Tuesday, August 25, 2026
Google search engine
HomeUncategorizedटीजीएच ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरतर्फे जागतिक कर्करोग दिनानिमित्त जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन*

टीजीएच ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरतर्फे जागतिक कर्करोग दिनानिमित्त जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन*

योद्धा रुग्ण सहाय्यक मेळावा, हास्योपचार, पोषक आहार मार्गदर्शन, रक्तदान शिबिर अशा विविध माध्यमातून केली जनजागृती*

 

*तळेगाव*: जागतिक कर्करोग दिनानिमित्त, टीजीएच ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटर, तळेगाव दाभाडे यांनी कर्करोगाविषयी समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले होते. यामध्ये रुग्ण, त्यांचे कुटुंबिय, डॅाक्टर आणि इतर कर्मचारी सहभागी झाले होते .

 

कर्करुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना मानसिक आधार आणि प्रोत्साहन देण्यासाठी एक विशेष *“योद्धा पेशंट सपोर्ट ग्रूपच्या बैठकीचे* आयोजित करण्यात आले होते. या बैठकीतील सत्रात कर्करोगाविषयीचे अनुभव, रुग्णांच्या भावना आणि प्रेरणादायी प्रवास इतरांसोबत सादर करण्यासाठी एक सुरक्षित आणि आश्वासक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले होते ज्यात ४८ रुग्ण सहभागी झाले होते. याव्यतिरिक्त, तळेगाव दाभाडे येथील कलापिनी हास्य क्लबने हास्योपचार सत्रांचे आयोजन केले, ज्यामध्ये कर्करोगाच्या उपचारादरम्यान हसण्यामुळे तणाव कमी होण्यास, वेदना कमी होण्यास आणि मानसिक आरोग्य सुधारण्यास कशी मदत होते हे दाखवून दिले.

 

पोषणविषयक जागरूकता हा या कार्यक्रमाचा एक महत्त्वाचा भाग होता. *आहारतज्ञ, श्रुती देशपांडे* यांनी रुग्णांशी संवाद साधला आणि उपचार व पुनर्प्राप्तीसाठी उपयुक्त अशा पोषक आहाराबाबत मार्गदर्शन केले. भावनिक बंध अधिक दृढ करण्यासाठी, मुंबईच्या व्ही केअर फाउंडेशनच्या ज्योती पाटील शाह यांनी रुग्णांशी जवळून संवाद साधला, त्यांना मनमोकळेपणाने बोलण्यास प्रोत्साहित केले आणि एक आरामदायक वातावरण निर्माण केले.

 

या कार्यक्रमाला माननीय अध्यक्ष श्री. उदय देशमुख यांची प्रमुख उपस्थिती लाभली, ज्यांनी कर्करोगावर उपचार घेत असलेल्या मुलांना भेटवस्तूंचे वाटप केले. व्यवस्थापकीय संचालक श्री. सचिन देशमुख आणि युनिट हेड डॉ. संतोष साहू यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाचे यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले.

 

त्याच निमित्ताने, रुग्णालयाच्या आवारात रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. यामध्ये रुग्णालयातील कर्मचारी आणि रुग्णांच्या नातेवाईकांनी उत्साहाने सहभाग घेतला आणि यावेळी ५० व्यक्तींनी रक्तदान केले. जनजागृतीला अधिक चालना देण्यासाठी, रुग्णालयातील कर्मचारी आणि नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये कर्करोग जनजागृतीवरील बाबत प्रभावी संदेश पोहोचविणाऱ्या पहिल्या तीन विजेत्यांना बक्षिसे देऊ गौरविण्यात आले.

 

*सेंटरचे अध्यक्ष आणि संस्थापक श्री. उदय देशमुख म्हणाले,* जागतिक कर्करोग दिन आपल्याला याची आठवण करून देतो की कर्करोगाची काळजी ही केवळ उपचारांपुरती मर्यादित नाही. भावनिक आधार, सहानुभूती आणि रुग्ण व त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी उभे राहणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.

 

*व्यवस्थापकीय संचालक, सचिन देशमुख सांगतात की,* या व्यासपीठामुळे आम्हाला व्यापक स्वरुपात जागरूकता करून रुग्णांना आधार देत आणि सामाजिक जबाबदारी पार पाडता आली.

 

*युनिट हेड, डॉ. संतोष साहू म्हणाले,* कर्करोगाच्या प्रवासात रुग्णांना भावनिकरित्या सामना करण्यास मदत करण्यासाठी सपोर्ट ग्रुप्स आणि जागरूकता उपक्रम महत्त्वाची भूमिका बजावतात.

 

*मुंबईच्या व्ही केअर फाउंडेशनच्या ज्योती पाटील शाह म्हणाल्या,* जेव्हा रुग्णांना आपले म्हणणे ऐकले जात आहे आणि भावनिक आधार मिळत आहे असे वाटते, तेव्हा त्याचा त्यांच्या उपचारांवर आणि आत्मविश्वासावर सकारा

त्मक परिणाम होतो.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments