Monday, August 24, 2026
Google search engine
HomeUncategorized60 वर्षांच्या महिला शेतकऱ्याच्या अवयव दानामुळे चार जणांना नवजीवन

60 वर्षांच्या महिला शेतकऱ्याच्या अवयव दानामुळे चार जणांना नवजीवन

पुणे,10 फेब्रुवारी 2026 : रस्ते अपघातानंतर मेंदूमृत घोषित झालेल्या पुरंदर येथील 60 वर्षीय महिला शेतकऱ्याच्या अवयवदानामुळे चार जणांना नवजीवन मिळाले आहे.6 फेब्रुवारी रोजी रस्ते अपघातात डोक्याला मार बसल्यानंतर त्या महिलेला नोबल हॉस्पिटल्स ॲन्ड रिसर्च सेंटर येथे दाखल करण्यात आले होते.त्या आपल्या पतीबरोबर दुचाकीवर प्रवास करत होत्या.अपघातात त्या दोघांनाही मेंदूला गंभीर दुखापत झाल्याने रूग्णालयात दाखल करण्यात आले.

 

8 फेब्रुवारी रोजी त्यांना मेंदूमृत घोषित केल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी अवयव दानाला संमती दिली आणि 9 फेब्रुवारी रोजी अवयव दान करण्यात आले.

 

नोबल हॉस्पिटल्स ॲन्ड रिसर्च सेंटर येथील समूह कार्यकारी अधिकारी डॉ.संजय पठारे म्हणाले की,त्यांच्या कुटुंबियांनी संमती दिल्यावर त्यांचे अवयव काढण्यात आले.फुफ्फुस हे प्रत्यारोपणासाठी पुण्यातील दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले.एक मुत्रपिंड नाशिकमधील हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले,तर दुसरे मुत्रपिंड आणि यकृत हे नोबल हॉस्पिटल्स ॲन्ड रिसर्च सेंटर येथे 9 फेब्रुवारी रोजी प्रत्यारोपित करण्यात आले.

 

यकृत हे दीर्घकालीन यकृताच्या आजाराने ग्रस्त असलेल्या 45 वर्षीय रूग्णावर प्रत्यारोपित करण्यात आले.तर मुत्रपिंड हे दीर्घकालीन मुत्रपिंडाच्या आजाराने ग्रस्त असलेल्या 35 वर्षीय रूग्णावर प्रत्यारोपित करण्यात आले.

 

डॉ.पठारे यांनी अवयवदान प्रकियेतील समन्वयन व मोलाच्या योगदानाबद्दल झेडटीसीसी चे आभार मानले.

 

या महिला शेतकऱ्याचे पती त्यांची परिस्थिती गंभीर असून त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे.

 

मुत्रपिंड प्रत्यारोपण टीममध्ये नोबल हॉस्पिटल्स ॲन्ड रिसर्च सेंटरमधील रीनल सायन्सेस विभागाचे प्रमुख डॉ.शशिकांत भांगे,तसेच भूलतज्ञ डॉ.गीतांजली आखाडे व टीम यांचा समावेश होता.यकृत प्रत्यारोपण टीममध्येे यकृत प्रत्यारोपण शल्यचिकित्सक डॉ.बिपिन विभूते आणि डॉ.स्मिता पारख,तसेच भूलतज्ञ डॉ.मनीष पाठक आणि प्रत्यारोपण समन्वयक महेश तुपे व आश्विनी कवडे यांचा समावेश होता.

 

नोबल हॉस्पिटल्स ॲन्ड रिसर्च सेंटरचे संचालक डॉ.दिविज माने म्हणाले की,अशा कठिण परिस्थितीत त्यांचा मुलगा आणि मुलीने अवयवदानाला संमती दिली.अवयव दानामुळे प्रत्यारोपणाच्या प्रतिक्षेत असलेले रूग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना नवी आशा

निर्माण झाली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments