पुणे, दि. 21 जानेवारी (जिमाका वृत्तसेवा): सारथी व वाहन या प्रणालीवर ज्या अर्जदारांनी अनुज्ञप्ती व वाहनांच्या कामकाजासंबंधी 28 जानेवारी 2026 रोजीची पर्वनियोजीत वेळे घेतलेली आहे अशा अर्जदारांनी 6 फेब्रुवारी 2026 पर्यंत कोणत्याही दिवशी कार्यालयीन वेळेत उपस्थित राहून आपले अर्ज सादर करावे. अशा अर्जदारांची 28 जानेवारी रोजीची वेळ ग्राह्या धरली जाणार आहे असे प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे यांनी कळविले आहे.
0000


