Tuesday, August 25, 2026
Google search engine
HomeUncategorizedतेलंगणा मधील महात्मा फुले पुतळा विटंबनेचा पुण्यात निषेध* माळी महासंघ पुणे...

तेलंगणा मधील महात्मा फुले पुतळा विटंबनेचा पुण्यात निषेध* माळी महासंघ पुणे शहराच्या वतीने जाहीर निषेध आंदोलन ; फुले प्रेमींचा मोठा सहभाग

 

 

पुणे : क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्याच्या विटंबनेचा निषेध असो… क्रूर समाजकंटकांना शिक्षा झालीच पाहिजे… महात्मा ज्योतिबा फुले यांचा विजय असो… अशा घोषणा देत माळी महासंघ पुणे शहर च्या वतीने माळी समाज बांधव आणि फुले प्रेमींनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध आंदोलन केले. तेलंगणा राज्यात महात्मा फुले यांच्या पुतळ्याच्या विटंबनेचा जाहीर निषेध यावेळी करण्यात आला.

 

यावेळी माळी महासंघ पुणे शहर अध्यक्ष दिपक जगताप, महिला अध्यक्ष स्मिता लडकत, नाना कुदळे, बाळासाहेब लडकत, सोमनाथ बटवाल, यशोधन आखाडे, चांगदेव पिंगळे ,शशिकला ढोले पाटील, राजेंद्र लडकत, प्रज्वल बनकर, रीमाताई लडकत, गिरीश झगडे, रवी सहाणे, प्रतिभा झगडे विजय कोठावळे, अभिजीत भुजबळ, शांता ताई नेवसे, मारुती भुजबळ, सारंग राऊत गणेश वाडकर यांसह समाजबांधव, भगिनी व फुले प्रेमी उपस्थित होते.

 

तेलंगणा राज्यातील संगारेड्डी जिल्ह्यातील तेल्लापुर गावात क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्यावर समाजकंटकांनी हल्ला करून केलेल्या विटंबनेची घटना घडली. ही घटना निंदनीय असून या हीन कृत्याचा आणि यात सहभागी समाजकंटकांचा तीव्र निषेध यावेळी करण्यात आला. ही फक्त जोतिबांच्या पुतळ्याची विटंबना नाही, तर आपल्या सामाजिक विचारांवर आणि समतेच्या मूल्यांवर केलेला आघात आहे. अशा मनोविकृत लोकांचा जाहीर निषेध करण्यासाठी माळी महासंघ पुणे शहराच्या वतीने करण्याकरिता निषेध आंदोलन करण्यात आले.

 

अध्यक्ष दीपक जगताप म्हणाले, ज्या महात्मा फुले यांनी पुणे शहरातून शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. चांगल्या विचारांचे लोक तयार केले. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी महिला शिक्षणासाठी मोठे योगदान दिले. त्यांची विटंबना होत असेल, तर अशा लोकांचा आम्ही निषेध करतो. ज्यांनी ही विटंबना केली, त्या समाजकंटकांवर तेलंगणा सरकार आणि पोलिसांनी कारवाई केली नाही, तर आम्ही तीव्र आंदोलन करू, असा इशारा त्यांनी दिला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments