Friday, August 21, 2026
Google search engine
HomeUncategorized'हिंद-दी-चादर’ च्या पार्श्वभूमीवर आयोजित आरोग्य शिबीराचा हजाराहून अधिक नागरिकांनी घेतला लाभ-सुरेंद्रसिंग धुप्पर*

‘हिंद-दी-चादर’ च्या पार्श्वभूमीवर आयोजित आरोग्य शिबीराचा हजाराहून अधिक नागरिकांनी घेतला लाभ-सुरेंद्रसिंग धुप्पर*

 

 

 

पुणे, दि. १५ फेब्रुवारी: ‘हिंद-दी-चादर’ कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर कॅम्प येथील गुरुद्वारा गुरुनानक दरबारच्यावतीने आरोग्य शिबीरे आयोजित करुन नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली असल्याची माहिती गुरुनानक मेडिकल फाऊंडेशन सदस्य सचिव सुरेंद्रसिंग धुप्पर यांनी दिली.

 

श्री. म्हणाले, श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त साहिबांच्या हौतात्म्याची माहिती भावी पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने हिंद-दी-चादर’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. त्यामुळे साहिबजीचे त्याग,शौर्य व मानवतेचा संदेश समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी हा कार्यक्रम महत्वपूर्ण आहे.

 

गुरुनानक मेडिकल फाऊंडेशनच्यावतीने महिलांच्या गर्भाशयाच्या कर्करोगाची तपासणी करिता ‘सर्व्हायकल कॅन्सर’ शिबीर, नेत्र तपासणी शिबीर, तसेच पोलीस कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी तसेच खासगी दुकानातील कामगारांची निःशुल्क तपासणी करण्यात आली असून या शिबिराचा हजाराहून अधिक नागरिकांनी लाभ घेतला आहे, अशी माहिती श्री.धुप्पर यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments