Tuesday, August 25, 2026
Google search engine
HomeUncategorizedवँडरलॅन्डे इंडिया इनोव्हेशन सेंटर’ पुण्यात सुरू

वँडरलॅन्डे इंडिया इनोव्हेशन सेंटर’ पुण्यात सुरू

पुणे, ९ फेब्रुवारी २०२६ : लॉजिस्टिक्स प्रक्रिया ऑटोमेशन क्षेत्रातील जागतिक आघाडीची कंपनी वॅन्डरलँडे (Vanderlande) यांनी पुण्यात आपल्या इंडिया इनोव्हेशन सेंटरचे अधिकृत उद्घाटन केल्याचे जाहीर केले. हा टप्पा कंपनीच्या या प्रदेशातील अभियांत्रिकी क्षमतांच्या विस्तारातील एक महत्त्वाचा मैलाचा दगड ठरला आहे.

 

या केंद्रामध्ये यामध्ये रोबोटिक ऑटोमेशन, स्वयंचलित प्रणाली, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तसेच डिजिटल-फिजिकल एकत्रीकरण यावर विशेष भर देण्यात आला आहे.त्यासाठी अभियंत्यांना एकत्र येऊन संपूर्ण प्रणालीवर काम करण्यासाठी सुसज्ज करण्यात आले आहे. तसेच इथे वेअरहाऊसिंग, विमानतळ आणि पार्सल क्षेत्रासाठी या तंत्रत्रानाचा वापर होईल. २०१७ पासून वॅन्डरलँडे ही टोयोटा इंडस्ट्रीज कॉर्पोरेशनचा भाग आहे

 

पुण्यातील दोन एकर परिसरात उभारलेले हे इनोव्हेशन सेंटर संशोधन व विकास, प्रणाली चाचणी तसेच प्रशिक्षण या सर्व सुविधा एकाच ठिकाणी एकत्र आणते. संकल्पनेपासून अंमलबजावणी व चाचणीपर्यंत संपूर्ण अभियांत्रिकी प्रक्रियेत टीम्स एकत्रितपणे काम करू शकतील, असे वातावरण येथे निर्माण करण्यात आले आहे.

 

वॅन्डरलँडेच्या मुख्य वित्त अधिकारी अ‍ॅस्ट्रिड व्हॅन ड्रुटन यांनी या केंद्राचे धोरणात्मक महत्त्व अधोरेखित करताना सांगितले, “इंडिया इनोव्हेशन सेंटरमुळे वॅन्डरलँडेच्या तंत्रज्ञान प्रवासात भारताची वाढती भूमिका अधोरेखित होते.” ऑटोमेशन ग्राहकांसाठी अधिकाधिक महत्त्वाचे ठरत असताना, सातत्यपूर्ण सुधारणा आणि नवोन्मेषावर लक्ष केंद्रित करण्याच्या कंपनीच्या दृष्टीकोनाशी हे केंद्र सुसंगत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

 

वॅन्डरलँडे इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मनीष पाटील यांनी या उद्घाटनाला भारतातील कंपनीवरील विश्वास आणि सातत्यपूर्ण गुंतवणुकीचे प्रतीक असल्याचे सांगितले. “हे केंद्र नवोन्मेषाला चालना देणे, जागतिक क्षमतांची उभारणी करणे आणि वॅन्डरलँडेच्या जागतिक कार्यपद्धतीवर सकारात्मक परिणाम घडवून आणण्याच्या आमच्या उद्दिष्टांचे प्रतिबिंब आहे,” असे ते म्हणाले.

 

वॅन्डरलँडे इंडियाने एका लहान सपोर्ट ऑफिसपासून सुरुवात करत आज १,३०० कर्मचाऱ्यांचे ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर उभारले आहे. संशोधन व विकास, सॉफ्टवेअर विकास, विविध अभियांत्रिकी शाखा आणि शेअर्ड सर्व्हिसेस या सर्व क्षेत्रांमध्ये कंपनी कार्यरत आहे. इनोव्हेशन सेंटरमुळे कंपनीचा प्रवास अंमलबजावणी-केंद्रिततेकडून नवोन्मेष-केंद्रित टप्प्याकडे जात आहे.

 

१९४९ मध्ये स्थापन झालेल्या वॅन्डरलँडे कंपनीत जगभरात ११,००० हून अधिक कर्मचारी कार्यरत असून, आर्थिक वर्ष २०२५ मध्ये कंपनीचा २.३ अब्ज युरोचा उलाढाल नोंदवण्यात आली आहे. कंपनीची प्रणाली जगभरातील ६०० हून अधिक विमानतळांवर कंपनीची सुविधा कार्यरत आहे. जगातील अव्वल २० पैकी १७ विमानतळांचा त्यात समावेश आहे. दरवर्षी ४ अब्जांहून अधिक बॅगा या प्रणालीद्वारे हाताळल्या जातात. पार्सल क्षेत्रात, वॅन्डरलँडेची पायाभूत संरचना दररोज ५.२ कोटीहून अधिक पार्सल्स प्रक्रिया करते.

 

२०१७ पासून वॅन्डरलँडे ही टोयोटा इंडस्ट्रीज कॉर्पोरेशनचा

भाग आहे.

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments