Friday, August 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedविभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली 'पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरण' समितीची...

विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली ‘पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरण’ समितीची आढावा बैठक संपन्न*

 

 

*वाहतूक कोंडी होणाऱ्या ठिकाणांचा प्राधान्यक्रम ठरवून वाहतूक नियमनासाठी प्रकल्प राबवावेत- विभागीय आयुक्त*

 

पुणे, दि. १३: पुणे शहरातील वाहतूक योजनांचे नियोजन, सुसूत्रीकरण आणि अंमलबजावणी करण्यासाठी ‘पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरण’ समितीची आढावा बैठक विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित करण्यात आली. जास्त प्रमाणात वाहतूक कोंडी होणाऱ्या ठिकाणांचा प्राधान्यक्रम ठरवून वाहतूक नियमनासाठी प्रकल्प राबवावेत अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

 

बैठकीला पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त दीपक सिंगला, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पुणे मनपा अपर आयुक्त पृथ्वीराज बी. पी. तसेच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त योगेश म्हसे दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

 

पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक नियमन योग्यरितीने होण्यासाठी अधिक प्रमाणात वाहतूक कोंडी होणाऱ्या भागांचा अभ्यास करावा. वाहतुकीचा प्रारंभ व दिशा याचा योग्य अभ्यास करून सर्वेक्षणानुसार प्रकल्पांचे सादरीकरण करावे, असे डॉ. पुलकुंडवार यांनी सांगितले.

 

यावेळी विश्रांतवाडी, मुंढवा चौक, मार्केट यार्ड ते सेव्हन लव्हज चौक, गोळीबार मैदान, घोरपडी ब्रीज, मगरपट्टा परिसरातील सार्वजनिक वाहतूक, कॉरिडॉर, डबल डेकर टनेल, पीएमपीएलच्या नवीन बसेस साठी पार्किंगसाठी जागा उपलब्ध करण्याचे नियोजन आदींबाबत चर्चा करण्यात आली.

0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments