Tuesday, August 25, 2026
Google search engine
HomeUncategorizedक्लासिक लीजेंड्सने प्रजासत्ताक दिनानिमित्त 'नोमॅड्स' या एकत्रित रायडिंग कलेक्टिव्हखाली जावा, येझदी आणि...

क्लासिक लीजेंड्सने प्रजासत्ताक दिनानिमित्त ‘नोमॅड्स’ या एकत्रित रायडिंग कलेक्टिव्हखाली जावा, येझदी आणि बीएसए रायडर्सना एकत्र आणले

 

 

पुणे, 28 जानेवारी 2026: 26 जानेवारी 2026 रोजी जावा, येझदी आणि बीएसएचे रायडर्स संपूर्ण भारतभर राईडसाठी बाहेर पडले. मोटरसायकलिंगही प्रजासत्ताकासारखेच विविधतेतून निर्माण होणाऱ्या एकतेवर फुलते, या सामायिक विश्वासाने हे रायडर्स एकत्र आले होते. आधुनिक परफॉर्मन्स क्लासिक्स तयार करणाऱ्या क्लासिक लीजेंड्सने या रायडर्ससोबत हा दिवस साजरा करत आपल्या अधिकृत वेबसाइटवर ‘नोमॅड्स: राईड अॅज वन, राईड द लेगेसी’ या नावाने कम्युनिटी पेज लाईव्ह केले. हे नवे पेज रायडर्सना त्यांच्या स्थानिक रायडिंग कम्युनिटीशी (जावा-येझदी-बीएसए रायडर क्लब्स) अधिक जवळ आणण्यासाठी डिझाइन करण्यात आले असून, शोध आणि कनेक्ट होणे आता केवळ एका क्लिकवर शक्य झाले आहे.

‘नोमॅड्स फॉर युनिटी इन डायव्हर्सिटी’ या प्रजासत्ताक दिनाच्या राईड्स जम्मू ते तमिळनाडू, गुजरात ते मणिपूर अशा विविध प्रदेशांमध्ये आणि संस्कृतींमध्ये पसरलेल्या होत्या. जावा, येझदी आणि बीएसए या परफॉर्मन्स क्लासिक्सवरील एकसमान प्रेमामुळे भारताच्या विशाल भूगोलाचे दर्शन घडले. या राईड्समध्ये 2,000 हून अधिक रायडर्स सहभागी झाले होते. यात 20 पेक्षा जास्त स्वतंत्र रायडिंग कम्युनिटीज आणि 150 पेक्षा अधिक डीलरशिप-लीड रायडिंग ग्रुप्स सहभागी होते. विविध वयोगट, व्यवसाय आणि रायडिंग स्टाईल्सचे रायडर्स या उपक्रमात एकत्र आले होते.

सातत्याचे प्रतीक असलेल्या या प्रवासात अनुभवी रायडर्ससोबत प्रथमच टूरिंग करणारे रायडर्स सहभागी झाले होते, तर लेगसी मोटरसायकलींच्या शेजारी जावा, येझदी आणि बीएसए या ब्रँड्सच्या आधुनिक परफॉर्मन्स क्लासिक्स धावत होत्या. स्वतंत्र रायडिंग कम्युनिटीज आणि डीलरशिप-लीड रायडिंग ग्रुप्स आता क्लासिक लीजेंड्सच्या ‘नोमॅड्स’ या रायडिंग कलेक्टिव्हखाली आणखी एकत्रित केले जाणार असून, सर्व ब्रँड्सचे रायडिंग ग्रुप्स ब्रँड्सच्या सामायिक वेबसाइटवर एकत्र आणले जाणार आहेत.

जावा, येझदी आणि बीएसए मधील रायडिंग कम्युनिटीजना सामावून घेणारे नोमॅड्स हे एक असे सामायिक ओळखचिन्ह आहे, जे ब्रँड्स, प्रदेश आणि रायडच्या निवडीपलीकडे जाते. कोणत्याही मोहिमेद्वारे नव्हे, रायडर्सद्वारे उभारलेले नोमॅड्स हे रायडिंगसोबत आपल्या समूहात असण्याचा आनंद, स्वातंत्र्य आणि समावेशकता यांचे प्रतीक आहे. नोमॅड्स वेबसाइटच्या राष्ट्रीय स्तरावरील लॉन्चसाठी प्रजासत्ताक दिन हा अतिशय योग्य दिवस ठरला. या पेजमुळे रायडर्सना त्यांच्या जवळचा रायडिंग क्लब सहज शोधता येईल आणि आपल्या ‘ट्राइब’सोबत अधिक वेळा राईडला जाणे सोपे होईल.

क्लासिक लीजेंड्सचे सह-संस्थापक अनुपम थरेजा म्हणाले, “मोटरसायकलिंगच्या मुळाशी स्वतःच्या प्रकारचे स्वातंत्र्य शोधण्याची ओढ असते. आमचे परफॉर्मन्स क्लासिक्स याच शोधासाठी डिझाइन करण्यात आले आहेत. मात्र, पिढ्यान्‌पिढ्या मोटरसायकलिंगची ओळख ठरवणारी आणखी एक खोल भावना आहे, विशेषतः डिजिटल ओव्हरलोडमुळे माणूस एकाकी होत असलेल्या या काळात – ती म्हणजे कुठेतरी आपलेपणाची भावना. काही दिवस स्वतःसाठी राईड करण्याचे असतात, तर प्रजासत्ताक दिन हा एकत्र राईड करण्याचा असतो. या दिवशी जावा, येझदी आणि बीएसए यांच्या वार्षिक राईड्स विविध रायडर्सना एका घट्ट ट्राइबसारखे एकत्र आणतात. यावर्षी आम्ही केवळ त्यांच्या कथा शेअर करून थांबत नाही, तर आमचे ‘नोमॅड्स’ हे कम्युनिटी पेज लाईव्ह करत आहोत, जे आमच्या प्रत्येक रायडरला, जुना असो वा नवा, त्याच्या जवळची रायडिंग कम्युनिटी शोधण्यास मदत करेल. आमच्या रायडिंग कलेक्टिव्हचे हे नाव सीमांची चाचपणी करण्याची आणि तरीही एका सामायिक उद्देशासाठी एकत्र राहण्याची ओढ दर्शवते, आणि तो उद्देश कदाचित फक्त मोटरसायकलिंगवरील प्रेम असू शकतो.”

नोमॅड्स पेजच्या लॉन्चव्यतिरिक्त, देशभरातील रायडर्सच्या कथा जावा, येझदी आणि बीएसए मोटरसायकल यांच्या सोशल मीडिया हँडल्सवर दिवसभर रिअल-टाईममध्ये शेअर करण्यात आल्या, ज्यातून सहकारी नोमॅड्स सोबत राईड करण्याच्या भावनेला सलाम करण्यात आला.

प्रजासत्ताक दिनाच्या राईड्स या नोमॅड्स, जावा, येझदी आणि बीएसए रायडिंग कम्युनिटीजसाठी एक वार्षिक परंपरा आहे. यावर्षी अधिक मोठ्या आणि एकसंध नोमॅड्स उपस्थितीची नोंद झाली, स्वतंत्र कम्युनिटीजसोबत अधिक सखोल सहकार्य झाले, तसेच नोमॅड्स प्लॅटफॉर्मचा शुभारंभ झाला, जो वर्षभरातील कम्युनिटी राईड्सच्या पलीकडेही ही गती टिकवून ठेवण्यासाठी उभारण्यात आला आहे.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments