Tuesday, August 25, 2026
Google search engine
HomeUncategorizedजिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक -२०२६* ...

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक -२०२६* *मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी ‘मताधिकार’ मोबाईल अॅपचा वापर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन*

 

 

पुणे, दि. ५ : जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीकरिता मतदार यादीतील मतदाराचे नाव तसेच मतदान केंद्र शोधण्याकरिता ‘मताधिकार’ मोबाईल अॅप उपलब्ध करून देण्यात आले आहे; अधिकाधिक मतदारांनी या अॅपचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.

 

जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांकरिता ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान होणार आहे. याकरिता मतदाराचे नाव व मतदान केंद्र शोधण्याकरिता ‘मताधिकार’ मोबाईल अॅप ‘गुगल प्ले स्टोअर’ वरुन डाऊनलोड करता येईल. या अॅपमध्ये मतदाराचे नाव शोधण्यासाठी दोन पर्याय उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. त्यानुसार मतदाराचे संपूर्ण नाव किंवा मतदार ओळखपत्राचा (EPIC) क्रमांक नमूद करून मतदार यादीतील नाव शोधता येते. अॅपच्या माध्यमातून आपले मतदान केंद्रही शोधता येणार आहे.

 

याशिवाय मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी https://mahasecvoterlist.in/ हे संकेतस्थळदेखील उपलब्ध करुन देण्यात आले आहे, त्यातील Search Name in Voter List वर क्लिक करून मोबाईल अॅपप्रमाणेच ‘नाव’ किंवा ‘मतदार ओळखपत्रा’चा (EPIC) क्रमांक नमूद करुन नाव शोधता येईल, अशी माहिती श्री. डुडी यांनी दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments