Saturday, October 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedइंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने सस्टेनेबल एव्हिएशन फ्युएल पुरवठ्यासाठी अकासा एअरसोबत केली लेटर...

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने सस्टेनेबल एव्हिएशन फ्युएल पुरवठ्यासाठी अकासा एअरसोबत केली लेटर ऑफ इंटेंटवर स्वाक्षरी

भारतातील अग्रगण्य राष्ट्रीय ऊर्जा कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने विंग्स इंडिया २०२६ दरम्यान भारतातील सर्वात वेगाने वाढणारी विमान कंपनी अकासा एअरसोबत भविष्यात सस्टेनेबल एव्हिएशन फ्युएल(एसएएफ) पुरवठ्याचा शोध घेण्यासाठी लेटर ऑफ इंटेंट (एलओआय) वर स्वाक्षरी केली.

 

या लेटर ऑफ इंटेंट अंतर्गत, एसएएफच्या संभाव्य पुरवठ्यामार्फत एअरलाइनच्या शाश्वततेच्या उद्दिष्टांना पाठिंबा देण्यासाठी दोन्ही कंपन्यांमध्ये सहकार्याचा एक आराखडा तयार करण्याचा प्रस्ताव आहे.

 

एसएएफ हे हवाई प्रवासातून होणाऱ्या जीवनचक्रातील हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण उपाय आहे आणि विमान वाहतूक क्षेत्राच्या नेट-झिरो उत्सर्जनाच्या दिशेने होणाऱ्या संक्रमणामध्ये महत्त्वाची भूमिका बजावेल, अशी अपेक्षा आहे.

 

“हा एलओआय कमी-कार्बन इंधनांचा विस्तार करण्याच्या आणि आमच्या ग्राहकांना त्यांच्या ऊर्जा संक्रमणामध्ये सहाय्य करण्याच्या आमच्या बांधिलकीचे प्रतिबिंब आहे.इंधन उत्पादन,पुरवठा आणि लॉजिस्टिक्समधील आमच्या तज्ज्ञतेचा लाभ घेत, एसएएफ चा लवकरात लवकर वापर सुरू करण्यासाठी आम्ही अर्थपूर्ण भूमिका बजावण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे,” असे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडचे कंट्री हेड (एव्हिएशन बिझनेस) शैलेश धर यांनी सांगितले.

 

या एलओआय नुसार, दोन्ही कंपन्या संभाव्य एसएएफ पुरवठ्याचे प्रमाण, वितरण स्थळे आणि कालमर्यादा यांचे मूल्यमापन करण्यासोबतच मान्यताप्राप्त शाश्वत कच्चा माल आणि उत्पादन पद्धतींच्या वापरावरही संयुक्तपणे काम करती

ल.

 

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments