Wednesday, August 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedराज्य शासनाच्या ‘उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार-२०२५’साठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन*

राज्य शासनाच्या ‘उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार-२०२५’साठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन*

 

पुणे, दि. 16 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी दिनांक 1 जानेवारी, 2025 ते 31 डिसेंबर, 2025 पर्यंतच्या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या लेखन,छायाचित्रे,वृत्तकथा यांच्या प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. प्रवेशिका पाठविण्याचा अंतिम दिनांक 15 मार्च, 2026 असा आहे.

 

स्पर्धकांनी जिल्हा माहिती कार्यालयाकडून येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावयाचे आहेत. अधिक माहिती व अर्जाचे नमुने dgipr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत, अशी माहिती जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments