Tuesday, August 25, 2026
Google search engine
HomeUncategorizedशेतीतील अपशिष्टापासून नवोन्मेष्कारी पॅकेजिंग उत्पादने विकसित करण्यासाठी अमेझॉनचा आयआयटी रूरकीशी सहयोग

शेतीतील अपशिष्टापासून नवोन्मेष्कारी पॅकेजिंग उत्पादने विकसित करण्यासाठी अमेझॉनचा आयआयटी रूरकीशी सहयोग

पुणे, फेब्रुवारी ४, २०२६: शेतीतील अपशिष्टापासून नवोन्मेष्कारी पॅकेजिंग साहित्य विकसित करण्याच्या उद्देशाने अमेझॉन इंडियाने आज भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) रूरकीशी सहयोग कराराची घोषणा केली. लाकडाचा वापर न करता कागद तयार करण्याचे तंत्रज्ञान विकसित करण्याचे आणि त्यायोगे शेतीतील कचऱ्याचे ज्वलन टाळण्याचे उद्दिष्ट या प्रकल्पामागे आहे, त्याचप्रमाणे ‘व्हर्जिन वूड पल्प’चा वापरही यामुळे कमी होऊ शकेल. हे कमी वजनाचे तरीही दणकट पॅकेजिंग साहित्य म्हणजे लाकडाच्या लगद्यापासून तयार होणाऱ्या पारंपरिक साहित्यासाठी तसेच प्लास्टिक पिशव्यांसाठी रिसायकल करण्याजोगा आणि घरीच कॉम्पोस्टिंग करण्याजोगा पर्याय आहे.

 

 

 

गव्हाचा पेंढा आणि उसाची चिपाडे यांसारख्या शेतीतून निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे रूपांतर उच्च दर्जाच्या लगद्यामध्ये करून त्यापासून कागदी खोकी-पाकिटे तयार करण्यावर या संशोधनाचा भर असेल. या उत्पादनांची कामगिरी पारंपरिक कागदी पॅकेजिंग साहित्याच्या तोडीची असेल. त्यामुळे भारतातील पिकांचे खुंटे जाळण्याचे प्रमाण कमी करण्यातही मदत होणार आहे आणि एरवी जाळून टाकाव्या लागणाऱ्या कृषी कचऱ्याचे रूपांतर मौल्यवान पॅकेजिंग साहित्यात होणार आहे. आयात केल्या जाणाऱ्या ‘व्हर्जिन वूड पल्प’वरील अवलंबित्वही यामुळे कमी होईल आणि कृषी कचरा बाजारपेठेत विकून शेतकरीही अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत मिळवू शकतील.

 

 

 

आयआयटी रूरकीच्या पेपर अँड पॅकेजिंग टेक्नोलॉजी विभागासोबतचा हा सहयोग प्रकल्प प्रयोगशाळेतून सुरू होणार आहे, उत्पादनांचा विकास करून त्यांच्या चाचण्या घेण्याचे काम १५ महिन्यांहून अधिक काळापर्यंत चालणार आहे. उत्पादनांच्या दर्जाची चाचणी यशस्वी ठरल्यास पुढील वर्षाच्या मध्यापर्यंत किंवा अखेरच्या टप्प्यात औद्योगिक चाचण्या, पडताळणी प्रक्रिया तसेच व्यावसायिक स्तरावर उत्पादन यांसाठी अमेझॉन सहाय्य करणार आहे.

 

 

 

अमेझॉन इंडियातील ऑपरेशन्स विभागाचे उपाध्यक्ष अभिनव सिंग म्हणाले, “अमेझॉनमध्ये आम्ही भारतातील सर्वांत वेगवान, सुरक्षित व खात्रीशीर ऑपरेशन्स नेटवर्क उभे करत आहोत आणि हे नेटवर्क जास्तीत-जास्त शाश्वत करण्याप्रती आम्ही बांधील आहोत. या प्रयत्नाचा एक भाग म्हणून, शेतीतील कचऱ्यापासून नवोन्मेष्कारी पॅकेजिंग साहित्य विकसित करण्याच्या उद्देशाने आम्ही आयआयटी रूरकीशी सहयोग करार करत आहोत. भारतात दरवर्षी सुमारे ५०० दशलक्ष टन कृषी कचरा निर्माण होतो, या कचऱ्याचा वापर पॅकेजिंगसाठी केल्यास आपण वर्तुळाकार अर्थव्यवस्थेला सहाय्य करू शकू तसेच पारंपरिक पॅकेजिंग साहित्यावरील अवलंबित्वही कमी करू शकू.”

 

 

 

आयआयटी रूरकीचे संचालक प्राध्यापक कमल किशोर पंत म्हणाले, “शाश्वतता ही आता निवडीची बाब राहिलेली नाही, तो राष्ट्रीय स्तरावर तातडीने प्राधान्य देण्याचा विषय झाला आहे. आयआयटी रूरकी आणि अमेझॉन यांच्यातील हा सहयोग करार म्हणजे भारताचे वर्तुळाकार अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे, स्वच्छ भारत, स्टार्टअप इंडिया तसेच राष्ट्रीय संसाधन कार्यक्षमता धोरण यांसारख्या सरकारी धोरणांशीही हा करार सुसंगत आहे. शेतीतील कचऱ्याचे रूपांतर विघटनशील पॅकेजिंग साहित्यात करून आपण पिकांचे खुंट जाळण्याच्या समस्येवरही उपाय देत आहेत आणि त्याच वेळी भारतातील ताज्या संसाधनांवरील ताणही कमी करत आहोत. उद्योजक, शेतकरी आणि एकंदर समाजाला लाभदायी ठरेल असा व्यापक उपाय आपण शोधत आहोत. शैक्षणिक संशोधन आणि औद्योगिक सहयोग यांच्या माध्यमातून अधिक शाश्वत व स्वयंपूर्ण भवितव्याच्या दिशेने चाललेल्या भारताच्या प्रवासाला अधिक वेग कसा देता येईल याचे प्रात्यक्षिक हा उपक्रम दाखवत आहे.”

 

 

 

आयआयटी रुरकी, सहारनपूर कॅम्पस येथील पेपर अँड पॅकेजिंग टेक्नॉलॉजी विभागातील INNOPAP लॅब (पेपर अँड पॅकेजिंगमधील नवोन्मेष) मधील प्रो. विभोर कुमार रस्तोगी आणि डॉ. अनुराग कुलश्रेष्ठ हे या संशोधन प्रकल्पाचे नेतृत्व करतील.

 

 

 

पॅकेजिंग कमी करण्यासाठी चाललेल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून अमेझॉन भारतातील ५० टक्क्यांहून अधिक ग्राहकांच्या ऑर्डर्स त्यांच्या मूळ पॅकेजिंगमध्ये किंवा कमीत-कमी पॅकेजिंगमध्ये पाठवत आहे. कंपनी देशभरातील ३००हून अधिक शहरांमध्ये उत्पादनांच्या ऑर्डर्स पॅकेजिंग करून पाठवते. २०१९ सालापासून अमेझॉनने आपल्या सर्व फूलफिलमेंट केंद्रांतील पॅकेजिंगमधून एकदा वापरून टाकून देण्याचे प्लास्टिक पूर्णपणे बाद केले आहे.

 

 

 

आपली कामे अधिक शाश्वतरित्या करण्यासाठी अमेझॉन इंडिया बांधील आहे. आपल्या सर्व कामकाजांतून होणारे कार्बन उत्सर्जन २०४० सालापर्यंत शून्यावर आणण्याची ‘क्लायमेट प्लेज’ अमेझॉनने घेतली आहे. आम्ही थोड्याच काळात वेगाने व परिणामकारक प्रगती साध्य केली आहे, कार्बनमुक्त ऊर्जा, नवोन्मेष्कारी पॅकेजिंग, वाहतूक जाळ्याचे विद्युतीकरण, वर्तुळाकार सुधारणा आणि एआय यांच्यात गुंतवणूक करून कंपनी ही प्रगती साध्य करत आहे. अमेझॉनच्या थेट कामकाजात जेवढे पाणी वापरले जाते त्याहून जास्त पाणी २०२७ सालापर्यंत समुदायाला परत करण्याचे उद्दिष्ट

अमेझॉनने ठेवले आहे.

 

 

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments