*[ दि ४ फेब्रुवारी २०२६, रोजी पुणे येथे राष्ट्रीय माता रमाई महोत्सव–२०२६ मध्ये शेतकरी चळवळीतील ४७ वर्षांच्या संघर्षाची दखल घेत संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विठ्ठल राजे पवार यांना “संविधान कृषिरत्न पुरस्कार–२०२६” जाहीर करण्यात आला. संविधान व कायद्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ऐतिहासिक न्याय मिळवून देणाऱ्या त्यांच्या कार्याचा हा राष्ट्रीय गौरव असून, शेतकरी हितासाठीचे त्यांचे समर्पण प्रेरणादायी असल्याचे आयोजकांनी नमूद केले. “शेतकऱ्यांसाठी १५० एकर हून अधिक पडीक शेतजमीन विकून संघर्ष करणाऱ्या विठ्ठल राजे पवार यांना राष्ट्रीय रमाई माता स्मारक समितीच्या वतीने ”संविधान कृषिरत्न पुरस्कार घोषित!” समितीचे मुख्य समन्वय विठ्ठलराव गायकवाड, शैलेंद्र मोरे आरपीआय अध्यक्ष यांची माहिती.]*
*पुणे /मुंबई/दिल्ली, विशेष बातमीपत्र.*
*पुणे दिनांक : ०४ फेब्रुवारी २०२६,.*
राष्ट्रीय रमाई माता स्मारक पुणे येथे आयोजित ‘माता रमाई महोत्सव–२०२६, अंतर्गत १ ते ७ फेब्रुवारी दरम्यान विविध सामाजिक, सांस्कृतिक व वैचारिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवातील प्रमुख कार्यक्रम ०२ फेब्रुवारी २०२६ रोजी राष्ट्रीय रमाई माता भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक, वाडिया कॉलेज, पुणे येथे ०१ फेब्रुवारी २०२६ पासून दररोज उत्साहात संपन्न आहे, महोत्सवाचा आज दुसरा दिवस होता.
या राष्ट्रीय महोत्सवाचे स्मारक समितीचे मुख्य संयोजक माननीय विठ्ठलराव गायकवाड असून आरपीआयचे अध्यक्ष श्री. शैलेंद्र मोरे यांच्यासह अनेक मान्यवर सदस्य म्हणून सहभागी आहेत. कार्यक्रमात अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ श्रीपाल सबनीस यांच्या शुभहस्ते विविध क्षेत्रातील आरपीआयचे अध्यक्ष शैलेंद्र मोरे यांच्यासह विविध मान्यवरांचा आज २ फेब्रुवारी रोजी सन्मान करण्यात आला.
याच ऐतिहासिक व्यासपीठावर शेतकरी चळवळीतील संघर्षशील नेतृत्व आणि संविधानिक मार्गाने शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणारे ज्येष्ठ नेते, श्रद्धेय युगपुरुष शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष – विठ्ठल राजे पवार यांना ‘राष्ट्रीय रमाई माता आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने *“संविधान कृषिरत्न पुरस्कार – २०२६”* जाहीर करण्यात आला.
*🌾 ४७ वर्षांचा संघर्ष – शेतकऱ्यांसाठी समर्पित जीवन.*
विठ्ठल राजे पवार यांनी गेल्या ४७ वर्षांच्या केवळ सामाजिक शेतकरी चळवळीतील कार्यकाळात केवळ आंदोलने, न्यायालयीन लढेच उभारले नाहीत – तर स्वतःचे सर्वस्व शेतकऱ्यांसाठी अर्पण केले आहे. याबाबत आरपीआयचे अध्यक्ष शैलेंद्र मोरे यांनी आपल्या भाषणात अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती दिली – “विठ्ठल राजे पवार यांनी हृदय युगपुरुष शरद जोशी यांच्या सन २०१५ चे दुर्दैवी निधनानंतर शेतकरी चळवळ उभी करण्यासाठी आणि टिकवण्यासाठी ते आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्यासाठी आपल्या वडिलोपार्जित तसेच कुटुंबाने कमावलेल्या दीडशेहून अधिक एकर शेतजमिनीची विक्री केली. स्वतःचे घरदार, संपत्ती बाजूला ठेवून शेतकरी हितासाठी त्यांनी जे योगदान दिले आहे – ते एका वेगळ्या प्रकारचे दान आहे. हे दान सामान्य माणसाला अशक्यप्राय असे आहे. म्हणूनच हे कार्य ऐतिहासिक आणि आदर्शवत आहे.”
*🏠 २०१५ पासून कुटुंबापासून दूर – केवळ शेतकऱ्यांसाठी आयुष्य समर्पित ची घोषणा..*
*पुढे बोलताना शैलेंद्र मोरे म्हणाले –“गेल्या १० ते १२ वर्षांपासून विठ्ठल राजे पवार आपल्या कुटुंबापासून दूर राहून, केवळ शेतकरी चळवळ आणि आंदोलनांसाठी कार्यालयातच वास्तव्यास आहेत. अख्ख्या भारत भरातील शेतकरी चळवळीचा, राष्ट्रीय पीछडा वर्ग, अर्थात एनयूबीसी महासंघ नवी दिल्ली, महा ऍग्रो एफपीसी लि महाराष्ट्र राज्य., ग्लोबल ऍग्रो फाउंडेशन ट्रस्ट महाराष्ट्र, सफाई कामगार महासंघ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, आणि अत्ता राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय एग्रीकल्चरल चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज भारत चे चेअरमन पदी नियुक्ती हा सर्व, कारभार ते एकहाती सांभाळतात. श्रद्धेय युगपुरुष शरद जोशी यांच्या दुर्दैवी जाण्यानंतर ते गेल्या १२/१३ वर्षांपासून कुटुंबीय जीवनाचा त्याग करून शेतकऱ्यांसाठी कार्य करणे हे अत्यंत मोठे योगदान आहे.”
त्यांनी पुढे अत्यंत भावनिक माहिती देताना सांगितले की – “विठ्ठल राजे पवार यांनी चळवळीत काम करत असताना अनेक आघात सहन केले. त्यांच्यावर चार वेळा आणि अख्ख्या कुटुंबावर दोन वेळा प्राणघातक हल्ले झाले, अनेक संकटे आली – तरीही त्यांनी लढा सोडला नाही. ते स्वतः सांगतात की, ‘आता उरलेले आयुष्य हे बोनस असून ते पूर्णपणे श्रद्धेय युगपुरुष शरद जोशी यांचे उर्वरित कार्य पूर्ण करण्यासाठी आणि शेतकऱ्यांसाठी समर्पित आहे.’”
*⚖️ संविधान आणि कायद्याच्या माध्यमातून ऐतिहासिक न्यायलढे..*
*विठ्ठल राजे पवार यांनी भारतीय संविधानातील कलम १९, कलम २१, आयपीसी अॅक्ट, सहकार कायदा, पणन कायदा, वीज अधिनियम, विमा संरक्षण कायदा यांसह विविध कायद्यांचा आधार घेत शेतकऱ्यांसाठी आणि सहकार क्षेत्र वाचवण्यासाठी ऊस किमतीवर लावलेल्या 25 हजार कोटी रुपयांच्या इन्कम टॅक्स मुक्ती साठी देखील मोठे ऐतिहासिक लढे उभारले, .*त्यांच्या कार्यकाळातील काही महत्त्वपूर्ण यश – महाराष्ट्र राज्यातील सहकारी साखर कारखान्यांचे, ‘ऊस किमती, वरील २५,००० हजार कोटी रुपयांच्या इनकम टॅक्सला स्थगिती, केंद्र सरकारने सर्व इन्कम टॅक्स मुक्त केला. २०१३-१४ मधील अतिवृष्टी गारपिठ ग्रस्त शेतकऱ्यांसाठी दाखल केलेल्या जनहित याचिकेचे माध्यमातून ४२,००० कोटी रुपये, थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले, तसेच मुंबई उच्च न्यायालय आणि राज्य अन्न आयोगाच्या माध्यमातून कृषीपंपांसाठी ५२,००० कोटी रुपयांची वीज बिल मुक्ती, शेतात पेरलेल्या सर्व चं पिकांना विमा संरक्षणा,सह सुमारे सव्वा दोन लाख कोटी रुपयांची मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात, राज्य व राष्ट्रीय पातळीवर १३ जनहित याचिकांद्वारे शेतकऱ्यांच्या बाजूने झालेल्या कोर्ट निर्णयाच्या माध्यमातून मिळवून दिलेले आहेत. शेतकऱ्यांची सिबिलची अट कायमस्वरूपी रद्द व्हावी तसेच ऊस पिकाला तसेच दूध, सोयाबीन कापसाला आणि शेतात पिकणाऱ्या सर्व प्रकारच्या शेतमालाला गॅरंटी एम एस पी साठी चा लढा केंद्र सरकारच्या दरबारी सध्या सुरू आहे..*
हे सर्व यश संविधानिक कायदेशीर मार्गाने मिळवून देणे ही त्यांच्या कार्याची ऐतिहासिक पावती आहे असे बोलताना आरपीआय अध्यक्ष शैलेंद्र मोरे यांनी सांगितले.
*यावेळी 🎤 विठ्ठल राजे पवार यांचे मनोगत.*
*पुरस्कार घोषणेबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना विठ्ठल राजे पवार म्हणाले – “मला यापूर्वी अनेक पुरस्कार मिळाले आहेत. परंतु *‘संविधान कृषिरत्न पुरस्कार’* हा माझ्या आयुष्यातील भारतरत्न पुरस्कारापेक्षा ही सर्वात मोठा सन्मान आहे. हा सन्मान रमाई आंबेडकर राष्ट्रीय स्मारक आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचा, श्रद्धेय शरद जोशी यांच्या विचारांचा आणि भारतीय शेतकऱ्यांच्या संघर्षाचा, राष्ट्रीय स्मारक रमाई माता महोत्सव समितीने केलेला सन्मान हा राज्याने देशातील शेतकऱ्यांचा मोठा सन्मान आणि विजय आहे.”
*ते पुढे म्हणाले –* “माझे उरलेले संपूर्ण आयुष्य मी ऋध्देय युगपुरुष शरद जोशी यांचे शेतकरी कर्जमुक्ती आणि सर्व प्रकारच्या शेतमालाला गॅरंटी एम एस पी बेसलेट हमीभाव या अपुरे राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी राष्ट्रीय पीछडा वर्ग, आदीवाशी गोर गरीब शेतकऱ्यांसाठी समर्पित केलेले आहे. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती, तसेच शेतकऱ्यांवर लाभलेली बेकायदेशीर *सि-बिल अट, मुक्ती* आणि शेतामध्ये उगवणाऱ्या सर्व प्रकारच्या शेतमालाला कायदेशीर हमीभाव (Guaranteed MSP) मिळवून देण्यासाठी संविधानिक कायदेशीर मार्गाने माझा लढा अखेरपर्यंत सुरू राहील.”
*🌐 विठ्ठल राजे पवार यांची सध्याची जबाबदारी..*
राष्ट्रीय अध्यक्ष – शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटना
राष्ट्रीय अध्यक्ष – शरद जोशी विचारमंच शेतकरी कामगार एम.एस. फाउंडेशन, चेअरमन – राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय एग्रीकल्चरल चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (भारत), देशभरातील २३ ऊन अधिक राज्यात पाच केंद्रशासित प्रदेशात आणि १२० हून अधिक शेतकरी-सामाजिक संस्थांचे मार्गदर्शक. यावेळी या कार्यक्रमास उपस्थित मान्यवर माननीय मुख्य समन्वय विठ्ठलराव गायकवाड, आरपीआयचे अध्यक्ष शैलेंद्र मोरे,, प्रो. लोकशाहीर बाबासाहेब जाधव, सामाजिक कार्यकर्ते संदीप बर्वे , शेतकरी संघटनेचे अनिकेत गागडे , बाळासाहेब वर्पे पाटील, श्रीमती विजया सोनवणे, राजू दिवार, सुनील सोनवणे, माऊली भोसले, सुधाकर गायकवाड, यांच्यासह असंख्य सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. विठ्ठल राजे पवार यांनी संविधान, कायदा आणि आंदोलन या तिन्ही मार्गांनी उभारलेला संघर्ष – हा भारतीय शेतकरी चळवळीतील सुवर्णअध्याय आहे. त्यांना मिळालेला राष्ट्रीय रमाई माता महोत्सव समिती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक समितीच्या वतीने दिला जाणारा २०२६ चा “संविधान कृषिरत्न पुरस्कार” हा केवळ एका व्यक्तीचा सन्मान नसून श्रद्धेय युगपुरुष शरद जोशी विचारमंच शेतकरी कामगार एम एस फाउंडेशन व शेतकरी संघटना महासंघ महाराष्ट्र राज्यातील– संपूर्ण भारतीय शेतकरी समाजाचा गौरव आहे.


