Saturday, August 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedकामगार दिनी नोंदीत सुरक्षा रक्षकांचा गौरव* *असामान्य आणि विशिष्ट केलेल्या कामगिरीबाबत...

कामगार दिनी नोंदीत सुरक्षा रक्षकांचा गौरव* *असामान्य आणि विशिष्ट केलेल्या कामगिरीबाबत २५ फेब्रुवारीपर्यंत माहिती पाठविण्याचे आवाहन*

 

 

पुणे, दि.12: येत्या १ मे महाराष्ट्र व कामगार दिनी असामान्य आणि विशिष्ट कामगिरी करणाऱ्या पात्र सुरक्षा रक्षक, सुरक्षा अधिकाऱ्यांचा गौरव केला जाणार आहे, सुरक्षा रक्षकांनी आपली माहिती आस्थापनेच्या शिफारशीसह २५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ कार्यालय किंवा pdagbpune@gmail.com या ईमेल पत्त्यावर पाठवावी.

नोंदीत सुरक्षा रक्षकांनी १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत कर्तव्यावर असतांना असामान्य आणि विशिष्ट केलेल्या कामगिरीचा जिल्ह्याचे पालकमंत्री, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे. या मध्ये व्यक्तींचा जीव वाचविणे, सर्व प्रकारचे गुन्हे वेळीच थांबविणेसाठी कसोटीने प्रयत्न करणे, नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मदतकार्य करणे, अपघाताच्या (आग लागणे, वाहन अपघात, इतर कुठलेही जीवघेणे अपघात) वेळी जखमीना सर्वतोपरी मदत करणे, आस्थापनेचे, जनतेचे कुठल्याही स्वरुपाचे संभाव्य, होणारे नुकसान टाळण्याकरिता कर्तव्य दक्षतेने काम करणे, राज्य,राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळात प्रावीण्य दाखविणे या कामगिरीवर आधारित मुल्यमापन केले जाणार आहे, अशी माहिती पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाचे सचिव तथा सरकारी कामगार अधिकारी प्रशांत चंगारी यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments