भारत, ३ फेब्रुवारी २०२६: भारतातील हायरिंग बाजारपेठ झपाट्याने पुढे जात आहे, पण योग्य टॅलेंट मिळणे अधिक आव्हानात्मक होत आहे. लिंक्डइनच्या नवीन संशोधनामधून निदर्शनास येते की, ७४ टक्के रिक्रूटर्सना आता पात्र उमेदवारांचा बराच शोध घ्यावा लागतो, तसेच हायरिंगचे प्रमाण महामारीपूर्वीच्या तुलनेत ४० टक्के जास्त आहे.
यामागील मुख्य कारण म्हणजे रिक्रूटर्सना अर्जांची संख्या आणि उमेदवारांच्या गुणवत्तेमध्ये तफावत दिसून येत आहे. हायरिंग प्रक्रिया अधिक आव्हानात्मक बनली आहे, असे म्हणणाऱ्या रिक्रूटर्सपैकी अर्ध्याहून अधिक रिक्रूटर्स एआय-निर्मित अर्जांमध्ये (५३ टक्के) वाढ झाल्याचे सांगतात , तर अनेक रिक्रूटर्स मागणीदायी कौशल्यांमध्ये सतत कमतरता (४७ टक्के) असल्याचे सांगतात. जवळपास अर्धे रिक्रूटर्स म्हणतात की, खऱ्या अर्जांमधून कमी गुणवत्ता असलेले किंवा दिशाभूल करणारे अर्ज वेगळे करणे त्रासदायक ठरत आहे, ज्यामुळे हायरिंग प्रक्रियेत अडथळा येत आहे (४८ टक्के).
याचा परिणाम म्हणजे कामगार बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात उमेदवारांची संख्या आणि स्पर्धा वाढली आहे. लिंक्डइन प्लॅटफॉर्मच्या डेटामधून निदर्शनास येते की, भारतात प्रत्येक रिक्त पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची संख्या २०२२ पासून दुपटीहून अधिकने वाढली आहे. तसेच, ७२ टक्के प्रोफेशनल्स म्हणतात की, ते २०२६ मध्ये सक्रियपणे रोजगाराचा शोध घेत आहेत. ८५ टक्के प्रोफेशनल्स म्हणतात की, त्यांना या प्रक्रियेला सामोरे जाण्यासाठी सुसज्ज नसल्याचे वाटते.
रिक्रूटर्स एआयचा वापर करत योग्य कौशल्यांचा शोध घेत आहेत, जलदपणे उमेदवारांची नियुक्ती करत आहेत आणि उमेदवारांचा प्रवास अधिक समाधानकारक करत आहेत.
हा वाढता दबाव पाहता रिक्रूटर्स समस्येवरील उपाय म्हणून एआयला प्राधान्य देत आहेत. भारतात एआयचा वापर करणाऱ्यांपैकी ७१ टक्के रिक्रूटर्स म्हणतात की, एआयने त्यांना योग्य कौशल्ये असलेल्या उमेदवारांचा शोध घेण्यास मदत केली आहे, जे त्यांच्याकडून आधी चुकत होते. ८० टक्के रिक्रूटर्स सांगतात की, एआयमुळे उमेदवारांची कौशल्ये सहजपणे जाणून घेता येत आहे. तीन-चतुर्थांशपेक्षा अधिक (७६ टक्के) रिक्रूटर्सचा विश्वास आहे की, एआयमुळे हायरिंग प्रक्रिया जलदपणे होत आहे.
भविष्याकडे पाहता एआयचा अवलंब वाढण्याची शक्यता आहे. भारतातील १० पैकी ८ रिक्रूटर्स म्हणतात की, ते हायरिंग ध्येयांना पाठिंबा देण्यासाठी, अर्जांचे मूल्यांकन करण्यासाठी आणि अव्वल टॅलेंटची निवड करण्यासाठी एआयचा वापर वाढवण्याचे नियोजन करत आहेत. तसेच, बहुतांश रिक्रूटर्स देखील २०२६ मध्ये मुलाखतींच्या प्राथमिक चाचणीसाठी एआयचा वापर वाढवण्याचे नियोजन करत आहेत, यामागे त्यांचा विश्वास आहे की यामुळे रिक्रूटर व उमेदवार यांच्यामध्ये उत्तम संवाद होईल (८३ टक्के), हायरिंग प्रक्रिया जलद होईल (८३ टक्के) आणि उमेदवारांमधील कौशल्यांबाबत अधिक माहिती मिळेल (८२ टक्के).
लिंक्डइन टॅलेंट सोल्यूशन्सच्या एपीएसी व्हीपी रूची आनंद म्हणाल्या, ”हायरिंग प्रक्रियेत मोठा रचनात्मक बदल होताना दिसत आहे, जेथे आता फक्त मोठ्या पदव्या किंवा पूर्वीची पदे बघण्याऐवजी उमेदवाराची कौशल्ये आणि क्षमता यांना महत्त्व दिले जात आहे. एआयशिवाय हा परिवर्तन घडवून आणणे आव्हानात्मक आहे. जबाबदारीने वापरल्यास एआय रिक्रूटर्सना योग्य कौशल्ये लवकर ओळखण्यास, निवडीमधील अडथळे कमी करण्यास आणि अधिक सातत्यपूर्ण व निष्पक्ष मूल्यांकन प्रक्रिया तयार करण्यास मदत करते. लिंक्डइनमध्ये आम्ही हायरिंग असिस्टण्ट सारखे एआय टूल्स निर्माण करण्याला प्राधान्य देतो, जे हायरिंग प्रक्रियेत निर्णय घेण्यास मदत करते. यामुळे रिक्रूटर्सना गुणवत्तेशी किंवा उमेदवाराच्या अनुभवाशी तडजोड न करता योग्य टॅलेंट अधिक वेगाने आणि आत्मविश्वासाने शोधता येईल.”
रिक्रूटर आणि नोकरीसाधकांमधील उत्तम संबंधासाठी पारदर्शकता महत्त्वाची आहे
हायरिंग प्रक्रियेत एआयचा वापर केला जात असताना उमेदवारांकडून असलेल्या अपेक्षा देखील वाढत आहेत. प्रोफेशनल्सची हायरिंगमध्ये घेतल्या जाणाऱ्या निर्णयाबाबत स्पष्टपणे माहिती उपलब्ध असण्याची इच्छा आहे, ज्यामधून पारदर्शकतेसाठी मागणी दिसून येते. भारतातील अर्धे रिक्रूटर्स (५० टक्के) म्हणतात की, त्यांच्यावर त्यांच्या प्रक्रियेत व हायरिंग प्रक्रियेत, विशेषत: उमेदवारांचे स्क्रिनिंग व शॉर्टलिस्टिंग करताना एआयचा वापर कसा केला जातो, याबाबत स्पष्टीकरण देण्याचा दबाव आहे.
लिंक्डइन रिक्रूटर्सना जलदपणे व स्मार्टपणे नियुक्ती करण्यास कशाप्रकारे मदत करत आहे?
भारतातील रिक्रूटर्सच्या गती व गुणवत्ता या मुलभूत आव्हानांचे निराकरण करण्यासाठी लिंक्डइन एआय-समर्थित हायरिंग टूल्समध्ये सतत गुंतवणूक करत आहे, जे टॅलेंट शोधण्याच्या प्रक्रियेबाबत संवादाला पुढे नेण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहेत:
● सॅलरी अँड नोटिस पीरियड फिल्टर्ससह सदस्यांना त्यांचे अपेक्षित वेतन व नोटिस कालावधी शेअर करता येते. ही माहिती फक्त रिक्रूटर्सना दिसते, ज्यामुळे हायरिंग प्रक्रियेच्या सुरूवातीला होणारी अनावश्यक चर्चा आणि वेळखाऊ प्रक्रिया कमी होण्यास मदत होते.
● हायरिंग असिस्टण्ट हे लिंक्डइनचे रिक्रूटर्ससाठी एआय एजंट एएमडी, ऑरेकॉन, चीवी, एक्स्पेडिया ग्रुप, फॅबलेटिक्स, जेकब्स, सिमेन्स व विप्रो अशा कंपन्यांना जलदपणे पात्र टॅलेंटचा शोध घेण्यास मदत करत आहे. या वैशिष्ट्याचा वापर करणाऱ्या कंपन्यांनी दिलेल्या अहवालानुसार, त्यांना आता ६२ टक्के कमी प्रोफाइल्सची तपासणी करावी लागते, ज्यामुळे प्रत्येक पदासाठी नियुक्ती करण्याकरिता चार तासांपेक्षा जास्त वेळेची बचत होत आहे. इनमेल (InMail) स्वीकारण्याच्या दरामध्ये ६९ टक्के वाढ झाली आहे. हायरिंग असिस्टण्ट जागतिक स्तरावर इंग्रजीमध्ये उपलब्ध आहे.
● लिंक्डइन हायरिंग प्रो हे एआय एजंट आहे, जे लघु व्यवसायांना अधिक जलदपणे पात्र उमेदवार शोधण्यास, शॉर्टलिस्ट करण्यास आणि त्यांच्यापर्यंत पोहोचण्यास मदत करते. या वैशिष्ट्याचा सुरूवातीच्या वापरामधून निदर्शनास आले आहे की, ६० टक्के नियोक्ते पहिल्या आठवड्यात मुलाखतीसाठी एखाद्याचा शोध घेण्याकरिता या उत्पादनाचा वापर करत आहे, तर वेळेची बचत होत असल्याचे सांगणाऱ्या व्यवसायांचा दर आठवड्याला सरासरी ६ तासांहून अधिक वेळेची बचत होत आहे. नवीन वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे:
○ सुरूवातीच्या स्क्रिनिंगसाठी एआय-पॉवर्ड इंटरव्ह्यू.
○ अपडेटेड, संवादात्मक इंटरफेस, जे हायरिंग गरजा सहजपणे स्पष्ट करते आणि उमेवारांच्या शोधाला अधिक उत्तम करण्यासाठी अभिप्राय देते.
○ प्रत्यक्ष पात्र उमेदवारांशी कनेक्ट होण्यासाठी एआय-असिस्टेड पर्सनालाइज्ड इन
मेल्स.


