Tuesday, August 25, 2026
Google search engine
HomeUncategorized.पू. जगद्गुरू स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामींचे  पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना...

.पू. जगद्गुरू स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामींचे  पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना आशिर्वाद

 

 

नांदणीचे प.पू. जगद्गुरू स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांनी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना आज आशीर्वाद दिले.

 

सांगली जिल्ह्यातील नांद्रे येथील श्री १००८ भगवान महावीर दिगंबर जैन मंदिराच्या वतीने श्रीमत जिनेंद्र भगवान पंचकल्याण प्रतिष्ठा महोत्सव २०२६ आयोजित करण्यात आला आहे. या मंगलमय सोहळ्यास उपस्थित राहून राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी जैन मुनींचे आशीर्वाद घेतले.

 

यावेळी प.पू. जगद्गुरू स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांनी आशीर्वाद देताना सांगितले की, आपल्या मंत्रिमंडळाच्या वतीने आणि भारतीय जनता पक्षाच्या वतीने जैन समाजाप्रती श्रद्धा, भक्ती, समर्पण वृद्धिंगत होत राहो आणि समाजाचे आपल्याकडून सुटावेत. तसेच जैन समाजाची श्रद्धा, भक्ती, प्रेम वाढत राहो! अशी मंगलमय भावना व्यक्त करतो.

 

पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सव हा जैन समाजाचा अतिशय महत्त्वाचा आहे. या सोहळ्यात सहभागी होऊन मनाला अपार समाधान मिळाले, अशी भावना ना. पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.

 

यावेळी जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीत कदम, भाजप नेते शेखर इनामदार आणि पृथ्वीराज पवार उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments