Sunday, August 23, 2026
Google search engine
HomeUncategorizedआदित्य बिर्ला सन लाइफ इन्शुरन्सच्या अ-निश्चीत इंडेक्स 2.0 ने 2025 मधील भारतातील...

आदित्य बिर्ला सन लाइफ इन्शुरन्सच्या अ-निश्चीत इंडेक्स 2.0 ने 2025 मधील भारतातील अनिश्चिततेचे प्रवाह केले अधोरेखित

 

 

देशव्यापी निर्देशांकानुसार भारताचा एकूण अनिश्चितता स्कोअर आहे 79

 

 

 

मुंबई, 27 जानेवारी 2026: आदित्य बिर्ला कॅपिटल या भारतातील आघाडीच्या वैविध्यपूर्ण वित्तीय सेवा कंपनीची जीवन विमा उपकंपनी आदित्य बिर्ला सन लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (“एबीएसएलआय”) ने आज अ-निश्चीत इंडेक्स 2.0 सादर करत असल्याची घोषणा केली. हा निर्देशांक घरगुती पातळीवरील अनिश्चिततेचे देशव्यापी मोजमाप आहे. या देशव्यापी निर्देशांकानुसार भारताचा एकूण अनिश्चितता स्कोअर 79 इतका असून भारतीय नागरिकांच्या जीवनातील विविध प्रकारच्या अनिश्चिततांचे पैलू यातून स्पष्ट होतात.

 

 

 

अ-निश्चीत इंडेक्स 2.0 मध्ये 11 घटकांमधील आणि 49 दृष्टिकोनात्मक विधानांमधील अनिश्चिततेचा अभ्यास करण्यात आला आहे. हे घटक मुख्यत्वे अनियंत्रित बाह्य धोके आणि संभाव्यतः नियंत्रित करता येणारे वैयक्तिक घटक अशा दोन गटांत वर्गीकृत करण्यात आले आहेत. या घटकांमधून आर्थिक स्थैर्य, आरोग्य, सुरक्षितता, भावनिक स्वास्थ्य, डिजिटल सुरक्षा, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि पर्यावरणाशी संबंधित जोखमींबाबत भारतीयांची धारणा प्रतिबिंबित होते. अभ्यासाचा भाग म्हणून करण्यात आलेल्या पडताळणी चाचण्यांमध्ये 73% प्रतिसादकर्त्यांनी त्यांच्या भविष्यासंदर्भात आत्यंतिक चिंता असल्याचे नमूद केले. यातून या निर्देशांकाच्या निष्कर्षांची दृढता अधोरेखित होते.

 

 

 

भारतीय कुटुंबांमध्ये वैयक्तिक आर्थिक चिंतेची पातळी कायमच जास्त

 

सर्वेक्षणातून असे दिसून आले आहे की भारतातील वैयक्तिक आर्थिक चिंता आता केवळ उत्पन्नाच्या पातळीवर आधारित नसून आर्थिक तयारीतील कमतरतेमुळे अधिक आकार घेत आहे. आर्थिक व वित्तीय अस्थैर्याबाबतची चिंता (80) अजूनही उच्च असून, महागाईमुळे बचत कमी होण्याची भीती (81) आणि उत्पन्न वाढत्या जीवनखर्चाशी जुळवून घेऊ न शकल्याची चिंता (80) यामुळे ती वाढत आहे. ही चिंता दीर्घकालीन नियोजनापर्यंत पोहोचली असून, पुरेशी संपत्ती निर्माण करता येईल का (80) आणि नोकरी जाणे किंवा वैद्यकीय आपत्कालीन निधी राखता येईल का (79) याबाबत प्रतिसादकर्ते अनिश्चित आहेत. याशिवाय, गंभीर आजारांसाठी विमा संरक्षण पुरेसे आहे की नाही याबाबतही एक मोठा वर्ग साशंक आहे (78).

 

 

 

निवृत्तीशी संबंधित चिंता देखील ठळक असून त्याचा निर्देशांक स्कोअर 78 आहे. वृद्धावस्थेतील देखभालीचा वाढता खर्च (79), वृद्धापकाळात आर्थिक स्वावलंबनाबाबतची शंका (78) आणि अपुरी निवृत्ती नियोजन व्यवस्था (78) या कारणांमुळे ही चिंता वाढलेली दिसते. एकत्रितपणे पाहता हे निष्कर्ष वैयक्तिक पातळीवरील आर्थिक प्राधान्यांमध्ये होत असलेला बदल दर्शवतात. केवळ संपत्ती निर्मितीऐवजी कार्यरत वर्षे, आरोग्यसेवा गरजा आणि निवृत्ती काळात आर्थिक लवचिकता सुनिश्चित करण्यावर अधिक भर दिला जात आहे.

 

 

 

आर्थिक तयारी आणि कमी अनिश्चितता यांचा संबंध

 

तीनपर्यंत विमा किंवा गुंतवणूक उत्पादने असलेल्या व्यक्तींसाठी निर्देशांक तुलनेने स्थिर असून, स्कोअर 78 ते 80 दरम्यान आहे, जो एकूण निर्देशांक स्कोअर 79 शी जवळचा आहे. गुंतवणूक मालकीबाबतही असाच नमुना दिसून येतो, जिथे एक ते तीन गुंतवणूक साधने असलेल्या प्रतिसादकर्त्यांचा स्कोअर 79 ते 80 दरम्यान स्थिर आहे.

 

 

 

चार किंवा अधिक विमा/गुंतवणूक उत्पादने असलेल्या गटामध्ये मात्र स्पष्ट बदल दिसतो. या गटात विम्यासाठी निर्देशांक स्कोअर 73 आणि गुंतवणुकीसाठी 75 इतका कमी होतो. यावरून असे सूचित होते की घरगुती पातळीवर अधिक सखोल आणि वैविध्यपूर्ण आर्थिक संरक्षण उपलब्ध झाल्यानंतरच जाणवणाऱ्या अनिश्चिततेत लक्षणीय घट होते. म्हणजेच केवळ मालकीपेक्षा आर्थिक संरक्षणाची व्यापकता आणि स्तरबद्ध रचना अधिक महत्त्वाची ठरते.

 

 

 

आदित्य बिर्ला सन लाइफ इन्शुरन्सचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कमलेश राव म्हणाले, “अ-निश्चीत इंडेक्स 2.0 एक स्पष्ट संदेश देतो: आर्थिक स्थैर्य, हवामानाचा परिणाम, आरोग्यविषयक धोके, डिजिटल सुरक्षा आणि दीर्घकालीन आर्थिक सुरक्षितता यासंबंधीच्या अनिश्चितता दैनंदिन जीवनात एकत्र येत असताना, अधिक निश्चिततेकडे जाण्याचा भारताचा मार्ग हा सक्रिय, स्तरबद्ध आणि समजून उमजून केलेली आर्थिक तयारी यामधूनच जातो. ही तयारी व्यक्ती आणि कुटुंबांना अनिश्चिततेचे व्यवस्थापन करण्यापासून त्यांना भविष्यातील नियंत्रण पुन्हा मिळवण्यास मदत करते.”

 

 

 

भारतातील अनिश्चिततेला कारणीभूत घटक

 

अनियंत्रित घटक निर्देशांकावर वर्चस्व गाजवतात. आर्थिक व वित्तीय अस्थैर्य (क्रमांक 1) आणि पर्यावरण व हवामानाशी संबंधित चिंता (क्रमांक 2) हे संयुक्तपणे सर्वात मोठे घटक ठरले असून त्यांचा अ-निश्चीत इंडेक्स 80 आहे. यात महागाई, उत्पन्नातील चढउतार, हवामान घटनांचे धोके आणि दीर्घकालीन शाश्वततेबाबतच्या चिंता समाविष्ट आहेत. डिजिटल व सायबर सुरक्षा धोके, सार्वजनिक सुरक्षितता व गुन्हेगारी (क्रमांक 4), तसेच कर, इंधन दर आणि जागतिक संघर्ष यांसारखे सरकारी धोरण व भू-राजकीय घटक (क्रमांक 5) हे देखील पहिल्या पाच घटकांमध्ये असून, त्यांचा प्रत्येकाचा अ-निश्चीत इंडेक्स जवळपास 80 आहे.

 

 

 

संभाव्यतः नियंत्रित करता येणाऱ्या घटकांमध्ये आरोग्य व वैद्यकीय जोखमी (क्रमांक 3) यांचा अ-निश्चीत इंडेक्स 80 आहे. अचानक उद्भवणाऱ्या वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती, जीवनशैलीशी संबंधित आजार आणि उपचार खर्चातील अनिश्चितता ही यामागील कारणे आहेत. यानंतर भावनिक व मानसिक स्वास्थ्य (क्रमांक 6), उत्पन्न, कर्ज आणि आर्थिक नियोजन (क्रमांक 7), तसेच करिअर व रोजगाराशी संबंधित आव्हाने (क्रमांक 8) यांचा अ-निश्चीत इंडेक्स 79 आहे. तो वाढता ताण, आर्थिक असुरक्षितता आणि नोकरीविषयक दबाव दर्शवतो. कौटुंबिक व सामाजिक जबाबदाऱ्या (क्रमांक 9) आणि निवृत्ती व वृद्धत्व (क्रमांक 10) यांचा अ-निश्चीत इंडेक्स 78 आहे, तर शिक्षणासाठीचा परवडू शकेल असा खर्च आणि मुलांचा विकास (क्रमांक 11) यांचा स्कोअर 75 आहे.

 

 

 

वय आणि लिंग यांच्या पलीकडे जाणारी अनिश्चितता, मात्र प्रदेश आणि शहराच्या आकारानुसार तीव्रता वाढते

 

लिंग, वय आणि व्यवसाय यांमध्ये निर्देशांक आश्चर्यकारकरित्या सुसंगत असून, अनिश्चितता व्यापकपणे पसरलेली असल्याचे दिसते. पुरुष (78), महिला (80), पगारदार व्यावसायिक (79), व्यावसायिक उद्योजक (80) आणि बेबी बूमर्स (78) ते जनरेशन एक्स (80) या सर्व गटांमध्ये स्कोअर 78 ते 80 दरम्यान आहेत. अ-निश्चीत इंडेक्स दक्षिण विभागात सर्वात कमी (71) असून, इतर सर्व विभागांमध्ये तो उच्च आहे. त्यामध्ये पूर्व विभाग आघाडीवर (83) आहे. शहराचा आकार कमी होत जाईल तशी अनिश्चितता वाढत जाते—टियर 1 शहरांमध्ये 73 पासून टियर 3 शहरांमध्ये 86 पर्यंत आहे. मुले असलेल्या विवाहित व्यक्तींमध्ये स्कोअर किंचित जास्त (80) असला तरी तुमच्यावर किती लोक अवलंबून आहेत ती संख्या निर्देशांकावर फारसा परिणाम करत नाही. यावरून लोक कुठे राहतात आणि त्यांना उपलब्ध असलेली साधने ही अनिश्चिततेच्या बाबतीत जीवनाच्या टप्प्यांपेक्षा किंवा कुटुंब रचनेपेक्षा अधिक महत्त्वाची ठरतात.

 

 

 

स्वीकारापासून पुरेशा संरक्षणापर्यंत: भारतातील जीवन विम्याचे आव्हान

 

वैयक्तिक जीवन विमा उत्पादनांची जाणीव तुलनेने व्यापक असली तरी, त्यांचा वापर वेगवेगळ्या प्रकारांमध्ये मोठ्या प्रमाणावर बदलतो. टर्म इन्शुरन्सची माहिती 58% प्रतिसादकर्त्यांना आहे, मात्र सध्या केवळ 20% कडे पॉलिसी आहे. संपूर्ण जीवन विम्याबाबत 59% जागरूकता असून, 20% वापर आहे. मनी बॅक पॉलिसींसारख्या बचतप्रधान उत्पादनांची जागरूकता 57% आणि वापर 25% असून, ही सर्वाधिक अंगिकार केली जाणारी जीवन विमा योजना ठरते. एंडोमेंट योजनांबाबत 41% जागरूकता असली तरी त्यांचा स्वीकार केवळ 5% आहे.

 

 

 

बाजाराशी निगडित उत्पादने तुलनेने मर्यादित स्वरूपात आहेत. प्रतिसादकांपैकी 33% ना युलिप्सबाबत माहिती असून, केवळ 2% वापर आहे. दीर्घकालीन संरक्षणावर लक्ष केंद्रित करणाऱ्या उत्पादनांचाही स्वीकार मर्यादित आहे—पेन्शन किंवा अ‍ॅन्युइटी योजनांबाबत 57% जागरूकता असून, वापर 8% आहे, तर चाइल्ड प्लॅन्सबाबत 62% जागरूकतेपैकी 10% सध्या धारक आहेत.

 

 

 

 

 

जागरूकतेपासून प्रत्यक्ष कव्हरेजपर्यंतचा हा असमान प्रवास परवडत आहे का याचा अंदाज, गुंतागुंत आणि विश्वासातील दरी या सगळ्या गोष्टी एकत्र येऊन घडतो. जवळपास 32% प्रतिसादकर्ते उच्च प्रीमियम खर्च हा अडथळा असल्याचे सांगतात, तर 30% जणांना सध्या जीवन विमा तितका तातडीचा वाटत नाही. निर्णय घेण्यात अडचणही महत्त्वाची भूमिका बजावते—28% जण कोणती योजना निवडावी हे ठरवू शकत नाहीत आणि 17% जणांना पॉलिसीच्या अटी व शर्ती अतिशय गुंतागुंतीच्या वाटतात. विश्वासाचाही मोठा अडसर आहे, कारण 29% जण मित्र किंवा कुटुंबीयांच्या नकारात्मक क्लेम अनुभवांचा उल्लेख करतात आणि 23% जण विमा कंपन्यांवर विश्वास नसल्याचे सांगतात.

 

याशिवाय, सर्वेक्षणातून असे दिसून आले की जवळपास 68% टर्म इन्शुरन्स धारकांचे कव्हरेज त्यांच्या वार्षिक उत्पन्नाच्या 9 पट पेक्षा कमी आहे आणि 37% जणांचे कव्हरेज 5 पट पेक्षा कमी आहे. तज्ज्ञांनी सुचवलेल्या 15–20 पट पातळीपेक्षा हे खूपच कमी आहे. केवळ 10% जण 10–14 पट या श्रेणीत येतात, तर फक्त 7% जण 15 पट किंवा त्याहून अधिक कव्हरेजपर्यंत पोहोचले आहेत.

 

 

 

निष्कर्ष

 

अ-निश्चीत इंडेक्स 2.0 समकालीन भारताचे स्पष्ट आणि प्रभावी चित्र सादर करतो: एकीकडे आर्थिक प्रगती, तर दुसरीकडे खोलवर रुजलेली आणि सातत्याने जाणवणारी अनिश्चितता. निर्देशांक 79 वर स्थिर असून, चारपैकी तीन भारतीय त्यांच्या भविष्यासंदर्भात अत्यंत चिंताग्रस्त असल्याचे सांगत आहेत. अनिश्चितता आता केवळ एखाद्या घटनेमुळे निर्माण होत नसून, एकमेकांवर अवलंबून अनेक जोखीम घटकांच्या मिश्रणातून ती वाढत आहे.

 

 

 

संपादकीय टीप – अ-निश्चीत इंडेक्स कसा मोजला गेला?

 

· गेल्या वर्षी अ-निश्चीत इंडेक्स स्कोअर 74 होता; अर्थात असे असले तरी थेट तुलना करता येऊ शकत नाही. याचे कारण मागील वर्षी 7 घटक होते, तर या वर्षी 11 घटक असून, ते 49 दृष्टिकोनात्मक विधानांमध्ये विभागले आहेत. त्या प्रत्येकाचा वेगळा घटक आहे.

 

· 49 विधानांवरील स्कोअरच्या आधारे निर्देशांक स्कोअर निश्चित करण्यात आला.

o प्रत्येक विधानाला 0–10 या श्रेणीत (कमी ते जास्त अनिश्चितता) गुण देण्यात आले.

o त्यानंतर सर्व 49 विधानांचा सरासरी स्कोअर काढून तो 100 च्या निर्देशांकात रूपांतरित करण्यात आला.

 

· गुणात्मक टप्प्यात विविध जीवन टप्पे आणि पार्श्वभूमी असलेल्या 21 सखोल मुलाखती घेण्यात आल्या.

 

· परिमाणात्मक टप्प्यात भारतभरातून रॅडम नमुना पद्धतीने 3,583 प्रतिसादकर्त्यांचा समावेश करण्यात आला आहे.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments