Sunday, August 23, 2026
Google search engine
HomeUncategorized*पिंपरी चिंचवड शहरात प्रतिबंधात्मक आदेश लागू*

*पिंपरी चिंचवड शहरात प्रतिबंधात्मक आदेश लागू*

 

 

पुणे, दि. १२ : आगामी काळात साजरे होणारे सण, उत्सव, क्रांतिवीर लहुजी साळवे पुण्यतिथी व वासुदेव बळवंत फडके पुण्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३७ (१)(३) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. हे आदेश १७ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत लागू राहतील.

 

 

या आदेशान्वये कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ, ज्वलनशील द्रव पदार्थ बाळगणे,दगड अथवा शस्त्रे किंवा अस्त्रे, सोडावयाची अस्त्रे किंवा फेकावयाची हत्यारे अगर साधने तसेच काचेचे तुकडे व काचेच्या रिकाम्या बाटल्या बरोबर नेणे, जमा करणे व तयार करणे, शस्त्रे, सोटे, भाले, चाकु, सुरा, कोयता, तलवारी, दंड, काठया, बंदुका व शारीरिक इजा करण्यासाठी वापरात येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे, कोणत्याही इसमाचे चित्राचे, प्रतिकात्मक प्रेताचे, पुढाऱ्यांच्या चित्राचे, प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे, मोठमोठयाने अर्वाच्य घोषणा देणे, वाद्य वाजविणे यामुळे सभ्यता अगर नितीमत्ता यास धोका पोहचेल किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा राज्य उलथवून देण्यास प्रवृत्त करेल अशी आवेशपूर्ण भाषणे करणे किंवा आविर्भाव करणे, कोणतेही जिन्नस तयार करून त्याचा जनतेत प्रसार करणे या कृत्यावर बंदी घालण्यात आली आहे.

 

 

महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ च्या कलम ३७ चे पोटकलम (३) प्रमाणे पाच किंवा पाच पेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यास तसेच पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड यांचे पुर्व परवानगी शिवाय सभा घेणेस किंवा मिरवणूक काढण्यास बंदी मनाई राहील. वरील आदेश हा शासनाच्या सेवेतील व्यक्तींना व ज्यांना आपल्या वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्यपुर्तीसाठी हत्यार बाळगणे आवश्यक आहे त्यांना लागू होणार नाही. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधीत व्यक्ती महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन-१९५१ चे कलम १३५ प्रमाणे शिक्षेस पात्र होईल, असे पिंपरी चिंचवड पोलीस सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर यांनी कळविले आहे.

0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments