Tuesday, August 25, 2026
Google search engine
HomeUncategorizedटोयोटा किर्लोस्कर सुंदरम ऑटोमोटिव्ह सोल्यूशन्सने बंगळूर येथे आपले पहिले “TSERV Select” मल्टी-ब्रॅंड...

टोयोटा किर्लोस्कर सुंदरम ऑटोमोटिव्ह सोल्यूशन्सने बंगळूर येथे आपले पहिले “TSERV Select” मल्टी-ब्रॅंड सर्व्हिस आउटलेट सुरू केले

किर्लोस्कर सिस्टम्स, TSSF ग्रुप आणि टोयोटा किर्लोस्कर मोटर यांच्या संयुक्त उपक्रमाद्वारे एका नवीन ग्राहक-केंद्रित सर्व्हिस प्लॅटफॉर्मची सुरुवात

 

 

पुणे, 4 फेब्रुवारी 2026: टोयोटा किर्लोस्कर सुंदरम ऑटोमोटिव्ह सोल्यूशन्स प्रा. लि. ने आज बंगळूर येथे “TSERV Select” या आपल्या पहिल्या मल्टी-ब्रॅंड रिटेल सर्व्हिस आउटलेटचे उद्घाटन केल्याचे जाहीर केले. टोयोटा किर्लोस्कर सुंदरम ऑटोमोटिव्ह सोल्यूशन्स प्रा. लि. हा किर्लोस्कर सिस्टम्स प्रा. लि., त्रिचूर सुंदरम संथानम फॅमिली (TSSF समूह) आणि टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रा. लि. (TKM) यांचा संयुक्त उपक्रम आहे.

 

पहिले “TSERV Select” आउटलेट के आर पुरम, बंगळूर येथे सुरू झाले असून ते आधुनिक डायग्नॉस्टिक क्षमता आणि कुशल मनुष्यबळाने सुसज्ज आहे. “TSERV Select” टोयोटा किर्लोस्कर सुंदरम ऑटोमोटिव्ह सोल्यूशन्सच्या मालकीच्या आउटलेट्सचे प्रतिनिधित्व करते, जे इन्फ्रास्ट्रक्चर, गुणवत्ता, सुरक्षा आणि ग्राहक अनुभवावर भर देतात. मार्केटची क्षमता आणि विश्वासार्ह, उच्च-दर्जाच्या वाहन सर्व्हिस प्रदात्यांसाठी असलेली वाढती प्राथमिकता यास अनुसरून देशातील महत्त्वाच्या शहरांमध्ये आपला विस्तार करण्याची या संयुक्त उपक्रमाची योजना आहे.

 

कंपनीने राजेश मेनन यांची अध्यक्ष स्थानी नेमणूक केली आहे. ऑटोमोबाइल क्षेत्रातील विविध कामांमध्ये 35 वर्षांपेक्षा अधिक अनुभव असेलेल श्री. मेनन भारताच्या बदलत्या ऑटोमोटिव्ह सर्व्हिस क्षेत्राशी सुसंगत राहून एक स्केलेबल, ग्राहक-केंद्रित सर्व्हिस नेटवर्क उभे करण्यासाठी कंपनीचे नेतृत्व करतील.

 

“TSERV Select” बरोबरच “TSERV” ट्रेडमार्क अंतर्गत तृतीय पक्षी मल्टी-ब्रॅंड सर्व्हिस आउटलेट्सचे एक व्यापक नेटवर्क आहे, जे व्यापक पोहोच आणि प्राप्यतेसाठी भारतीय ग्राहकांना मदत करेल आणि एकसमान सर्व्हिस मानकांची खातरजमा करेल आणि दुसरीकडे विविध बाजारपेठांमध्ये उपस्थिती वाढवेल, जी सध्या 150 वर आहे.

 

प्रस्तुत घोषणेविषयी टिप्पणी करताना किर्लोस्कर सिस्टम्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्रीमती गीतांजली किर्लोस्कर म्हणाल्या, “आमच्या पहिल्या सर्व्हिस आउटलेटचे उद्घाटन हा एक ग्राहक-केंद्रित ऑटोमोटिव्ह सर्व्हिस प्लॅटफॉर्म उभारण्याच्या मार्गातील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. भारतीय ग्राहक दिवसेंदिवस पारदर्शकता आणि विश्वास यांना अधिकाधिक महत्त्व देऊ लागले आहेत. त्यामुळे विविध वाहन ब्रॅंड्समध्ये दर्जेदार आणि विश्वसनीय सेवा देण्यावर आमचा भर आहे.”

 

TSSF समूहाचे डायरेक्टर श्री. श्रीवत्स राम म्हणाले, “या सुविधेच्या लॉन्चिंगमधून व्यावसायिक वाहन सर्व्हिस अधिक सहजप्राप्य आणि किफायतशीर बनवण्याबाबतची आमची वचनबद्धता दिसून येते. ग्राहकांच्या अपेक्षा आणि सुनियोजित सर्व्हिस पर्यायांची उपलब्धता यांच्यातील दरी भरून काढत मालकीच्या संपूर्ण प्रवासात मूल्य प्रदान करणारी विश्वसनीय सोल्यूशन्स सादर करण्याचा आमचा उद्देश आहे.”

 

टोयोटा किर्लोस्कर मोटरचे डेप्युटी मॅनिजिंग डायरेक्टर श्री. तदाशी असाझुमा म्हणाले, “पहिल्या “TSERV Select” आउटलेटची सुरुवात हा एक लक्षणीय टप्पा आहे. यामधून एका सशक्त आणि समर्थ स्थानिक भागीदारीच्या माध्यमातून टोयोटाचे सर्व्हिस तत्त्वज्ञान पुढे नेण्याची आमची सामाईक वचनबद्धता दिसते. एक मोबिलिटी सोल्यूशन्स कंपनी म्हणून आमचा फोकस वाहनांच्या पलीकडे जाऊन विश्वसनीय, एंड-टू-एंड मालकी आणि सर्व्हिस अनुभव प्रदान करण्यावर आहे, जो ग्राहकांना मोठ्या प्रमाणात आनंद देईल. शिस्तबद्ध प्रक्रिया, कुशल टीम्स आणि गुणवत्तेकडे निरंतर लक्ष देऊन आमचे ध्येय ग्राहकांना एक सुसंगत, विश्वासार्ह आणि उच्च मानक असलेला सर्व्हिस अनुभव प्रदान करण्याचे आहे, एक असा अनुभव जो, दीर्घकालीन विश्वास निर्माण करेल आणि त्यांच्या बदलत्या मोबिलिटी गरजा पूर्ण करण्यास मदत करेल.”

 

 

परिचय

 

टोयोटा किर्लोस्कर सुंदरम ऑटोमोटिव्ह सोल्यूशन्स प्रा. लि. हा किर्लोस्कर सिस्टम्स प्रा. लि., त्रिचूर सुंदरम संथानम फॅमिली (TSSF समूह) आणि टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रा. लि. (TKM) यांचा संयुक्त उपक्रम आहे. ही कंपनी 17 एप्रिल 2025 रोजी स्थापन करण्यात आली होती.

भारतीय ऑटोमोबाइल बाजारपेठेची निरंतर होत असलेली वाढ, ग्राहकांच्या बदलत्या अपेक्षा आणि सर्व ब्रॅंड्समध्ये सुनियोजित, पारदर्शक आणि विश्वसनीय सर्व्हिस सोल्यूशन्सची वाढती मागणी ध्यानात घेऊन या कंपनीची स्थापना करण्यात आली आहे.

इतकी व्यापक मागणी असून देखील भारताच्या ऑटोमोटिव्ह सर्व्हिसिंग मार्केटचा मोठा भाग हा अजूनही विखुरलेला आणि असंघटित आहे, ज्यामुळे ग्राहकांना सेवा प्रदान करण्यासाठी मोठी संधी उपलब्ध आहे. टोयोटा किर्लोस्कर सुंदरम ऑटोमोटिव्ह सोल्यूशन्स व्यापक मल्टी-ब्रॅंड वाहन सर्व्हिस सोल्यूशन्स प्रदान करेल, ज्याला प्रशिक्षित टेक्निशियन्स, दमदार गुणवत्ता प्रणाली आणि ग्राहक-केंद्रित प्रक्रि

यांचे पाठबळ असेल.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments