Tuesday, August 25, 2026
Google search engine
HomeUncategorizedकेंद्र प्रमुख विभागीय स्पर्धा परीक्षेचे प्रवेशपत्र संकेतस्थळावर उपलब्ध*

केंद्र प्रमुख विभागीय स्पर्धा परीक्षेचे प्रवेशपत्र संकेतस्थळावर उपलब्ध*

 

 

पुणे, दि. ३०: राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमधील कार्यरत प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे नियुक्ती देण्यासाठी ‘समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-२०२५’चे ३ व ४ फेब्रुवारी २०२६ रोजी ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले असून परीक्षेचे प्रवेशपत्र https://www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.

 

ही परीक्षा दोन्ही दिवस तीन सत्रांमध्ये होईल. प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी १८०० २२२ ३६६/ १८०० १०३ ४५६६ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा अथवा https://cgrs.ibps.in या लिंकवर तक्रार नोंदवावी. प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी आवश्यक असलेला लॉगिन आयडी (रजिस्ट्रेशन क्रमांक) आवेदनपत्रावर उपलब्ध आहे. तसेच पासवर्ड हा संबंधित उमेदवाराची आवेदनपत्रावरील जन्मतारीख आहे. याची सर्व परीक्षार्थींनी नोंद घ्यावी, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी कळविले आहे.

0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments