Wednesday, August 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedपुण्यात नॅशनल टी20 क्रिकेट फॉर द व्हिज्युअली इम्पेअर्ड स्पर्धेचे उद्घाटन द...

पुण्यात नॅशनल टी20 क्रिकेट फॉर द व्हिज्युअली इम्पेअर्ड स्पर्धेचे उद्घाटन द पूना ब्लाइंड मेन्स असोसिएशन व ब्लाईंड क्रिकेट असोसिएशन (बीसीए) यांच्या संयुक्त विद्यमाने व एचसीएल फाऊंडेशनच्या सहकार्याने आयोजन

पुणे,16 फेब्रुवारी 2026 : द पूना ब्लाइंड मेन्स असोसिएशन (पीबीएमए) आणि ब्लाईंड क्रिकेट असोसिएशन (बीसीए) तर्फे एचसीएल फाऊंडेशन च्या सहकाऱ्याने पुण्यात नॅशनल टी20 क्रिकेट फॉर द व्हिज्युअली इम्पेअर्ड स्पर्धेचे उद्घाटन डेक्कन जिमखाना मैदानात करण्यात आले. या प्रसंगी पुणे महानगरपालिकेतील विरोधी पक्ष नेते निलेश निकम, एचसीएल टेक चे उपाध्यक्ष अरुण अल्बर्ट, पीबीएमए चे अध्यक्ष राजेश शहा, कार्यकारी संचालक परवेज बिलीमोरिया, बीसीए चे अध्यक्ष रवी वाघ, एवलॉक इंडिया चे व्यवस्थापकीय संचालक अनिर्भान मुखर्जी, सुहाना च्या आंतरराष्ट्रीय व्यवसायाचे संचालक विश्व चोरडिया, भारताच्या माजी महिला क्रिकेटपटू उज्वला पवार आणि शोभा पंडित, डेक्कन जिमखानाच्या क्रिकेट विभागाचे प्रमुख मृगांक राठी आदी मान्यवर उपस्थित होते .

 

या टुर्नामेंट चे उद्घाटन कोथरूड गर्ल्स ब्लाइंड स्कूल आणि जागृती ब्लाइंड स्कूल आळंदी यांच्यात ५ ओव्हर्स या मैत्रीपूर्ण लढतीने झाली.

 

या स्पर्धेतील सामन्यांचे आयोजन डेक्कन जिमखाना मैदान आणि पद्ममावती येथील टेंबेकर मैदान येथे करण्यात आले आहे. महाराष्ट्र,राजस्थान,मध्य प्रदेश,गुजरात,कर्नाटक,उत्तर प्रदेश,पश्चिम बंगाल आणि चंदीगड या आठ संघांचा या स्पर्धेत सहभाग असून पाच दिवसात एकूण 13 सामने खेळवले जाणार आहेत. पहिला सामना सोमवार दिनांक १६ फेब्रुवारी रोजी डेक्कन जिमखाना येथे अ गटातील महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश दरम्यान व कर्नाटक व उत्तरप्रदेश दरम्यान, तर टेंभेकर मैदानात ब गटातील पश्चिम बंगाल विरुद्ध राजस्थान आणि गुजरात विरुद्ध चंदीगड या संघात लढत होईल.

 

अंतिम सामना आणि पारितोषिक वितरण समारंभ 19 फेब्रुवारी रोजी डेक्कन जिमखाना मैदानावर पार पडणार आहे.

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments