पुणे, दि. १२: तालुकास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन सोमवार १६ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता तहसिल कार्यालय पुणे शहर, ९३१ शुक्रवार पेठ, पुणे येथे करण्यात आल्याची माहिती पुणे शहरचे तहसीलदार स्मिता माने यांनी दिली.
या दिवशी नागरिकांनी त्यांच्या समस्या लोकशाही दिनीच लेखी स्वरुपात अर्ज सादर कराव्यात,असे आवाहन तहसीलदार श्रीमती माने यांनी केले आहे.


