नवी दिल्ली, २ फेब्रुवारी २०२६– अॅक्सिस मॅक्स लाईफ इन्शुरन्स लिमिटेड पूर्वाश्रमीची मॅक्स लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (“अॅक्सिस मॅक्स लाईफ”/“कंपनी”) या कंपनीने मुथूट मायक्रोफिन लिमिटेडसोबत एक धोरणात्मक भागीदारी केली आहे. या भागीदारीचे उद्दिष्ट भारतातील वंचित टियर २ आणि टियर ३ बाजारपेठांमध्ये जीवन विम्याची व्याप्ती वाढवण्याचे आहे. त्यामुळे देशभरातील लाखो कुटुंबांना आवश्यक आर्थिक संरक्षण मिळेल.
या सहकार्याच्या माध्यमातून अॅक्सिस मॅक्स लाईफ मुथूट मायक्रोफिनच्या व्यापक कर्ज फ्रँचायझीचा आणि शेवटच्या टप्प्यापर्यंत असलेल्या व्याप्तीचा फायदा घेऊन मोठ्या, आर्थिकदृष्ट्या सक्रिय ग्राहक आधाराशी जोडली जाईल. भागीदारीचे उद्दिष्ट जीवन विमा उपाययोजना थेट क्रेडिट लाइफसायकलमध्ये समाविष्ट करून ग्राहकांच्या भविष्यातील आकांक्षांचे रक्षण करण्यासाठी सुरक्षा जाळे प्रदान करण्याचे आहे. ही भागीदारी जबाबदाऱ्या सुरक्षित करून उपजीविका चालवण्यासाठी कर्जाचा वापर करणाऱ्या महिलांच्या उद्योजकीय भावनेला बळकटी देण्याचाही प्रयत्न करेल. कर्जाची उपलब्धता व्यवसाय वाढीस चालना देईल तर अॅक्सिस मॅक्स लाईफच्या जीवनविमा उपाययोजना ही प्रगती अनपेक्षित आर्थिक जोखमींपासून सुरक्षित असल्याची खात्री करतात.
अॅक्सिस मॅक्स लाईफचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुमित मदन म्हणाले, “ही भागीदारी टियर २ आणि टियर ३ बाजारपेठांमध्ये आर्थिक संरक्षण वाढवण्याच्या आमच्या दीर्घकालीन वचनबद्धतेचे प्रतिबिंब आहे. मायक्रोफायनान्स यंत्रणेत मुथूट मायक्रोफिनचा समावेश झाल्यामुळे आम्हाला अशा विभागांपर्यंत पोहोचणे सहज शक्य होईल जिथे आर्थिक सहभाग वाढत आहे, परंतु संरक्षणाच्या गरजा पूर्ण होत नाही. या सहकार्याच्या माध्यमातून आम्ही उपजीविकेचे रक्षण करणारे आणि जीवनातील अनिश्चिततेमुळे आर्थिक प्रगती खंडित होणार नाही याची खात्री करणारे साधे, सुसंगत संरक्षण उपाय देऊन एक विचारशील आणि शाश्वत उपस्थिती निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवतो. ते विशेषतः एकाच प्राथमिक कमावत्या व्यक्तीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांसाठी उपयुक्त ठरेल”.
ही भागीदारी सुरूवातीला सूक्ष्म विमा आणि समूह क्रेडिट लाईफ उत्पादनांवर लक्ष केंद्रित करेल. त्याची रचना विशेषतः कर्ज देयके कव्हर करून कुटुंबांना सुरक्षित करण्यासाठी केली गेली आहे. नजीकच्या भविष्यात कंपनी आपल्या वाढत्या ग्राहक वर्गासाठी हमी उत्पन्न आणि बचत-संबंधित संरक्षण उत्पादनांसह अतिरिक्त उपाय सादर करण्याची योजना आखत आहे.
दुर्गम भागात मोठ्या प्रमाणात स्वीकृती शक्य करण्यासाठी या दोन्ही कंपन्या बहुआयामी धोरणाद्वारे सुलभ अनुभव देण्यास प्राधान्य देतील. फील्ड टीम स्थानिक संवादाद्वारे कठीण विमा संकल्पना सोप्या करून सांगण्यावर लक्ष केंद्रित करतील. त्यासोबत समाजात जागरूकता खोलवर रूजवून विश्वास निर्माण करण्यासाठी प्रत्यक्ष प्रशिक्षण सत्रेही आयोजित केली जातील.
हा भागीदारी विमा हा एक-वेळच्या व्यवहाराऐवजी सुरक्षिततेसाठी एक मौल्यवान पाया म्हणून पाहिला जाईल याची खात्री करण्यासाठी वचनबद्ध असून तो अर्थपूर्ण आर्थिक समावेश घडवून आणेल आणि “२०४७ पर्यंत सर्वांसाठी विमा” या राष्ट्रीय ध्येयात योगदान देईल.


