Tuesday, August 25, 2026
Google search engine
HomeUncategorizedमार्केटमध्ये अनिश्चिततेचे वातावारण असतानाही एमआयटी-वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीने प्लेसमेंटमध्ये नोंदवली लक्षणीय वाढ; 730+...

मार्केटमध्ये अनिश्चिततेचे वातावारण असतानाही एमआयटी-वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीने प्लेसमेंटमध्ये नोंदवली लक्षणीय वाढ; 730+ रिक्रुटर, 220 विद्यार्थ्यांनी मिळवली वार्षिक ₹10 लाखांची ऑफर

पुणे, 5 फेब्रुवारी 2026: जागतिक पातळीवर आर्थिक अस्थिरता आणि रिक्रुटमेंट करताना सावध भूमिकेचा कल यामुळे देशभरातील कॅम्पस प्लेसमेंटवर परिणाम होत असतानाही, पुण्यातील एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीने (MIT-WPU) प्लेसमेंटमध्ये भक्कम आणि स्थिर कामगिरी नोंदवत उद्योगविश्वाचा विद्यार्थ्यांवरील विश्वास कायम असल्याचे दाखवून दिले आहे.

 

2025च्या प्लेसमेंट सीझनमध्ये 730हून अधिक रिक्रुटर्सनी कॅम्पस भरतीत सहभाग घेतला असून, ही संख्या मागील वर्षाच्या तुलनेत लक्षणीय वाढ दर्शवते. मार्केटमधील सध्याच्या परिस्थितीत रिक्रुटरचा सर्वाधिक सहभाग असलेल्या संस्थांमध्ये एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे नाव अग्रभागी आले आहे.

 

मार्केटमध्ये प्रतिकूल वातावरण असतानाही भक्कम निकाल

 

उद्योगक्षेत्रात अनिश्चितता असतानाही 220हून अधिक विद्यार्थ्यांना वार्षिक ₹10 लाखांपेक्षा जास्त पॅकेजच्या नोकरीच्या ऑफर्स मिळाल्या. त्यामुळे प्लेसमेंट करून घेण्यासाठी रिक्रुटर मोठ्या संख्येने सहभागी तर झालेच, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधीही मिळाल्या. आयटी, अभियांत्रिकी, कन्सल्टिंग, अ‍ॅनालिटिक्स, मॅन्युफॅक्चरिंग, ऑटोमोबाईल, एफएमसीजी आणि बीएफएसआय अशा प्रमुख तसेच नव्या क्षेत्रांमध्ये भरती झाल्याने पदवीधरांसाठी विविध करिअर संधी उपलब्ध झाल्या आहेत.

 

नामांकित रिक्रुटर्सच्या माध्यमातून उद्योगविश्वाचा विश्वास

 

प्लेसमेंटच्या या हंगामात अ‍ॅमेझॉन, डेलॉइट, जेपी मॉर्गन, एनव्हिडिया, अ‍ॅक्सेंचर, टीसीएस आणि सायमन्स यांसारख्या आघाडीच्या जागतिक आणि भारतीय कंपन्यांचा प्रमुख रिक्रुटर्समध्ये समावेश होता. विशेष म्हणजे, सहभागी संस्थांपैकी जवळपास 90 टक्के संस्था रीपीट रिक्रुटर्स होत्या, यामुळे विद्यार्थ्यांच्या कामगिरीबाबत उद्योगविश्वाचा दीर्घकालीन विश्वास आणि समाधान अधोरेखित होते.

 

इंटर्नशिप्समधून पूर्णवेळ नोकऱ्यांकडे वाटचाल

 

या हंगामातील एक महत्त्वाची बाब म्हणजे इंटर्नशिप्सचे प्री-प्लेसमेंट ऑफर्समध्ये मोठ्या प्रमाणावर रूपांतर झाले. लाइव्ह प्रोजेक्ट्स आणि उद्योगाशी संबंधित कामांमधील विद्यार्थ्यांच्या कामगिरीबाबत नियोक्त्यांकडून सकारात्मक अभिप्राय मिळाल्याचे नमूद करण्यात आले असून, यामुळे विद्यार्थ्यांना कार्यस्थळाच्या दृष्टीने सज्ज करणे आणि प्रत्यक्ष उपयोगावर आधारित शिक्षणावर MIT-WPUचा असलेला भर अधोरेखित होतो.

 

2026च्या प्लेसमेंटसाठी सुरुवातीपासूनच सकारात्मक गती

 

ही सकारात्मक गती 2026च्या प्लेसमेंट सिझनमध्येही दिसून येत असून, हा सिझन सध्या सुरू आहे. आतापर्यंत 437हून अधिक कंपन्यांनी भरती प्रक्रिया पूर्ण केली असून, वार्षिक ₹46 लाख इतकी सर्वाधिक ऑफर नोंदवण्यात आली आहे. या शिवाय, 110 विद्यार्थ्यांनी आधीच ₹10 लाख किंवा त्याहून अधिक वार्षिक पॅकेज मिळवले असून, प्लेसमेंटचा मुख्य टप्पा सुरू होण्याआधीच एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या पदवीधरांसाठी भक्कम मागणी असल्याचे स्पष्ट होते.

 

==============================

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments