Tuesday, August 25, 2026
Google search engine
HomeUncategorizedपुना क्लब बिलियर्ड्स व स्नूकर लीग स्पर्धा 3 फेब्रुवारी पासून रंगणार

पुना क्लब बिलियर्ड्स व स्नूकर लीग स्पर्धा 3 फेब्रुवारी पासून रंगणार

 

 

पुणे, 31 जानेवारी 2026: पुना क्लब लिमिटेड यांच्या वतीने अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा पुना क्लब बिलियर्ड्स व स्नूकर लीग स्पर्धा 2026(पीसीबीएसएल) आयोजन करण्यात आले आहे. हि स्पर्धा पुना क्लब बिलियर्ड्स हॉलमध्ये 3 ते 11 फेब्रुवारी 2026 दरम्यान रंगणार आहे.

 

पत्रकार परिषदेत मनिषा कन्स्ट्रक्शनचे राजन खिंवसरा, पुना क्लबच्या क्रीडा समितीचे अध्यक्ष व लीगचे चेअरमन तुषार आसवानी, शशांक हळबे, कुणाल वासवानी, संजय संघवी, मुकेश संघवी आदी मान्यवर उपस्थित होते.

 

पुना क्लबच्या विविध क्यू स्पोर्टस प्रकारांमधील सर्वात भव्य आणि प्रतिष्ठित स्पर्धा ठरली आहे. यंदाच्या पीसीबीएसएल लीग मध्ये दोन गटांचा समावेश असून प्रत्येक गटात पाच संघांचा समावेश आहे. स्पर्धेचे सामने राऊंड रॉबिन लीग पद्धतीने खेळविण्यात येणार असून प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणार आहेत. एक विशेष बाब म्हणजे या स्पर्धेत 15 रेड स्नूकर, 9रेड स्नूकर, 6 रेड स्नूकर, बिलियर्ड्स आणि अत्यंत लोकप्रिय रुलेट अशा विविध फॉरमॅटचा एकत्रित समावेश असून त्यामुळे सहभागी खेळाडूंबरोबरच प्रेक्षकांसाठी सुद्धा हा रोमांचकारी व चुरशीचा अनुभव ठरणार आहे.

 

मनिषा कन्स्ट्रक्शनचे राजन खिंवसरा व अभिषेक खिंवसरा हे या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक असून सुनील हांडा, मुकेश संघवी, संजय संघवी या सहप्रायोजकांच्या पाठिंब्यामुळे स्पर्धेचा दर्जा, व्याप्ती आणि अनुभव उंचावत जाणार आहे.

 

पुना क्लब लिमिटेडचे अध्यक्ष गौरव गढोक म्हणाले की, पीसीबीएसएल लीग स्पर्धा ही अल्पावधीतच पुना क्लबसाठी सर्वोच्च दर्जाची क्रीडा स्पर्धा ठरली आहे. या स्पर्धेमुळे केवळ क्रीडा क्षेत्रच नव्हे तर क्यु स्पोर्टस या क्रीडा प्रकाराचा विकास तसेच सामाजिक बांधलकीशी आमची असलेली जोड याबरोबरच जागतिक दर्जाच्या स्पर्धा आयोजित करण्याचा अनुभव पुन्हा एकदा सिद्ध होत आहे. ही लीग अधिकच नव्या उंचीवर पोहोचत असल्याबद्दल आम्हाला अधिकचा आनंद होत आहे.

 

मुख्य प्रायोजक मनिषा कन्स्ट्रक्शनचे राजन खिंवसरा व अभिषेक खिंवसरा म्हणाले की, पीसीबीएसएल लीग 2026 स्पर्धेशी जोडले गेल्याबद्दल आम्हाला अभिमान वाटत आहे. हि स्पर्धा एकाचवेळी क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च दर्जा व्यावसायिकता आणि क्यू स्पोर्टस क्रीडा प्रकारांवरील निष्ठा यांचे एकत्रित प्रतिनिधित्व करीत आहे. सर्वोत्तम गुणवत्ता आणि स्पर्धात्मकते बरोबरच असामान्य अशा क्रीडा पर्यावरणाला प्रोत्साहन देणाऱ्या अशा स्पर्धांना आम्ही नेहमीच पाठिंबा देत राहू.

 

पुना क्लबच्या क्रीडा समितीचे अध्यक्ष व लीगचे चेअरमन तुषार आसवानी म्हणाले की, पीसीबीएसएल स्पर्धेचे चौथे सत्र खेळाडूना स्पर्धात्मकता आणि व्यावसायिकता यांचा दर्जा उंचावण्याच्या दृष्टीने संयोजन करण्यात आले आहे. याबरोबरच प्रायोजकांचा भक्कम पाठिंबा अत्यंत रोमांचकारी असे मिश्र फॉरमॅट यामुळे ही स्पर्धा क्यू स्पोर्टस आणि गुणवान खेळाडू यांना नवे व्यासपीठ उपलब्ध करून देणारी ठरणार आहे. म्हणूनच संयोजन समिती या स्पर्धेच्या माध्यमातून उच्च दर्जाची स्पर्धात्मकता आणि खेळाडूंनी दिलेले सर्वोत्तम योगदान यामुळे खास ठरणार आहे.

 

स्पर्धेतील सहभागी दहा संघामध्ये रिओज सोलर एनर्जी(सुनील व साहिल हांडा), मनिषा रॉयल्स (राजन खिंवसरा व अभिषेक खिंवसरा), संघवी शुटर्स(संजय व मुकेश संघवी), नील अँड ओबेरॉय किंग्स(वीरेंदर सिंग ओबेरॉय व इंद्रनील मुजगुले), एएसआर स्ट्रायकर्स(सरीम खान व राजीव राऊत), मनप्रीत अँड जीजीज जॅग्वार्स(मनप्रीत उप्पल व गौरव गढोक), बॉल ब्रेकर्स(विनोद मखिजा), दोराबजी टोरनॅडोज(जहांगीर दोराबजी व डॅनियल दोराबजी), रॉकेटस् (राहुल बग्गा, वैभव शहा), आरएस कॅनन्स(रिकी राजपाल व सिद्धार्थ सणस) यांचा समावेश असून या संघांची चुरस पाहायला मिळणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments