Tuesday, August 25, 2026
Google search engine
HomeUncategorizedअटलांटिक वॉचेसचा पुण्यात विस्तार

अटलांटिक वॉचेसचा पुण्यात विस्तार

पुणे,4 फेब्रुवारी 2026 : 135 वर्षांहून अधिक काळ घड्याळ निर्मितीचा वारसा असलेली स्वीस घड्याळ निर्माता कंपनी अटलांटिक वॉचेस ने पुण्यातील बाजारपेठेत आपल्या प्रवेशाची घोषणा केली आहे. स्वित्झर्लंडमधील बेटलाख येथे 1888 साली स्थापन झालेल्या या ब्रँडला अचूकता,उत्कृष्ट कारागिरी व कालातीत डिझाईनसाठी दीर्घकाळापासून लोकप्रियता मिळाली आहे. हा ब्रँड मुंबईस्थित रिटेल चेन जस्ट इन टाईम दालनाच्या माध्यमातून भारतीय बाजारपेठेत पदार्पण करत आहे. सध्या अहमदाबाद,मुंबई आणि पुणे येथे उपस्थिती असलेला हा ब्रँड आगामी काळात वेगाने विस्तार करण्याची योजना करत आहे.

 

गेल्या 100 वर्षांहून अधिक काळ अटलांटिक स्विस वॉचेस निर्मितीमध्ये अग्रणी राहिले आहे.1932 मध्ये सादर करण्यात आलेल्या पहिल्या वॉटरप्रुफ क्रोनोग्राफ पैकी एक तसेच 1960 मधील अभिनव स्पीड स्विच डेट मेकॅनिझम यांसारख्या अत्याधुनिक टप्प्यांसाठी ओळखला जाणारा हा ब्रँड परंपरा आणि नवकल्पनांचा मिलाफ करत आला आहे. यांची वर्ल्डमास्टर श्रेणी आजही ब्रँडची ओळख ठरते,आधुनिक कलेक्शनची विविध श्रेणी आजच्या घड्याळ प्रेमींसाठी स्पोर्टी,एलिगंट आणि वैविध्यपूर्ण डिझाईन्स घेऊन येते.

 

भारतात विकसित होत असलेली लक्झरी बाजारपेठ आणि जागरूक ग्राहकांचा वाढता वर्ग यामुळे अटलांटिकच्या जागतिक विस्तारासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. परवडणाऱ्या लक्झरी सेगमेंटमध्ये स्थान मिळवलेल्या या ब्रँड द्वारे स्विस-निर्मित गुणवत्ता आणि परंपरा आणि आधुनिकतेचा समतोल साधणाऱ्या डिझाईन्ससह दर्जा सादर केला जातो,जो भारतातील नव्या पिढीतील व्यावसायिक आणि स्टाईलबाबत जागरूक ग्राहकांच्या आवडीनुसार आहेत.

 

अटलांटिक वॉचेसचे विक्री प्रमुख फिलिप रूफली म्हणाले की,भारत ही कारागिरी व वारसा जपणारी मोठी बाजारपेठ आहे.भारतीय बाजारपेठेत प्रवेश करताना परंपरा आणि आधुनिक शैली यांची आवड असणाऱ्या नव्या पिढीतील घड्याळप्रेमींशी जोडले जाण्याचा आमचा प्रयत्न आहे.आमचे घड्याळांचे कलेक्शन हे स्विस विश्वासार्हतेचे प्रतीक असून समकालीन जीवनशैलीशी सुसंगत आहे.

 

पुण्यातील लाँचमध्ये मरिनर क्वार्टझ वेव्ह आणि सीवेव्ह या दोन अलिशान घड्याळांचा समावे

श होता.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments