राष्ट्रीय | 30 जानेवारी 2026 – भारतातील आघाडीचे ऑन-डिमांड कन्व्हिनियन्स प्लॅटफॉर्म Swiggy Ltd (NSE: SWIGGY / BSE: 544285) यांनी आज कॉन्व्हर्सेशनल कॉमर्समध्ये एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठत Model Context Protocol (MCP) चे एकत्रीकरण जाहीर केले आहे. या नव्या उपक्रमाअंतर्गत Swiggy Food, Instamart आणि Dineout या सेवा आता ChatGPT, Claude, Google Gemini यांसारख्या लोकप्रिय AI टूल्सवर थेट उपलब्ध असतील.
या लॉन्चसह Instamart हे MCP स्वीकारणारे जगातील पहिले क्विक-कॉमर्स प्लॅटफॉर्म ठरले आहे. यामुळे वापरकर्ते साध्या, नैसर्गिक भाषेतील कमांड्स वापरून 40,000 हून अधिक उत्पादनांमधून खरेदी करू शकतात. किराणा माल ऑर्डर करणे, फूड डिलिव्हरी, रेस्टॉरंट टेबल बुकिंग, कूपन्स लावणे आणि ऑर्डर ट्रॅक करणे – हे सर्व आता एका संवादातून शक्य होणार आहे.
Model Context Protocol (MCP) ही एक ओपन-सोर्स फ्रेमवर्क आहे जी AI सिस्टीम्सना लाईव्ह डेटा आणि सेवांशी सुरक्षितपणे जोडते. यामुळे वापरकर्त्यांना अॅपमध्ये अनेक स्टेप्स फॉलो करण्याऐवजी थेट आपली गरज व्यक्त करता येते. उदाहरणार्थ, “थाय ग्रीन करीसाठी लागणारी सामग्री ऑर्डर करा” किंवा “मला आवडेल असा बेस्ट रेटिंगचा बिर्याणी ऑर्डर करा” अशी कमांड दिल्यास, AI एजंट संपूर्ण प्रक्रिया स्वतः पूर्ण करतो.
Swiggy चे CTO मधुसूदन राव म्हणाले, “भारतातील दैनंदिन गरजा वेळ, प्रसंग आणि वैयक्तिक पसंतीनुसार बदलतात. कॉन्व्हर्सेशनल कॉमर्समुळे वापरकर्ते केवळ आपली इच्छा व्यक्त करतात आणि उर्वरित सगळे काम AI करतो. यामुळे सोयीसुविधा अधिक सहज, वैयक्तिक आणि आनंददायी बनतात.”
हा MCP उपक्रम भविष्यातील AI-आधारित अनुभवांसाठी पाया घालतो, ज्यामध्ये मील प्लॅनिंग, हेल्थ गोल्स, डायटरी प्रेफरन्सेस आणि प्रसंगानुसार खरेदी यांचा समावेश असेल – तेही पूर्णपणे सुरक्षित आणि प्रायव्हसी-फर्स्ट पद्धतीने


