Sunday, August 23, 2026
Google search engine
HomeUncategorized*एमआयडीसीच्या नव्या परिपत्रकानुसार अधिकारांचे विकेंद्रीकरण; उद्योगांना मोठा दिलासा* ...

*एमआयडीसीच्या नव्या परिपत्रकानुसार अधिकारांचे विकेंद्रीकरण; उद्योगांना मोठा दिलासा* *नव्या धोरणांचा अधिकाधिक उद्योजकांनी लाभ घ्यावा- प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील*

 

 

बारामती, दि. ११ फेब्रुवारी: महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या नव्या धोरणानुसार शासकीय प्रक्रिया अधिक सुलभ करून अधिकाधिक अधिकार प्रादेशिक कार्यालयांना देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला; या नव्या धोरणाचा अधिकाधिक लाभ उद्योजकांनी घ्यावा तसेच याबाबत सर्व उद्योजकांपर्यंत माहिती पोहोचवावी, असे आवाहन प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील यांनी केले.

 

बारामती प्रादेशिक कार्यालयाच्यवतीने बारामती, दौंड, पुरंदर व इंदापूर तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांसोबत नुकतीच बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी अधीक्षक अभियंता विजय पेटकर, बारामती ग्रामीणचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, बारामती औद्योगिक वसाहत संघटनेचे अध्यक्ष धनंजय जामदार, बारामती महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे विभागीय अध्यक्ष शरद सूर्यवंशी, विविध औद्योगिक संघटनेचे पदाधिकारी, उद्योजक, उद्योगांमधील मानव संसाधन विभागाचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

 

श्री. पाटील म्हणाले, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) १५ डिसेंबर २०२५ रोजी परिपत्रकाद्वारे प्रचलित धोरणांमध्ये अमूलाग्र बदल केले आहेत. शासकीय प्रक्रिया अधिक सुलभ करून अधिकाधिक अधिकार प्रादेशिक कार्यालयांना देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. वरिष्ठ पातळीवरील विविध अधिकार खालच्या पातळीवर वर्ग करण्यात आल्याने उद्योगांची होणारी ससेहोलपट कमी होऊन उद्योगांना मोठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे, असेही श्री. पाटील म्हणाले.

 

एमआयडीसीच्या या निर्णयामुळे उद्योग प्रक्रिया अधिक पारदर्शक, जलद आणि सुलभ होणार असून औद्योगिक विकासाला गती मिळणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments