवर मनोरंजनाचा सर्वोत्तम आनंद देतात, जेथे पिक्चर दर्जा वाढवण्यासाठी सॅमसंग व्हिजन एआय, दीर्घकाळापर्यंत कार्यक्षमता व प्रासंगिकतेसाठी जवळपास सात वर्षांचे ओएस अपग्रेड्स आहेत.
”’मेड फॉर इंडिया’ प्लस कॅम्पेनमधून आम्हाला भारतातील ग्राहकांबाबत असलेली सखोल माहिती आणि खरेदींमधून उत्तम मूल्याबाबत असलेल्या त्यांच्या अपेक्षा दिसून येतात. आज टीव्ही खरेदी करणाऱ्या ग्राहकांना उच्च दर्जाच्या पिक्चर क्वॉलिटीपेक्षा अधिक बाबी पाहिजेत. त्यांना दीर्घकाळापर्यंत टिकाऊपणा, स्थिरता, स्मार्ट अनुभव अणि विश्वसनीय सेवा पाहिजे. प्लससह आम्ही एकाच ऑफरिंगमध्ये नाविन्यता, सोयीसुविधा व हमी एकत्र आणत आहोत, ज्यामुळे भारतातील कुटुंबांना प्रीमियम टेलिव्हिजनवर अधिक प्रमाणात मनोरंजनाचा आनंद घेता येईल,” असे सॅमसंग इंडियाच्या व्हिज्युअल डिस्प्ले बिझनेसचे वरिष्ठ संचालक विप्लेश डांग म्हणाले.
प्लस परिसंस्थेचा भाग म्हणून ग्राहकांना विक्री-पश्चात अधिक सेवेसाठी सॅमसंग केअर+ मिळेल, तसेच जवळपास पाच वर्षांची वॉरंटी कव्हरेज मिळेल. यामध्ये ५९९ रूपयांपासून सुरू होणाऱ्या दोन वर्षांच्या सर्वसमावेशक वॉरंटीचा समावेश आहे, ज्याला १०० टक्के जेन्यूएन पार्टस् आणि सॅमसंगच्या देशभरातील सर्विस नेटवर्कचे पाठबळ आहे.
या सेवेला पूरक सॅमसंग फायनान्स+ आहे, जे स्थिर व कागदपत्रविरहित फायनान्सिंग पर्यायांसह शून्य टक्के व्याजाचे प्लॅन्स देते. खरेदीमध्ये येणारे अडथळे दूर करण्यासाठी सुलभ फायनान्सिंग प्रक्रिया आहे, तसेच विक्रीच्या वेळी अधिक सोयीसुविधा देण्यात येतात.
प्लस कॅम्पेन भारतातील ग्राहकांच्या मनोरंजनाचा आनंद घेण्याच्या विविध पद्धतींना, मोठ्या स्क्रिन्ससाठी वाढत्या मागणीला आणि विश्वसनीय विक्री-पश्चात्त सपोर्टसाठी गरजेला अनुसरून डिझाइन करण्यात आली आहे. सॅमसंग एआय-समर्थित व्युइंगमध्ये सुधारणा, विस्तारित सॉफ्टवेअर अपग्रेड्स आणि सॅमसंग नॉक्स वॉल्ट सारख्या वैशिष्ट्यांच्या माध्यमातून वापरकर्त्यांचा डेटा व गोपनीयतेसाठी संरक्षण करण्यासाठी सॅमसंग नॉक्स यांना एकत्र करत ग्राहकांना त्यांच्या पैशांचे मोल देते.
या उपक्रमामधून भारतातील कुटुंबांसाठी नाविन्यता, ग्राहक-केंद्रित व दीर्घकालीन मूल्य निर्माण करण्याप्रती सॅमसंगची कटिबद्धता दिसून येते. हा उपक्रम स्क्रिनपलीकडील अर्थपूर्ण सुविधा देत भारतातील टेलिव्हिजन बाजारपेठेतील सॅमसंगचे नेतृत्व अधिक प्र
बळ करतो.


