Saturday, October 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedकलिंगायुद्धाची भूमी धवलीगिरी

कलिंगायुद्धाची भूमी धवलीगिरी

 

 

ओरिसा राज्यात कोणार्कचे सूर्य मंदिर, पुरीचे जगन्नाथ मंदिर आणि भुवनेश्वर चे लिंगराज मंदिर हा पूर्व भारताचा देवस्थानाचा सुवर्ण त्रिकोण पाहण्यासाठी लाखो भाविक, पर्यटक ओरिसाला येतात.याशिवाय ओरिसा मध्ये बऱ्याच काही गोष्टी पाहण्यासारख्या आहेत. येथेच रत्नागिरी,उदयगिरी,ललित गिरी या बौद्ध धर्मीय प्राचीन बौद्ध स्थळांच्या पुरात्विक साईट आहेत.अनेक बुद्ध धम्मिय स्थळ आहेत जे अज्ञात आहेत.

.त्यांचा शोध घेणे क्रम प्राप्त आहे. चक्रवर्ती महान सम्राट अशोकाला बुद्ध धम्माकडे वळविणारी जगप्रसिद्ध कलिंग युद्ध भूमी येथेच आहे तिची आपण या ठिकाणी सफर करूया…

 

 

ओरिसा हा शब्द आपल्या कानावर पडला की धवली गिरी येथील कलिंग युद्धाचे चित्र आपल्या डोळ्यापुढे उभे राहते.भारतातील प्राचीन पूर्वेकडील कलिंग राज्य म्हणजे ओरिसा. आता हे राज्य ओडिसा या नावाने प्रसिद्ध आहे. प्राचीन काळात कलिंग ला उत्कल नावाने सुद्धा ओळखले जात होते. कलिंग हा देश पूर्वी मगध साम्राज्याच्या एक भाग होता.

सम्राट अशोकाने राजकीय आणि आर्थिक कारणाने कलिंग राज्य मौर्य साम्राज्यात विलीन करण्याच्या प्रस्ताव राजा अनंत पद्मनाभ यांना पाठविला. स्वतंत्र गणराज्य असलेल्या या राज्याने प्रस्ताव नाकारला. म्हणून हे युद्ध इसवी सन पूर्व261 ते 265 च्या दरम्यान लढले गेले. म्हणजे आज पासून 2282वर्षांपूर्वी हे युद्ध लढले गेले. अफगाणिस्तान व मध्य आशिया पर्यंत अशोकाची एक छत्री सत्ता निर्माण झाली. सम्राट अशोक युद्धात विजयी झाला तरी त्यांनी या युद्धात झालेल्या प्राणहानीचे दृश्य पाहून हादरून गेला. त्याचा त्याच्यावर इतका खोलवर प्रभाव पडला की त्यांनी दया नदीत आपली तलवार समर्पित करून गौतम बुद्धाच्या धम्माला शरण गेला. विनाशकारी युद्धाने त्याचे मन सुन्न झाले होते.

सम्राट अशोकाने या युद्धानंतर युद्ध करणे सोडले , आणि यातूनच मौर्य साम्राज्याच्या पतनाची सुरुवात झाली. सम्राट अशोक शांतीच्या मार्गावर स्वार होऊन तो धम्म प्रसार ला निघाला. त्यांचे बुद्ध धम्माचे प्रसाराचे काम जगप्रसिद्ध झाले. बुद्ध धम्म त्यामुळे आजही आपणास सगळीकडे बघावयास मिळतो. सम्राट अशोक यांनी देशात ठिकठिकाणी निर्माण केलेली चैत्य ,स्तूप ,विहार, स्तंभ , धर्मशाळा आणि लोकोपयोगी कामे समस्त जनतेला प्रेरणास्त्रोत ठरली . सम्राट अशोकाने आपला मुलगा महेंद्र व मुलगी संघमित्रा या भावंडांना श्रीलंकेत बौद्ध धम्माच्या प्रसारा करिता पाठविले. व विदेशात बौद्ध धम्म पसरला. बुद्ध धम्मामुळेच सम्राट राजर्षी झाला. भारतातील एकमेव राजा अशोका दि ग्रेट झाला.

.

धवलीचा डोंगर चढताना प्रथम नजर सम्राट अशोकाच्या शिलालेखावर पडते. शिलालेख मध्ये कलिंग युद्धातील हानीबाबत,विविध पंथामधील गैरवर्तनाबाबत मजकूर आहे.या शिलालेखा मधील मजकूर वाचून जनतेला वाईट वाटू नये म्हणून त्यातील दोन लेख गाळून त्याऐवजी दोन स्वतंत्र खडकावर लेख कोरण्यात आले या लेखांना कलिंग शीला लेख म्हणतात. सम्राट अशोक प्रजेची, नागरिकांची कशी काळजी घेणारे होते याची प्रचिती हे लेख पाहिल्यावर येते या शिलालेखाचा शोध इसवी सन १८३७ मध्ये इंग्रज लेफ्टनंट किट्टू यांनी लावला डोंगरावरील किंवा शिलालेखाच्या वरच्या भागी म्हणजे लागून असलेल्या गुहेतून अर्धवट कोरलेला हत्ती बाहेर येतानाचे अप्रतिम शिल्प बघावयास मिळते. एक मोठा हत्ती दगड फोडून बाहेर येताना दिसतो म्हणजे हे शिल्प अंधारातून प्रकाशाकडे नेणारा प्रसंग दाखवीत आहे.हत्ती तथागत बुद्धाचे सार्वभौमत्वाचे प्रतीक आहे. या ठिकाणी सम्राट अशोक युद्धापासून परा वृत्त झाले. बौद्ध धम्मा स शरण आले. म्हणून येथील स्थळास अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे. चक्रवर्ती सम्राट अशोक आणि कलिंगाचे राजे पद्मनाभन यांच्यात भीषण युद्ध झाले.वैभव संपन्न असलेले कलिंग राज्य सम्राट अशोकाच्या वादळी आक्रमणापुढे टिकाऊ धरू शकले नाही.सम्राट अशोकाच्या धवलीच्या युद्धात विजय झाला त्यामुळे अफगाणिस्तान व मध्य आशिया पर्यंत सम्राट अशोकाची सत्ता प्रस्थापित झाली. हे प्राचीन भारताच्या इतिहासातील एकमेव भीषण युद्ध ठरले.कलिंग युद्धात एक लाख सैनिकांना वीरगती प्राप्त झाली,दीड लाख सैनिक जखमी झाले तेवढे च सैनिक युद्ध कैदी झाले.कलिंग राज्यातील अनेक कुटुंबे उध्वस्त झाली अनेक गावे बिचिराख झाली.असा युद्धाचा कु इतिहास असलेली घटना ओरिसाच्या राजधानी पासून आठ किलोमीटर अंतरावर स्थित असलेल्या भुवनेश्वर आणि धवली या प्राचीन शहराच्या दरम्यान वाहणाऱ्या दया नदीच्या पात्रात,धवली डोंगर आणि जंगल परिसरात घडली. कलिंग युद्ध झाले. येथील दया नदी, ते डोंगर आणि तो परिसर व ती वनराई विलोभनीय असा परिसर आजही विद्यमान आहे. या ठिकाणावरून संपूर्ण परिसरआपल्याला बघता येतो दया नदीचे पात्र हि दिसते.धवली च्या डोंगरावरील चक्रवर्ती सम्राट अशोकाचा ब्राह्मी लिपीतील जगप्रसिद्ध प्रस्तर लेख कलिंग युद्धाची स्मृती चिरंतन ठेवत आहे. प्रसिद्ध आर्किऑलॉजिस्ट जनरल अलेक्झांडर कमिंग हॅम यांनी या प्रदेशात उत्खनन करून हा प्रस्तर लेख जगापुढे आणला.सन 1929 मध्ये त्यांना हा लेख सापडला. हा शिलालेख आणि डोंगर फोडून बाहेर येणारे हत्तीचे शिल्प केंद्रीय पुरातत्त्व संरक्षण खात्यातर्फे संरक्षित असे मुनामेंट आहे प्रस्तर लेख स्टीलच्या सलाखेंनी सुरक्षित आहे तो पर्यटकांना जिथे लेख आहे तिथे जाऊन जवळून पाहता येतो इथून डोंगरावर येण्यासाठी भक्कम रस्ता आहे येथे वाहन सुद्धा नेता येते.

L सम्राट अशोकाचा शिलालेख आणि प्रसिद्ध हस्ती शिल्प पाहिल्यावर वरच्या भागी डोंगरावर पांढरा शुभ्र भव्य पॅगोडा दिसतो. जपान सरकारने हा पगोडा बांधला. या शांती स्तूपाला फुजी गुरुजी ट्रस्ट नी भक्कम आर्थिक मदत केली. स्तूपाच्या परिसराला कल्पकतेने सजविले आहे. स्तूपाच्या पायऱ्यावर तथागतांच्या पावलांच्या प्रतिकृती आहेत.बोधी वृक्ष ही दिसतो.बुद्धाच्या प्रतिमेसमोर चक्रवर्ती सम्राट अशोक आपली तलवार समर्पित करीत असतानाची प्रतिमा दिसून येते. विहारातून निघणारा जपानी भाषेतील बौद्ध वंदनेचा ध्वनी युद्ध नको बुद्ध हवा,ही भावना तरंगीत करतो.येथील पगोडा वर्धा येथील शांती स्तू पा सारखाच आहे. पगोडाच्या चारी बाजूला सिंहाच्या

प्रचंड मोठ्या वर्तुळाकार मूर्ती आहेत. पगोडा मधील तथागतांची शांत विशाल मूर्ती व सपाट जागेवर चा अशोक स्तंभ मना त धम्म भावना निर्माण करून जातो.

 

दिनांक 13 जानेवारी 2024 रोजी शनिवार असल्यामुळे रस्त्यावर जास्त वाहनाची गर्दी नव्हती. वस्तू संग्रहालय हे बंद दिसली.आम्ही सर्व विद्यार्थी धवलीच्या मार्गावर जाण्यासाठी तवेरा गाडीतून निघालो स्थळ पुरी मार्गावर असल्यामुळे रस्ता तसा चांगला होता काही कळण्याच्या आधीच धवलीचे नयन रम्य स्थळ कधी आले हे कळले नाही भराभर आम्ही गाडीतून उड्या घेतल्या आणि डोंगरावर चढण्याचा प्रयत्न केला थोडे वर जाताना डाव्या बाजूस अवाढव्य शिलालेख दिसला समोर कोरीव हत्तीच्या दर्शनी भाग आणि दया नदी परिसर डोळ्यापुढे येऊ लागला. दुपारचे साडेचार वाजले होते डोंगराच्या थोडे वर बघितले तर वर शांती स्तूप.वरून भुवनेश्वर टेम्पल सिटीचे विहंगम दृश्य दिसत होत. दया नदी परिसर रम्य वाटत होता पण डोळ्यासमोर कलिंग युद्धाचे ते भयानक चित्र तरळू लागले. प्रियदर्शी अशोकाच्या शिलालेखासमोर पर्यटकांची चांगली गर्दी झालीडॉ., प्रा.प्रियदर्शी खोब्रागडे सर शिलालेखा बाबत माहिती सांगू लागले. काही विद्यार्थी तर हत्तीच्या समोर जाऊन सेल्फी घेऊ लागले ही गुंफा शिल्प ओरिसातील सर्वात प्राचीन बौद्ध शिल्प मानले जाते.अंधार पडण्याची वेळ झाल्यामुळे सर्व विद्यार्थी शांती स्तूपाकडे वळले. परंतु या स्थळावरून पाय पुढे सरकत नव्हते मनात साचलेला दुःखाचा डोंगर शांत राहू देत नव्हता.

शांती स्तूपात जाऊन सर्वांनी बुद्ध वंदनेत सहभाग घेतला स्तूपाला प्रदक्षिणा घातली काहींनी शांत राहण्याचा,विश्रांती घेण्याच्या प्रयत्न केला.हा परिसर कलिंगाच्या आठवणी बरोबर बुद्ध धम्मा चे तत्वज्ञान सांगत होता. हे पर्यटन स्थळ म्हणावे की स्मृति स्थळ म्हणावे हा प्रश्न आमच्यापुढे आला. येथील दुकानातून खरेदी करून आम्ही सर्व विद्यार्थी बसनी हळूहळू हॉटेल कडे निघालो.सर्व दूर अंधार झाला मात्र शांती स्तूपातून प्रकाश समोर येत होत.

नरेश मेश्राम

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments