Wednesday, August 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedजाधवर इन्स्टिट्यूटमध्ये प्लंबिंग विषयी कार्यशाळा* राष्ट्रीय शैक्षणिक धोरण व कौशल्यविकासांतर्गत विशेष...

जाधवर इन्स्टिट्यूटमध्ये प्लंबिंग विषयी कार्यशाळा* राष्ट्रीय शैक्षणिक धोरण व कौशल्यविकासांतर्गत विशेष उपक्रम 

 

 

पुणे : प्लंबिंग हा विषय केवळ नळ दुरुस्तीपुरता मर्यादित नसून तो आरोग्य, स्वच्छता आणि जलसंधारणाशी निगडित आहे, हे शिकवित नऱ्हे येथील जाधवर इन्स्टिट्यूटमध्ये प्लंबिंग विषयी कार्यशाळा घेण्यात आली. यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये विविध व्यवसायांबद्दल कुतूहल निर्माण करणे हा मुख्य उद्देश होता.

 

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि राष्ट्रीय कौशल्य योग्यता फ्रेमवर्क यांच्या समन्वयामुळे शालेय शिक्षणात आता व्यावसायिक शिक्षणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार, इयत्ता ६ वी ते ८ वी या माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक शिक्षणाचा पाया रचला गेला आहे.

 

विद्यार्थ्यांना पाईप्स, फिटिंग्स आणि बेसिक रिपेअरिंगसह प्रात्यक्षिक ज्ञान देण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये श्रमाची प्रतिष्ठा वाढते आणि त्यांना तांत्रिक कामांचा प्रत्यक्ष अनुभव मिळतो. हा या मागचा उद्देश होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments