Tuesday, August 25, 2026
Google search engine
HomeUncategorized*चारचाकी वाहनांसाठी नवीन मालिकेतील आकर्षक क्रमांकांसाठी अर्ज करण्याचे आवाहन*

*चारचाकी वाहनांसाठी नवीन मालिकेतील आकर्षक क्रमांकांसाठी अर्ज करण्याचे आवाहन*

 

 

पुणे, दि. ४ (जिमाका, वृत्तसेवा) : प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे येथे दुचाकी वाहनांसाठी नवीन मालिका सुरु होत असून आकर्षक व पसंतीचे नोंदणी क्रमांक तीनपट व नियमित शुल्क भरून राखून ठेवण्यासाठी आगाऊ अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

 

चारचाकी वाहनांसाठी पसंती क्रमांकाकरिता अर्ज ६ फेब्रवारी २०२६ रोजी सकाळी १०.३० ते दुपारी २.३० या वेळेत स्वीकारले जातील. एकाच क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास लिलाव ९ फेब्रवारी २०२६ रोजी दुपारी ४ वाजता घेण्यात येईल. लिलावाकरिता जमा करण्यात येणारा डीडी हा “R.T.O., Pune” या नावे नॅशनलाइज्ड/शेड्युल्ड बँकेचा असावा व दोन महिन्यांपेक्षा जुना नसावा. चुकीची फी, चुकीचा डीडी किंवा अपूर्ण अर्ज बाद करण्यात येतील. समान रक्कमेचे डीडी असल्यास चिठ्ठीद्वारे निर्णय घेतला जाईल.

 

पसंती क्रमांक आरक्षित करण्यासाठी https://fancy.parivahan.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करून शुल्क भरता येईल,असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

00000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments