Tuesday, August 25, 2026
Google search engine
HomeUncategorizedमहालक्ष्मी मंदिरातील उत्सव मूर्तींची धान्यतुला व सोने-चांदी पुष्पअर्पण श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग...

महालक्ष्मी मंदिरातील उत्सव मूर्तींची धान्यतुला व सोने-चांदी पुष्पअर्पण श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग तर्फे ४२ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजन

पुणे : सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी मंदिरात आयोजित ब्रह्मोत्सवात उत्सव मूर्तींची धान्यतुला करुन ते धान्य गरजूंना देण्याचा उपक्रम मंदिरात पार पडला. राजस्थान डिडवाना येथील अनंत श्री विभुषित जगतगुरु रामानुजाचार्य झालरिया पीठाधीपती पूज्य श्री श्री १००८ स्वामीजी घनश्यामाचार्य जी महाराज यांच्या हस्ते धान्यतुलेत धान्य व देवीला सोने-चांदी पुष्पअर्पण करुन देवीचरणी सुख-शांतीकरीता प्रार्थना करण्यात आली.

 

श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट, श्री महालक्ष्मी मंदिर सारसबागच्या ४२ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित ब्रह्मोत्सवात मंदिरात विविध कार्यक्रम सुरु आहेत. यावेळी ट्रस्टचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त अ‍ॅड.प्रताप परदेशी, हेमंत अर्नाळकर, नारायण काबरा, प्रविण चोरबेले, भरत अग्रवाल, रमेश पाटोदिया, तृप्ती अग्रवाल यांसह विश्वस्त, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

अमिता अग्रवाल म्हणाल्या, सामाजिक कार्यक्रमांमध्ये मंदिरातील श्री महालक्ष्मी, श्री महासरस्वती, श्री महाकाली, श्री विष्णू या उत्सव मूतीर्ची धान्यतुला करुन ते धान्य गरजूंना देण्याचा उपक्रम यंदा देखील राबविण्यात आला. धान्यतुलेमध्ये विविध प्रकारचे धान्य, तेल, खाद्यपदार्थ, बिस्कीटे व खाऊ ठेवण्यात आला होता.

 

त्यानंतर उत्सवमूर्तीला सोने व चांदीची फुले देखील मान्यवरांच्या हस्ते अर्पण करण्यात आली. धार्मिक कार्यक्रमामध्ये होम-हवन, महाअभिषेक असे विविध कार्यक्रम देखील मंदिरात सुरु आहेत. सर्व कार्यक्रम विनामूल्य खुले असून पुणेकरांनी या महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments