Friday, October 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedएवररेडी इंडस्ट्रीजने आर्थिक वर्ष 26च्या तिसऱ्या तिमाहीमध्ये एकत्रित महसूल आणि EBITDA मध्ये...

एवररेडी इंडस्ट्रीजने आर्थिक वर्ष 26च्या तिसऱ्या तिमाहीमध्ये एकत्रित महसूल आणि EBITDA मध्ये अनुक्रमे 10.1% आणि 13.0% इतकी भक्कम वाढ नोंदवली

कर्ज कमी करायला मदत म्हणून नॉयडा येथील जमीन विक्रीचे नियोजन

 

कोलकाता, 5 फेब्रुवारी 2026

 

 

 

एवररेडी इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड (BSE: 531508 | NSE: EVEREADY) ने आज 31 डिसेंबर 2025 रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांचे लेखापरीक्षण न झालेले (अनऑडिटेड) आर्थिक निकाल जाहीर केले. आर्थिक वर्ष 26च्या तिसऱ्या तिमाहीमध्ये महसूल वाढीची आणखी एक तिमाही नोंदवत सलग पाचव्या तिमाहीत वाढ कायम राहिली आहे.

 

आर्थिक वर्ष 26च्या तिसऱ्या तिमाहीमधील आर्थिक ठळक बाबी

 

· कामकाजामधील एकत्रित महसूल 367.2 कोटी रु. इतका होता (आर्थिक वर्ष 25च्या तिसऱ्या तिमाहीत: 333.5 कोटी रु.), तर EBITDA वाढून 33.3 कोटी रु. झाला (आर्थिक वर्ष 25च्या तिसऱ्या तिमाहीत: 29.5 कोटी रु.). ही वाढ बॅटरी व्यवसायातील मजबूत कामगिरीमुळे झाली असून या विभागात 11.1% वाढ झाली आहे. यामध्ये अल्कलाईन बॅटरींमध्ये सर्वाधिक 72% वाढ झाली. लायटिंग व्यवसायातही हळूहळू सुधारणा दिसून आली असून 10.5% वाढ नोंदवली गेली.

 

· नवीन कामगार संहिता अंमलबजावणीशी संबंधित 9.4 कोटी रु. च्या एकरकमी अपवादात्मक खर्चाच्या समावेशानंतर करपश्चात नफा (Profit after tax) 7.5 कोटी रु. इतका राहिला (आर्थिक वर्ष 25च्या तिसऱ्या तिमाहीत: 13.1 कोटी रु.)

 

· जम्मू येथील अल्कलाईन बॅटरी प्रकल्पासाठी 167 कोटी रु. भांडवली खर्च (Capex) समाविष्ट करून एकूण निव्वळ कर्ज 317 कोटी रु. इतके आहे.

 

 

 

“आर्थिक वर्ष 26 ची तिसरी तिमाही ही एवररेडीसाठी स्थिर प्रगतीची आणखी एक तिमाही ठरली असून, आव्हानात्मक कामकाज वातावरण असूनही वाढ कायम राहिली आहे. बॅटरी व्यवसायाने कामगिरीचा आधारस्तंभ कणा म्हणून भूमिका बजावली असून, अल्कलाईन बॅटरींचा बाजारपेठेतील वाटा 19% या महत्वाच्या टप्प्यावर पोहोचला आहे. योग्य दर निर्धारण आणि प्रभावी हेजिंग धोरणांमुळे वाढलेल्या झिंक किमती आणि चलन अस्थिरतेचा परिणाम कमी करण्यास मदत झाली. काही श्रेणींमध्ये अल्पकालीन नरमाई दिसून आली असली तरी पोर्टफोलिओ सुधारणा, खर्च नियंत्रण आणि अंमलबजावणीतील सातत्य यावर आमचा सततचा भर कंपनीला मागणीच्या परिस्थितीत सुधारणा होताच अधिक चांगला कामकाज लाभ घेण्यास सक्षम करेल.”

 

– मुख्य कार्यकारी अधिकारी – अनिर्बन बॅनर्जी

 

 

 

 

 

“या तिमाहीत, आमच्या प्रमुख कामकाज आणि आर्थिक प्राधान्यांमध्ये आम्ही सातत्याने स्थिर प्रगती करत राहिलो. जम्मू येथे उभारण्यात येत असलेला आमचा नवीन अल्कलाईन बॅटरी उत्पादन प्रकल्प सध्याच्या आर्थिक वर्षाच्या अखेरीस पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे आमचा दीर्घकालीन वाढीचा पाया अधिक मजबूत होत आहे. कर्ज कमी करण्यासाठी आणि ताळेबंदाची मजबुती वाढवण्यासाठी आम्ही नॉयडा येथील आमच्या जमिनीच्या भूखंडाची विक्री प्रक्रिया सुरू केली आहे. जोडीला, कंपनीच्या पहिल्यांदाच राबवण्यात येणाऱ्या कर्मचारी शेअर पर्याय योजनेस (Employee Stock Options Plan) संचालक मंडळाने दिलेली मान्यता ही एवररेडीच्या दीर्घकालीन मूल्यनिर्मितीशी सुसंगत असलेली प्रतिभा आकर्षित करण्याची, टिकवून ठेवण्याची आणि प्रेरित करण्याची आमची बांधिलकी दर्शवते.”

 

– कार्यकारी संचालक आणि मुख्य वित्तीय अधिकारी – बिबेक अगरवाल

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments