Tuesday, August 25, 2026
Google search engine
HomeUncategorizedजिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीकरिता २९ लाख ७२ हजार मतदार-जिल्हाधिकारी जितेंद्र...

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीकरिता २९ लाख ७२ हजार मतदार-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी*

 

 

*येत्या ७ फेब्रुवारी रोजी मतदानाचा हक्क बजाविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे मतदारांना आवाहन*

 

पुणे, दि.३: जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२६ करिता जिल्ह्यात ३ हजार ६०५ मतदान केंद्र असून याअंतर्गत पुरुष १५ लाख २२ हजार २५६, स्त्री १४ लाख ५० हजार १४ आणि इतर ९१ असे एकूण २९ लाख ७२ हजार ३५९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे, येत्या ७ फेब्रुवारी २०२६ रोजी होणाऱ्या मतदानाकरिता जिल्ह्यातील अधिकाधिक मतदारांनी मतदान केंद्रावर जावून मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.

 

बारामती तालुक्यात २ लाख ६४ हजार ६४२, मावळ २ लाख ३१६, मुळशी १ लाख ७३ हजार ४०१, शिरुर ३ लाख १ हजार ७८६, हवेली २ लाख ५१ हजार ५३३, दौंड २ लाख ७३ हजार १००, इंदापूर ३ लाख २१ हजार २, पुरंदर १ लाख ८९ हजार ४०३, भोर १ लाख ५४ हजार ८१०, वेल्हे ५५ हजार २३०, आंबेगाव १ लाख ८४ हजार ५२, जुन्नर ३ लाख ७ हजार २६० आणि खेड तालुक्यात २ लाख ९५ हजार ८२४ असे एकूण २९ लाख ७२ हजार ३५९ मतदार आहेत.

 

बारामती तालुक्यात २९९, मावळ २४३, मुळशी २२७, शिरुर ३३७, हवेली २६३, दौंड ३१७, इंदापूर ४००, पुरंदर २३५, भोर २३७, वेल्हे १०५, आंबेगाव २३९, जुन्नर ३६६ आणि खेड ३३७ तालुक्यात असे एकूण ३ हजार ६०५ मतदान केंद्र आहेत. यामध्ये प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे १३ आदर्श व महिला मतदान केंद्र आहेत, अशी माहिती श्री. डुडी यांनी दिलीआहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments