Tuesday, August 25, 2026
Google search engine
HomeUncategorizedजागतिक कर्करोग दिवस मधुमेह व लठ्ठपणामुळे कर्करोगाचा धोका वाढला

जागतिक कर्करोग दिवस मधुमेह व लठ्ठपणामुळे कर्करोगाचा धोका वाढला

 

पुणे,३ फेब्रुवारी 2026 : भारतात विशेष करून तरूण वयात मधुमेह आणि लठ्ठपणाचे वाढते प्रमाण हे चिंताजनक असून यामुळे कर्करोगाची जोखीम देखील वाढत आहे.त्यामुळे मधुमेह व लठ्ठपणाकडे फक्त जीवनशैलीशी निगडीत समस्या म्हणून न बघता गांभीर्याने बघण्याची गरज आहे,असे मत विविध तज्ञांनी व्यक्त केले.

 

4 फेब्रुवारीला जागतिक कर्करोग दिनानिमित्त लवकर निदान व उपचाराचे महत्त्व याबाबत जागरूकता निर्माण केली जाते.

नोबल हॉस्पिटल्स ॲन्ड रिसर्च सेंटर येथील आँकोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ.मिनिष जैन म्हणाले की,चयापचयमधील असंतुलन आणि दीर्घकालीन दाहक स्थिती कर्करोगाच्या पेशींसाठी अनुकूल वातावरण निर्माण करतात. लठ्ठपणा हा एक प्रमुख जोखीम कारक घटक असून सध्या किमान 13 प्रकारच्या कर्करोगांशी असलेल्या जोखमीशी संबंधित आहे. इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता सततच्या दाहक स्थितीला आणखी हातभार लावते आणि कर्करोगाची जोखीम आणखी वाढू शकते.

ते पुढे म्हणाले की,लठ्ठ व सहव्याधी असलेल्या व्यक्तींमध्ये ट्युमर हे जास्त आक्रमक दिसून येतात आणि यामुळे कर्करोगाचे उपचार अधिक गुंतागुंतीचे होतात. उदाहरण द्यायचे झाले तर लठ्ठ व्यक्तींमध्ये केमोथेरपीवाटे दिलेली औषधे चरबी मध्ये साठवून कालांतराने हळूहळू बाहेर येतात.ज्यामुळे हानीकारकता वाढून त्याची परिणामकारकता कमी होऊ शकते. त्याचबरोबर योग्य औषधांचे प्रमाण निश्चित करणे देखील अशा परिस्थितीत आव्हानात्मक होते आणि उपचारांना कमी प्रतिसाद मिळाल्यास परिणामांवर प्रभाव पडू शकतो.

 

डॉ.जैन पुढे म्हणाले की,लठ्ठपणा आणि मधुमेह या आजारांकडे जीवनशैलीशी निगडीत समस्यांपलीकडे पाहणे गरजेचे आहे.योग्य आहार,व्यायाम आणि वजनावर नियंत्रण ठेवल्यास भविष्यातील संभाव्य अनेक आजारांची जोखीम आपण कमी करू शकतो.

 

· कर्करोग उपचारात मानसिक स्वास्थ्य तितकेच महत्वाचे

 

निदान प्रक्रियेतील सुधारणा,कर्करोग या आजाराबाबत एकंदर अधिक प्राप्त झालेले ज्ञान आणि आधुनिक उपचार पर्याय यामुळे परिणामांमध्ये आमुलाग्र सुधारणा होत आहेत.मात्र मनाचा कणखरपणा हा दीर्घकालीन चालणाऱ्या कर्करोग उपचारांदरम्यान अतिशय महत्त्वाचा ठरतो.कर्करोग आणि त्याच्याशी निगडीत शस्त्रक्रियेसह उपचार पर्यायांची साहजिकच रूग्णांमध्ये भीती असते.मात्र योग्य मार्गदर्शन आणि पाठबळ दिल्यास या आव्हानांवर मात केली जाऊ शकते.त्यामुळे उपचारांबरोबरच सायको-आँकोलॉजी या संकल्पनेला महत्त्व प्राप्त

होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments